गॅलरीत वेणीफणी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 7 April, 2013 - 06:23

गॅलरीत वेणीफणी
करीत ती उभी होती
किणकिणत्या कंगणी
संगीत शिल्पच होती

मान करुनी तिरकी
बाजूस झुकुनी थोडी
कृष्णमेघ खांद्यावरी
जणू पौर्णिमाच होती

ओढाळ लाटा कुरूळ्या
शुभ्र सागर किनारी
झेलत होत्या इवले
सूर्य किरण सोनेरी

देत हलका झटका
दाराकडे ती वळता
वीज झळाळे नभात
मेघ पांगता पांगता

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रांत प्रभाकर,

मस्त कविता आहे. साधी सोपी म्हणूनच उठावदार झालीये. त्रयस्थ वर्णन आहे, तसेच कवी तिच्या प्रेमाबिमात पडलेला नाहीये हे फार चांगलं झालं. Happy

आ.न.,
-गा.पै.

छान Happy

किती साधं,सोपं,सुंदर चित्र.
सहमत गा.पै. अन वैभवशी.
'घरसे निकलतेही ' ..अगदी अगदी.

मला एक कविता आठवते........पुर्ण नाहि...कोणाला माहित असेल तर please टायपा.....

अंगणात उभी ती.... something..... केस वाळवीत ओले.....वेड्या मुसाफिराने त्याचेच गीत केले....

तसेच कवी तिच्या प्रेमाबिमात
पडलेला नाहीये हे फार चांगलं झालं.>>>>हाय हाय अगदी जबरी कमेंट......अगदी सहमत.....
या कवितेतले प्रसंग आजुबाजूला सदोदित घडतात आणि ते घडत राहणे ,हे कविमनाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक !