प्राचीन भारतीय विद्यापीठे

Submitted by रमेश भिडे on 8 April, 2013 - 02:03

प्राचीन भारतीय विद्यापीठे अर्थात आमची विचार उपासना आणि ज्ञानाची उपासना.....
...

आपल्या या देशात फार मोठी मोठी विद्यापीठे होती जिथे फार मोठे संशोधन आणि अभ्यास
चालत असे. आमचे पूर्वज वेदात ज्ञान लपवत नसत तर आपली विद्या पीठे होती तेथे
अव्याहत ज्ञान उपासना चालत असे. त्यात कुठलीही दिव्यदृष्टी नव्हती .
आपल्या पूर्वजांनी हे सगळे ज्ञान त्या त्या विषयाच्या पुस्तकात लिहून ठेवले होते आणि विद्यापीठात ते वाढवत होते.

आपल्या देशात नालंदा,सोमपूर , ओदान्तापूर , तक्ष्शीला आणि जग्गादाला अशी प्रचंड विद्यापीठे होती , पण मुस्लीम आक्रमणात हे सगळे उध्वस्त झाले, जाळले गेले अथवा नाश पावले.....

यापैकी फक्त नालंदा विद्यापीठात १२००० विद्यार्थी आणि २००० शिक्षक होते.या विद्यापीठाचे वाचनालय हस्तलिखित ग्रंथांच्या काळात ९ मजल्याचे होते आणि भक्तियार खिलजीने जेंव्हा नालंदा उध्वस्त केले तेंव्हा वाचनालयाची आग सहा महिने जळत होती आणि आजूबाजूच्या परिसरावर राखेचे आवरण होते.
आपल्या पूर्वजांनी लिहून आणि प्रयोगशाळेत ज्ञान साठविले होते पण ते सगळे उध्वस्त झाले.
पण होते काय की या सगळ्या ज्ञानाच्या हजारो वर्षाच्या उपासनेला आपण विसरून गेलो आहोत आणि मग मला वाटते आंपण आयुर्वेद्ची उपचार पद्धती अथवा अगदी आजीबाईच्या बटव्यातली काष्ठऔषधे बघितली तरी हे स्पष्ट आहे की गुणधर्म हे वापराने आणि प्रयोगाने सिद्ध झाले आहेत.काही बाबतीत चुकीच्या कल्पनाही होत्या,पण बव्हंशी हे प्रयोग होते.
याचे महत्वाचे कारण होते की रसायनशास्त्र जे कणाद मुनी आणि त्यांच्या शिष्यांनी सिद्ध केले ते आयुर्वेदिक औषधपद्धतीचे मूळ होते. कणाद आणि त्यांचे हजारो शिष्य हे रसायनशास्त्र सिद्ध करण्यासाठी शेकडो वर्षे काम करत होते ,मग त्यातून दिल्लीचा लोखंड स्तंभ,बांधकामात वितळविलेले शिसे ओतून दगड पक्के बसविणे पासून ते आयुर्वेद हे सगळे आले.

नागर्जुनाचार्याचे " रसरत्नाकरम" ज्याची फक्त काही पाने शिल्लक आहेत याची कल्पना देऊ शकते.आजच्या chemistry चा पाया भारतातून अरब मुस्लीम घेऊन गेले जो त्यांच्याकडून युरोपियन लोकांनी घेतला.बगदादच्या खलिफाच्या पदरी ९ व्या शतकात कंक नावाचा ब्राह्मण आणि इतर भारतीय शास्त्रज्ञ गणित आणि रसायनशास्त्र शिकवीत असत.

ही सगळी प्रगती ही त्या काळाला अनुसरून होती ,atombombs,aircrafts and computers आपल्या लोकांनी शोधले नव्हते.

फक्त तक्षशिला विद्यापीठाचे उदाहरण घ्या हे इ.स.पूर्व १४व्या शतकात अस्तित्वात असल्याचे उल्लेख सापडतात .सर्व साधरण आता ज्याला
postgraduate studies म्हणतो ते तक्षशिला विद्यापीठात होत असत .इथे विद्यार्थी वयाच्या १६व्या वर्षी येत असे.वेद,वेदांगे,१८ विद्या ज्यात हत्तीयुध्द ,धनुर्विद्या ,शिकार आणि राज्यशास्त्र ,अर्थशास्त्र इ.शिकविले जात असे.त्याशिवाय या विद्यापीठात आयुर्वेद,शल्यक्रिया,कायदा आणि घटना इ.विषयाचा स्वतंत्र अभ्यासक्रम होता.
आर्य चाणक्य [इ.स.पूर्व ३४०] हा इथे प्राध्यापक होता आणि त्याने आपले अर्थशास्त्र इथे शिकविताना लिहिले.पाणिनी ज्याच्यामुळे व्याकरण आले तो पण इथे प्राध्यापक होता.
तक्षशिला विद्यापीठ हे oxford प्रमाणे बऱ्याच मोठ्या परिसरात होते जिथे वेगवेगळी गावे वेगवेगळ्या विषयाची colleges
चालवत होते.बहुतेक सर्व प्राध्यापक आपला स्वताचे संशोधन करत असत.
विद्यार्थ्यांकडून काहीही शुल्क [ फी ] घेतली जात नसे .राहणे ,जेवणे, खाणे आणि शिकणे सर्व पूर्णतया निशुल्क होते.या विद्यापीठात परिक्षा नसत पण विषयाचे ज्ञान घोटून घेतले जात असे.
तक्षशिला विद्यापीठ सध्याच्या पाकिस्तानातील भीर,सीरसुख,सीरकाप,धर्माजीका,जौलीयान आणि मोहरा या शहरातून पसरलेले होते.

तक्षशिला पाकिस्तानात गेले आणि आपले एक अतिशय महत्वाचे विद्यापीठ सध्याच्या आझाद काश्मीरमधले शारदापीठ.हे अतिशय महत्वाचे विद्यापीठ होते. इथे स्वतः आदी शंकराचार्य येऊन गेले आणि इथल्या विद्वानासमोर त्यांनी आपले ज्ञान दाखविल्यावर त्याना जगदगुरु ही पदवी आणि सर्वज्ञानपीठावर बसण्याचा अधिकार मिळाला. इथून त्यांनी शारदेची जी मूर्ती नेली ती श्रुन्गेरीला स्थापन करून शारादाम्बेचे मंदिर बांधले.आचार्य हेमचंद्र[इ.स.११००] ज्याने संस्कृत आणि प्राकृत अशा दोन्हीची व्याकरणे लिहिली तो इथे येऊन इथली व्याकरणाची आणि जुनी संस्कृत पुस्तके खास परवानगी घेऊन अभ्यासून गेला.

शारदापीठ हे विद्यापीठ म्हणण्यापेक्षा अतिशय उच्च ज्ञानाचे केंद्र आणि अतिशय पुरातन आणि दुर्मिळ पुस्तकाचे संग्रहालय होते. चीनी प्रवासी ह्युएन संग [इ.स. ६०२] इथे राहून इथली बौध्द प्राचीन पुस्तके अभ्यासून गेला. इथे आयुर्वेदाचे संशोधन [Ph.D .च्या ही पुढच्या दर्जाचे.] शेकडो वर्षे चालू होते.शारदापीठ हे सध्याच्या भाषेत एक Research Laboratory and books
& manuscript depository होती .हतभागी आपण की ही विद्यापीठे तर गमवून बसलोच पण त्याची स्मृतीही आपला समाज विसरला आहे.जर आपल्यामध्ये थोडेही ब्राह्मणत्व बाकी असले तर ही ज्ञान उपासना वाढवा,देश आपोआपच वर येईल....
पाकिस्तानात गेलेली दोन विद्यापीठे आपण बघितली आता बांगलादेशात गेलेले एक विद्यापीठ बघू.
बौध्द धर्माचे फार मोठे विद्यापीठ हे सध्याच्या बांगलादेशात नावगाव जिल्ह्यात पहारपूर इथे होते.त्याचे नाव होते " सोमपूर महाविहार " अर्थात जरी बौध्द राजांनी हे विद्यापीठ आपल्या आश्रया खाली चालू केले होते तरीही इथे बौध्द ,हिंदू आणि जैन या तीनही धर्माचा अभ्यास चालायचा सध्याचे बांधकामाचे अवशेष हे २७ एकर जमिनीवर पसरले आहेत .
या महाविहाराची स्थापत्यशैली ही भारतीय नसून पूर्णपणाने बाली,जावा आणि कंबोडिया इथली आहे त्यामुळे इथे तेथील भारतीय साम्राज्याच्या लोकाना वेगवेगळ्या विषयात प्रशिक्षण देण्यासाठी हे विद्यापीठ असावे असेही म्हणतात.पूर्ण भारतात ही स्थापत्यशैली फक्त या विहारात आहे......
हा विहार कधी बांधला हे माहित नाही इथे इतक्या हिंदू मूर्ती आहेत की हे आधी हिंदू विद्यापीठ असावे आणि नंतर राजे बौध असल्याने बौध्द विद्यापीठ पण झाले असावे. पण इथे दुसरा पाल घराण्यातला सम्राट धर्मपाल [इ.स.७८१ ते ८२१] याचे शिलालेख मिळाले आहेत.हे सगळे बांधकाम त्या काळात "जगतांग नेत्रैका विश्राम भूः " अर्थ पूर्ण जगाच्या डोळ्याला सुखविणारे असे मानले जात असे.
दीपंकर श्रीज्नन ज्याने बरीच बौध धर्माची पुस्तके तिबेटी आणि चीनी भाषेत भाषांतरीत केली तो इथेच राहून आपले काम करीत असे.९व्या ते १२व्या शतकात रत्नाकर शांती , महापंडीताचार्य बोधीभद्र,कालामःपाद , विरयेन्द्र आणि करुणाश्रीमित्र हे महापंडित इथे शिकवत आणि संशोधन करत होते.
मुसलमान राज्य आल्यावर हळू हळू याचा राजाश्रय जाऊन हे विद्यापीठ बंद पडले.
या विद्यापीठावर संशिधान करणारा फ्रेझर हा परकीय आहे ,त्याच्या अथक प्रयत्नाने हे अवशेष Unesco ने world heritage site म्हणून जाहीर केले आहे . आणि बांगलादेशच्या खुलना विद्यापीठाने यावर बरेच काम केले आहे.
अर्थात तो परदेशी फ्रेझर यावर काम करू शकतो पण आपल्या पुण्यवान ब्राह्मण समाजाने सोमपूर महाविहाराचे नावही ऐकलेले नसते.
नालंदा विद्यापीठ जेंव्हा ऐन वैभवात होते तेंव्हा ह्युएन संग [इ.स ६०२ ते ६६४ ] इथे येऊन गेला होता त्याने लिहिलेली वर्णन वाचण्यासारखे आहे.
तो लिहितो की विद्यापीठाच्या इमारती ५६ एकरावर पसरल्या आहेत आणि त्यात १२,००० विद्यार्थी,१५१० शिक्षक आणि १५०० इतर नोकर होते.इथे तिबेट , चीन , जपान , कोरिया , सुमात्रा , जावा आणि श्रीलंका येथील विद्यार्थी होते. प्रवेश हा तोंडी परिक्षेनंतर होता.ही परिक्ष घेणारा जो पंडित होता त्याला "द्वार पंडित"असे म्हणत .संस्कृत मध्ये प्राविण्य ही अट होती कारण शिक्षण संस्कृतमध्ये होते.त्यामुळे चीनी आणि जपानी विद्यार्थी नालन्दाला येण्याआधी जावा अथवा बालीला जाऊन संस्कृत शिकत.

ह्युएन संग लिहितो की प्रवेश परिक्षेला बसणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यापैकी फक्त २० % आणि भारतीय विद्यार्थ्यापैकी फक्त ३० % पास होत असत.विद्यार्थ्याना रहाणे,जेवण,शिक्षण इ. सर्व मोफत होते.खालील अभ्यासक्रम उपलब्ध होते १] बौध्द धर्माची १८ शाखा आणि तत्त्वज्ञान २]वेद ,वेदांगे ३] जैन धर्म ४] सहा हिंदू दर्शने ५] पदार्थविज्ञान ६] रसायन शास्त्र ७] खगोलशास्त्र ८]ज्योतिष 9]आयुर्वेद आणि वैद्यक १०] प्रशासन आणि राज्यकारभार.
विद्यापीठाची वेद्शाला टेकडीवर बांधलेल्या उंच इमारतीत होती.
विद्यापीठात मुख्यत्वे भाषण,संभाषण,वादविवाद आणि चर्चा यावर भर होता,परिक्षेवर नाही.
तीन वाचनालये/पुस्तकालये होती ज्यांची नावे होती रत्नसागर, रत्ननिधी आणि रत्नरंजन.सगळ्यात मोठे वाचनालय ९ मजल्याचे होते.

