Submitted by मुग्धमानसी on 5 April, 2013 - 07:17
आजकाल त्यांना माझं काहीच कळत नाही म्हणे,
माझं वागणं बोलणं काहीच समजत नाही म्हणे...
येतात बसतात बोलतात जातात, पुन्हा वळून बघतात
उंबर्यावरती मी कधीच दिसत नाही म्हणे...
हजार शब्द सल्ल्यांचे अन् हजार समजुतीचे
ओतत राहतात ते, तरी मी भरत नाही म्हणे...
शून्य डोळे, शून्य मी अन् शून्य असते माझी वस्ती
आकडेमोड ही जगण्याची पण टळत नाही म्हणे...
नक्की कुठेशी कोंडलेलं अन् गुदमरलेलं वादळ असेल
सहज कधी पाऊस असा कोसळत नाही म्हणे...
तुझेच हसणे, असणे-नसणे, स्वतःत हरवून बसणे,
दुःख अताशा तुझ्या स्मृतींना बधत नाही म्हणे...
वाट चुकून सगळीच गावे पसार झालीत बहूदा
तरीच रस्ता अता कुठेही पोहोचत नाही म्हणे...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येतात बसतात बोलतात जातात,
येतात बसतात बोलतात जातात, पुन्हा वळून बघतात
उंबर्यावरती मी कधीच दिसत नाही म्हणे...
>> व्वा!!
शून्य डोळे, शून्य मी अन् शून्य असते माझी वस्ती
>> क्या बात!
वाट चुकून सगळीच गावे पसार झालीत बहूदा
> कैतरी गडबड वाटली मला.. किंवा मला अर्थ लागला नाही..
तरिच रस्ता अता कुठेही पोहोचत नाही म्हणे...
>> सुरेख!
शुले तपासाल का?
शुले म्हणजे शुद्धलेखन का?
शुले म्हणजे शुद्धलेखन का? कुठे कुठे गडबडले आहे सांगाल का?
"वाट चुकून सगळीच गावे पसार झालीत बहूदा" -या ओळीतून 'आयुष्याला कुठलेही ध्येय न उरणे' असे सूचित करायचे होते मला.
हो ग शुले म्हणजे
हो ग शुले म्हणजे शुद्धलेखनच!
कविता नेहमी प्रमाणेच आहाहा!
धन्यवाद रिया.
धन्यवाद रिया.
(No subject)
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद!
वा..........मस्तच !!
वा..........मस्तच !!
अहाहा>>>> रियाशी सहमत
अहाहा>>>> रियाशी सहमत
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद!
नेहमी प्रमाणे.. मस्त..
नेहमी प्रमाणे.. मस्त..
वा ! मस्तच ! >>>वाट चुकून
वा ! मस्तच !
>>>वाट चुकून सगळीच गावे पसार झालीत बहूदा
तरिच रस्ता अता कुठेही पोहोचत नाही म्हणे... <<< क्या बात है |
धन्यवाद विनायक, अवल...
धन्यवाद विनायक, अवल...
शेवटची द्वीपदी सर्वात आवडली.
शेवटची द्वीपदी सर्वात आवडली.
सुन्दर कविता मुग्धमानसी.
सुन्दर कविता मुग्धमानसी.
धन्यवाद!
धन्यवाद!
खूप छान आहे कविता... "नक्की
खूप छान आहे कविता...
"नक्की कुठेशी कोंडलेलं अन् गुदमरलेलं वादळ असेल
सहज कधी पाऊस असा कोसळत नाही म्हणे... " क्या बात है!!!
ही ओळ खूप आवडली....
मायबोलीवर मुग्धमानसीची नवीन
मायबोलीवर मुग्धमानसीची नवीन अप्रतिम कविता आलीय म्हणे..!
शून्य डोळे, शून्य मी अन्
शून्य डोळे, शून्य मी अन् शून्य असते माझी वस्ती
आकडेमोड ही जगण्याची पण टळत नाही म्हणे... - सही
नक्की कुठेशी कोंडलेलं अन् गुदमरलेलं वादळ असेल
सहज कधी पाऊस असा कोसळत नाही म्हणे... - मस्त
वाट चुकून सगळीच गावे पसार झालीत बहूदा
तरीच रस्ता अता कुठेही पोहोचत नाही म्हणे... सुपर
एकदम छान आहे कविता
मायबोलीवर मुग्धमानसीची नवीन
मायबोलीवर मुग्धमानसीची नवीन अप्रतिम कविता आलीय म्हणे..! >> +१
शून्य डोळे, शून्य मी अन् शून्य असते माझी वस्ती
आकडेमोड ही जगण्याची पण टळत नाही म्हणे...
नक्की कुठेशी कोंडलेलं अन् गुदमरलेलं वादळ असेल
सहज कधी पाऊस असा कोसळत नाही म्हणे...
हे जास्त आवडले!
धन्यवाद! मायबोलीवर
धन्यवाद!
मायबोलीवर मुग्धमानसीची नवीन अप्रतिम कविता आलीय म्हणे..! >>> ईश्य कैतरिच!!!
मुग्धमानसी, सुर्रेख्च. खरच
मुग्धमानसी, सुर्रेख्च. खरच आवर्जून वाचावं असं लिहितेस.
खूप धन्यवाद दाद!
खूप धन्यवाद दाद!
अप्रतिम सुंदर आहे कविता!!
अप्रतिम सुंदर आहे कविता!!
<<वाट चुकून सगळीच गावे पसार झालीत बहूदा
तरीच रस्ता अता कुठेही पोहोचत नाही म्हणे...<< खुप आवडलं.
धन्यवाद आर्या.
धन्यवाद आर्या.