कच्चा, सोललेला, चिरलेला आणि आठळ्यांचेपण पातळ काप केलेला फणसः साधारण ५ कप.
२ टेबलस्पून धणे, १ टेबलस्पून जिरे, अर्धा टीस्पून मिरे, ४ लवंगा, पहिलं पेरभर (आणि लेंथवाइक अर्धा केलेला) दालचिनीचा तुकडा, अर्धा टेबलस्पून बडीशेप. हळद, तिखट, मीठ. मोठी पळीभर टोमॅटो पेस्ट, भरपूर कोथिंबीर, १ मोठा कांदा. चमचाभर आलं किसून आणि हिरव्या मिर्च्या ऑप्शनल
कोरडे मसाले कच्चेच मिक्सरमधून बारिक करून घ्यायचे. कांद्या आणि आलं बर्यापैकी तेलात परतून घ्यायचं. यावर डायरेक्ट फणसाचे तुकडे घालायचे. त्यावर टोमॅटो पेस्ट घालून परतून घ्यायचं. आता सगळे मसाले, मीठ, हळद, तिखट घालून मसाल्यांचा कच्चा वास जाईपर्यंत परतायचं. झाकण ठेवून वाफ आणायची. अगदी कोवळा असल्यास फणस शक्यतोवर तेलाच्या वाफेवर शिजवायचा. जरा जून वाटला तर पाण्याचे शिपके देऊन वाफ काढून शिजवायचं. शेवटी भक्कम कोथिंबीर घालायची.
कच्च्या फणसाची ही भाजी आईची रेसिपी आहे. चवीला सात्त्विक अजीबातच नाही. चालेल का बघ. अप्रतीम लागते एवढं मात्र खरं
ही पाककृती माझ्याच विपुत लिहून विपौड्या मारण्यापासून वाचवल्याबद्दल सर्वप्रथम मृ चे आभार
क्षमा करा, फोटो टाकल्याशिवाय
क्षमा करा, फोटो टाकल्याशिवाय मत नोंदवू शकत नाही.
वैदर्भीयांकडे (हा शब्द थोडासा
वैदर्भीयांकडे (हा शब्द थोडासा भैय्यांसारखाच वाटतोय .. ;)) फणसाच्या भाजीच्या रेसिप्या असतील असं वाटलं नव्हतं हो ..
एकदम नॉन-ट्रॅडिशनल पद्धत वाटते आहे .. कधीतरी ट्राय करायला हवा .. (आयता चिरलेला, बर्यापैकी बरी क्वालिटी असलेला आणि खरोखरच कोवळा असलेला फणस मिळालाच कधी तर ..
क्षमा करा, फोटो टाकल्याशिवाय
क्षमा करा, फोटो टाकल्याशिवाय मत नोंदवू शकत नाही.>>
का बरे. तोंपासु नाही का?
पहिलं पेरभर >>> आल्याचा
पहिलं पेरभर >>> आल्याचा तुकडा पहिल्या बोटाला लावून मापून बघणारी सुग्रण डोळ्यांसमोर आली.
छान आहे ही पण पाकृ. पण फणसाच्या भाजीला कांदा-टोमॅटो घातला तर मला अनेक तु.क. झेलावे लागतील. भाजीकडे तर कोणी ढुंकूनही बघणार नाही. त्यामुळे सायो डोंबिवलीत येईल तेव्हा करेल आणि मला खायला बोलावेल या आशेवर मी
बरं, 'विपुतल्या रेसिप्या' अशी लेखनखूण द्यायची ना सगळीकडे? मी करते बदल.
छान आहे ही पण पाकृ. पण
छान आहे ही पण पाकृ. पण फणसाच्या भाजीला कांदा-टोमॅटो घातला तर मला अनेक तु.क. झेलावे लागतील. भाजीकडे तर कोणी ढुंकूनही बघणार नाही. त्यामुळे सायो डोंबिवलीत येईल तेव्हा करेल आणि मला खायला बोलावेल या आशेवर मी>>>> यात डोंबिवलीत ऐवजी पुण्यात करून बाकी पोस्टला +१!
अजून तरी फणसाच्या भाजीची टेस्ट सासरी कोणाला माझ्याइतकी आवडली नाहिये. आईने करून पाठवली होती उकडगर्यांची आणि एकदा पार्याची भाजी, पण ती पहिल्यांदा वाढलेलीच घेतली सगळ्यांनी. मी उरलेली डबाभर भाजी चवीचवीने खात होते!
कोवळे फणस बाजरात आलेत!
कोवळे फणस बाजरात आलेत! त्यामुळे ही भाजी आता लगेचच करणार! छान रेसिपी बद्दल धन्यवाद!
विपूतल्या पाकक्रुतीचा खजिना आम जनतेसाठी खुला केल्याबद्दल धन्यवाद!
फणसाच्या भाजीत टोमॅटो आणि
फणसाच्या भाजीत टोमॅटो आणि भारंभार मसाले...फणसाची चव मारणार वाटते....