बख्तियार खिलजीने अतिशय क्रूरतेने या विद्यापीठाचा नाश केला.पेर्शियन इतिहासकार मिन्हाज -इ -सिराज हा तबाकत -इ -नासिरी या पुस्तकात लिहितो की या निशस्त्र विद्यापीठात हजारो बौध्द साधुना जिवंत जाळले गेले आणि हजारोंचे मुंडके उडविले गेले.कारण बख्तियार खिलजीला फक्त हे सगळे मूर्तिपूजक इतकेच कळत होते.

विद्यापीठाची ही संकल्पना भारतातून अरबांनी बगदादला नेली आणि बगदाद ,स्पेन, इजिप्त इ. ठिकाणी पहिल्या अरब विद्यापीठांची स्थापन झाली आणि ही कल्पना पुढे युरोपियन लोकांनी अरबाकडून उचलली आणि १० व्या शतकानंतर युरोप मध्ये विद्यापीठे अरबांची नक्कल करून सुरुवात झाली.

आपल्याला जर अभिमान बाळगायचा असला तर या ज्ञानोपासनेचा बाळगा ,उगीच आपल्या पुर्वाजाना अमला एक मोठा प्रश्न नेहमीच पडतो की वेदामध्ये nuclear science लिहिले आहे असे बिनबुडाचे विधान अथवा दिव्य दृष्टीने ऋषी मुनिना आकाशातले nebula
,supernova इ.दिसत असे असे ना आगा न पिच्छा असे विधान कुठल्याही स्वामी पासून त्या art of living च्या बावापर्यंत कोणीही केले की ८५/१०० likes आणि टिपणी वेदाचे एक अक्षरही न वाचलेले हिंदू सुशिक्षित लोक अहिमहीकेने देतात पण असे म्हणले की आपल्या समाजात त्या काळाला अनुरूप असे ज्ञान होते [हे महत्वाचे,कारण कुठलाही समाज आपल्या काळाच्या मर्यादा ओलांडू शकत नाही] ,आणि आपले लोक खूप अभ्यास ,मेहनत करायचे ,विद्यापीठे होती पण दिव्य दृष्टी आणि जादू इ. काही नव्हते.

पण हे ज्ञान हे मेहनत अणि अभ्यास याची फलश्रुति होती असे विधान केले की सुशिक्षित समाजाला त्यातल्यात्यात ब्राह्मणाना त्यात जराही गम्य आणि इंटरेस्ट नसतो.

विद्यापीठांच्या विषयावर आहोत तर
"विक्रमशिला विद्यापीठ" जे बिहारमध्ये होते त्याचा उल्लेख जरुरी आहे. विक्रमशिला हे नालंदा पेक्षाही मोठे होते पण त्याचे अवशेष आणि जागा काळाच्या ओघात गुडूप झाले होते.या विद्यापीठाच्या अवषेशाचा शोध १९८० साली डॉ.वर्मा जे चक्क भारत सरकारचे पुरातन खात्याचे अधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील समूहाने लावला.विक्रमशिला हे उच्च शिक्षणाचे विद्यापीठ म्हणून गुप्त काळात स्थापन झाले पण बौध्द पाल राजांच्या काळात [इ.स. ७००] वैभवाला पोचले.

या विद्यापीठाच्या भोवती ९ फूट उंच भिंत होती आणि या विद्यापीठाच्या गावाला सहा दारे होती.कुठलाहे विद्यार्थी यापैकी त्याला जो अभ्यासक्रम हवा असेल त्या दाराने आत येऊ शकत असे.तिथे त्यांची तोंडी प्रवेश परिक्षा घेण्यासाठी प्रत्येक द्वारावर एक द्वारपंडित असे. प्रत्येक द्वारापाशी त्या त्या विषयाचे शिक्षक राहात आणि प्रत्येक दाराजवळ १५० ते २०० शिक्षक रहात.
१०८ प्राध्यापक हे फक्त प्रशासकीय कामात होते जसे आजकालच्या विद्यापिठात Director,dean,head of the department इ.असतात . या विद्यापीठात हिंदू शाक्त आणि बौध्द वज्रयान या तांत्रिक शिक्षणाचे specialization होते. मग त्यात तंत्र विद्या ,पंच मकार, कामसूत्र इ. आले.

विक्रमशिला विद्यापीठ हे रसायनशास्त्र,रसशास्त्र आणि आयुर्वेद याचे फार मोठे केंद्र होते.
दीपंकर श्रीज्ञान जो चीनमध्ये आतिश या नावाने ओळखला जात असे [इ.स.९६० ते १०५५] याचा काल हा विक्रमशीलाचा सुवर्ण काल समजला जात असे.विक्रमशीलामध्ये शिक्षण ,राहाणे,जेवणखाण फुकट होते. विद्यापीठाचा कारभार हा Board of Education, Board of Administration, Board of Discipline and
the Board in charge of entrance examinations यांच्यातर्फे चालविला जात असे.

मुस्लीम जौनपुरच्या सुलतानाच्या [इ.स. १३९४ ते १४७९] नसिरुद्दीन मुहम्मद शह याच्या अमलाखाली ही विद्यापीठ जमीनदोस्त केले गेले.

जुन्या भारतीय विद्यापीठात ओदान्तपुरी अथवा उड्डाणपूरचे नाव फारसे कुणाला माहित नाही कारण बख्तियार खिलजीने हे विद्यापीठ इ. स. १९९३ मध्ये अति क्रूरतेने कत्तली करत नष्ट केले या शिवाय फारशी माहिती उपलब्ध नाही .पण चीनी प्रवाशांनी लिहुन्ठेव्लेल्या माहितीप्रमाणे या विद्यापीठात १२,००० विद्यार्थी होते.
हे उड्डाणपूर मगधाची राजधानी होते.आता हे गाव बिहार शरीफ या नावाने ओळखले जाते, कारण इथे" शेख शरफुद्दीन याह्या मणेरी " या सुफी अवलीयाचा दर्गा आहे आणि फार मोठा उरूस [जत्रा] दर वर्षी भरतो.
कालाय तस्मे नमः ,दुसरे काय ......

सौराष्ट्रात भावनगरजवळ पश्चिम भारतातले सगळ्यात मोठे विद्यापीठ " वल्लभी " या गावी होते.इ.स. ४५३ ते ४६७ या काळात इथला राजा जैन होता आणि त्याने धर्मचर्चा करण्यासाठी जैन अभ्यासकाची मंडळ [मीटिंग ] बोलाविली ज्या चर्चेतून श्वेतांबर जैन पंथाचा उदय झाला.

मैत्रक या बौध्द राजघराण्याने [इ.स. ४७५ ते ७६७ ] वल्लभी हे शहर आपली राजधानी बनविली आणि तेथे विद्यापीठ केले.
नालंदा हे महायान बौध्द पंथाचे केंद्र होते तर वल्लभी हे हीनयान पंथाचे.
चीनी प्रवासी हुएन संग लिहितो,
वल्लभी हे फार मोठे आणि श्रीमंत शहर आहे.इथे कमीतकमी १०० तरी कोट्याधीश नगरशेठ आहेत.
इथल्या विद्यापीठाखाली गावातली १०० colleges
आहेत ज्यात ७००० विद्यार्थी शिक्षण घेतात.
यात बौध्द आणि हिंदू धर्म ,प्रशासन ,राज्यकारभार,रसायन ,गणित याचे उच्च शिक्षण दिले जाते.महत्वाचे विषय होते नीती[
political science,Statesmanship,] वर्ता
[business and agriculture],administration,theology,law,economics and
accountancy...
या विद्यापीठातल्या विद्यार्थ्याना देशभरातील राज्यात उच्च नोकरी मिळत असे जसे IAS ओर I .I .T .
या राज्यातील प्रमुख बंदर" खंबात " होते त्यामुळे फार मोठा व्यापार परदेशाशी चालत असे आणि हुएन संग लिहतो की खूप चैनीच्या गोष्टी या परदेशातून आयात केल्या जात असत

गुणमती आणि स्थिरमती हे दोन महान पंडित इथे शिकवत होते. .......

आपले पूर्वज उजव्या सोंडेचा गणपती का डाव्या सोंडेचा या मूर्खपणाला फार महत्व देत नव्हते ते खऱ्या अर्थाने शिक्षण,संशोधन आणि शास्त्र [science ] याचे पूजक होते हे लक्षात घ्या आणि अशा अंधविश्वासी गोष्टी त्याज समजा . अणुबॉम्ब आणि विमाने वेदात लपविली होती होती खोट्या आणि भ्रामक कल्पनाचा त्याग करा .

श्रद्धाळू लोकापेक्षा माझा ऋषीवर जास्त विश्वास आहे फक्त ऋषी काय करत होते याबद्दल मतभेद आहेत. श्रद्धाळू लोकाना वाटते की ऋषी हे ध्यान लावून दिव्य दृष्टीने फार फार पुढच्या गोष्टी शोधत होते , आणि मी म्हणतो की हे लोक पिढ्यानपिढ्या अतिशय मेहनत घेऊन संशोधन करत होते,प्रयोग करत होते.
माझ्या साठी ऋषी म्हणजे नालंदा ,तक्षशीला,सोमपूर,विक्रमशिला या विद्यापीठात संशोधन करणारे ऋषितुल्य शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी गणित,खगोलशास्त्र,रसायनशास्त्र,धातुशास्त्र,
आयुर्वेद,नाट्यशस्त्र,कामसूत्र,स्थापत्यशास्त्र इ.इ. विषयात खूप संशोधन आणि प्रगती केली.

माझ्या साठी महर्षी धोंडो केशव कर्वे,भारतरत्न पा.वा. काणे हे ऋषी होते.

त कोणीही कसलेही बिनबुडाचे विधान केले की आपला समाज त्याला ऋषीमुनींचे अध्यात्मिक शक्तीने केलेले संशोधन म्हणून मोकळा होतो.
एक उदाहरण देतो ,वेदामध्ये सर्व विज्ञान आहे यासाठी काही लोक पूर्वीच्या काळच्या या श्लोकाचे उदाहरण देतात:

भद्राम्बुद्धिसिद्धजन्मगणितश्रद्धा स्म यद् भूपगी:

या श्लोकात pi ची किंमत ही ३.१४१५९२६५३५८९७९३२४ अशी लपविलेली आहे ,म्हणजे वेदातल्या प्रत्येक श्लोकात अशी माहिती ऋषी मुनीनी लपविली आहे .

आता कठीण formulae लक्षात ठेवण्याची ही आपल्या गणितातली [गणितातली,वेदातली नाही] पध्दत आहे ज्याला" कटपयादी "पध्दत असे नाव आहे आणि ही कटपयादी पद्धत ही सर्वमान्य होती आणि गुप्त असे यात काही नव्हते हे लोकाना सांगून ही पटत नाही.

आपल्या लोकांनी योग,ध्यान इ. मध्ये प्रगती केली पण ती या विषयांना शास्त्र समजून आणि त्याचा तसा अभ्यास करून,अफवा उठवून नाही.एक पतंजलीचे योगसूत्र जर अभ्यासायचा प्रयत्न केला तरी पुरे आहे.

हा तो समाज आहे की जिथे एका बाजूला आदिशांकराचार्य ब्रह्मसूत्रे आणि प्रस्थानत्रयीवर लिहित होते तर दुसरीकडे अभिनवगुप्त तंत्रपुजा,sex
worship इ.वर आणि चार्वाक स्वतः लोकायत आणि नास्तीकतेवर उघडपणाने लिहित होते ,अभ्यास करत होते आणि तरीही हे तिघेही त्यांच्या व्यासंगामुळे आचार्य आणि ऋषितुल्य आणि मानले जात होते.

हे आपल्या संशोधनाचे गवसणी नसलेले आकाश होते ,त्याचा अभ्यास तर कोणी करत नाही उलट त्याला दिव्य दृष्टी,साक्षात्कार ,गुरुकृपा ,बाबाकृपा इ. अंधश्रद्धेच्या चिमुकल्या फेकण्यास योग्य झालेल्या पिशवीत कोंबायचा प्रयत्न आपला समाज करत आहे आणि त्यात सुशिक्षित ब्राह्मण आघाडीवर आहेत.
जिथे ब्रह्मांड science ने आणि संशोधनाने गिळायची आपल्या समाजाची परंपरा असताना कुठे गुरुचरित्र वाच,कुठे शनीला तेल घाल, कुठे नारायण नागबली कर असले लाचलुचपतीचे धंदे आपण ब्राह्मण करत आहोत.

हे सगळे ज्ञान बव्हंशी नष्ट पावले अथवा विसरले गेले पण जेंव्हा आपण म्हणतो की ध्यान लावून हे संशोधन आपल्या ऋषीणा कळले तेंव्हा आपण सगळेच आपला संशोधनाचा वारसा फेकून देतो आणि आपल्या पूर्वजांनी अतिशय मेहनत करून,प्रयोग करून हे जे असीम काम केले त्याचा ही अपमान करत आहोत.....

आपण प्राचीन भारतीय विद्यापिठांचा इतिहास थोडा वाचवा ही विनंती.ज्ञान नाश पावले की त्याची जागा गलबला ,अफवा इ. घेतात.

आता हा प्रचंड ज्ञानाचा इतिहास जर आपला समाज विसरू शकतो तर अफवा ,गलबला इ. होणारच.अश्या आपल्या कर्मदरिद्री समाजाची तीच लायकी आहे.मग आपण कुठल्याही निरर्थक रूढीनाच आणि स्वामी/बाबांच्या अर्थहीन बकबकीला ज्ञान समजुन कवटाळणारच .......!

based on a post by By Ajit Pimpalkhare (Files) ·

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<हे आपल्या संशोधनाचे गवसणी नसलेले आकाश होते ,त्याचा अभ्यास तर कोणी करत नाही उलट त्याला दिव्य दृष्टी,साक्षात्कार ,गुरुकृपा ,बाबाकृपा इ. अंधश्रद्धेच्या चिमुकल्या फेकण्यास योग्य झालेल्या पिशवीत कोंबायचा प्रयत्न आपला समाज करत आहे आणि त्यात सुशिक्षित ब्राह्मण आघाडीवर आहेत.
जिथे ब्रह्मांड science ने आणि संशोधनाने गिळायची आपल्या समाजाची परंपरा असताना कुठे गुरुचरित्र वाच,कुठे शनीला तेल घाल, कुठे नारायण नागबली कर असले लाचलुचपतीचे धंदे आपण ब्राह्मण करत आहोत.>> हे विधान आक्षेपार्ह वाटते रमेशजी ...

आपण हिंदू सस्कृती आणि पुराणकाला तील संशोधकांचा आदर करताना सध्याच्या हिंदू चालीरीतींचा अनादर करू नये, असे सुचवावेसे वाटते .

बाकी लेख फार छान आहे.

सध्याच्या हिंदू चालीरीतींचा अनादर करू नये, असे सुचवावेसे वाटते .

सध्याच्या कुठल्या चालीरिती आदरणीय आहेत, ते सांगाल का? बर्‍याच जणांना माहित नसणार, याची खात्री आहे, कारण परदेशात तरी भारताबद्दल फक्त वाईटच लिहीले जाते. नि एकंदरीतच बर्‍याच गोष्टी कळत नाहीत, जसे पाण्याचा दुष्काळ, उपासमार इ. गोष्टी यांची जाहिरात होते, कुणि सोन्याचे सिंहासन देणगी म्हणून दिले, आपली देवस्थाने किती श्रीमंत आहेत याची पण जाहिरात होते. पण बाबा आमटे, किंवा त्यांच्यासारखे अनेक लोक असतील भारतात त्यांच्याबद्दल फारसे ऐकायला येत नाही.

धन्यवाद

चांगलं लिहिलय, पण तुमची मतं त्यात टाकण्यापेक्षा फक्त अभ्यासात्मक लिखाण ठेवलं असतं तर लेख जास्त चांगला वाटला असता.

आपल्याकडे अभिमान बाळगावीत अशी विद्यापीठं होती हे खरंच! भारतवर्षातल्या राजांमध्ये कितीही लढाया झाल्या तरी विद्यापीठांना नेहेमी राजाश्रय मिळत गेला आणि विद्यापीठांची भरभराट होत गेली. चित्र पालटलं ते मुस्लीम आक्रमणानंतर. तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे खिलजीने अमानुष क्रूरतेने विद्यापीठातल्या भिख्खू आणि शिक्षक विद्यार्थांची कत्तल केली. अभ्यास करणारी शांत जमात ही, ज्यांचा कशाशीही संबंध नव्हता, त्यांना अक्षरशः कापून काढलं. बौद्ध भिख्खूंना अज्ञानाखातर मूर्तीपूजक म्हणून जाळलं. पूर्ण विद्यापीठही पुस्तकांसकट जाळून काढलं हे वेगळंच. त्या दहशतीनंतर नालंदा आणि इतर विद्यापीठं जी ओलमडली ती कधीही न उभी राहण्याकरता. राजाश्रय वगैरे गेला तो वेगळाच. ह्या विद्यापीठांना शेकडो एकर जमीनी, अनुदानं, दुधदुभत्यांकरता गाई वगैरे राजांकडून मिळायच्या. पूर्णपणे बुद्ध धर्माचा अभ्यास करणार्‍या विद्यपीठांनाही हिंदू राजांकडून उदार अनुदानं मिळायची. त्यातलं बरंच हळू हळू संपत गेलं.

जुन्या भारतीय विद्यापीठात ओदान्तपुरी अथवा उड्डाणपूरचे नाव फारसे कुणाला माहित नाही कारण बख्तियार खिलजीने हे विद्यापीठ इ. स. १९९३ मध्ये अति क्रूरतेने कत्तली करत नष्ट केले या शिवाय फारशी माहिती उपलब्ध नाही . >> ११९३

रमेश भिडे,

लेख चांगला आहे. उत्तम माहिती मिळते. ब्राह्मणांनी ज्ञानसाधना करायला पाहिजे हा आपला मुद्दा योग्य आहे. मात्र हिंदू धर्माच्या चालीरीतींवर केलेली टीका अनाठायी वाटते. गुरूचरित्र वाचणे, शनीला तेल घालणे, नागबळी इत्यादि कार्ये न केल्याने अचानक प्रगती होईल अशी अपेक्षा नको. ही कार्ये सामान्य लोकांसाठी आहेत, तर संशोधन करणारे संशोधक सर्वसामान्य नसतात. तसेच ते संख्येने फार कमी असतात.

दिव्य दृष्टी,साक्षात्कार ,गुरुकृपा ,बाबाकृपा या गोष्टी खोट्या नाहीत. मात्र यांच्या मागे कितपत लागावे हा प्रश्न आहे. त्याकरिता खरे आणि खोटे यांतला फरक समजला पाहिजे. यासाठी साधना आवश्यक आहे. या साधनेकडे कोणी लक्ष देत नाही ही खरी रड आहे. हे मूळ कारण अधोरेखित ना करता केवळ तुलना केली तर ती फसवी होते.

तसं पाहायला गेलं तर अंधश्रद्धा प्रत्येक समाजात सर्वकाळ होत्या. अगदी ज्या ऋषींनी संशोधन केले त्या काळातही होत्या. पण त्यामुळे त्याचं काही अडलं नाही. फार काय इंग्लंडमध्ये पहिल्या एलिझाबेथच्या काळी बघा काय होत्या ते (इंग्रजी दुवा). तरीही इंग्लंड तिच्या कारकीर्दीत युरोपातलं सर्वात बलवान आणि श्रीमंत राष्ट्र झालंच ना? मी अंधश्रद्धांचं समर्थन करीत नाहीये. फक्त त्यांच्या मर्यादा काय आहेत ते दाखवून देतोय. पुढे पहिल्या व्हिक्टोरिया राणीच्या कारकीर्दीत औद्योगिक क्रांती झाली. पण त्यामुळे अंधविश्वास पूर्णपणे नाहीसे झाले नाहीत.

सांगण्याचा मुद्दा काय की संशोधनाला उत्तेजन द्यायला हवं. सर्वसामान्य लोक काय करतात त्याचा संशोधनाशी थेट संबंध नाही.

या लेखातले सगळे विचार तुमचे आहेत हे गृहीत धरलेय.

आ.न.,
-गा.पै.

गामा_पैलवान, पटले.

हे लेखकांना माहित असेलच. इतरांना कसे पटवावे हा प्रश्न आहे.

गामा बरोबरच आहेत झक्की पण चुकत नाहीयेत

भिडे अतीशय परीश्रमपूर्वक लिहित आहात त्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद

फक्त एकच बाब सांगतो....<<<<जर आपल्यामध्ये थोडेही ब्राह्मणत्व बाकी असले तर >>>> वगैरे वाक्ये मधेमधे पेरायची गरज काय होती ????? काहीच नाही

भिडेजी एक विचार करा की आता जे जे लोक आपल्या भारतात संशोधन करत आहेत ते माझ्यामतेतरी आधुनिक युगातले भारताचे ऋषीमुनी व कर्माने ब्राम्हणच आहेत की नै........होय ना ?तुम्हाला नाही का तसे वाटत ??? मग उगाचच एखाद्या समाजाविरुद्ध बोलत आहात असे वाटावे अशी वाक्ये का वापरताय ???

बघा विचार करून !!!

बाकी ; लेख न चुकता वाचनीय झालाय हे नक्की
पुनश्च अभिनंदन व धन्यवाद

~वैवकु Happy