Submitted by विदेश on 29 March, 2013 - 09:27
तू असताना चंद्रचांदणे
तू नसताना खिन्न स्फुंदणे
तू असताना श्वास हवेसे
तू नसताना फक्त उसासे
तू असताना मधुर कहाणी
तू नसताना फक्त विराणी
तू असताना मंगल प्रभात
तू नसताना काजळ रात
तू असताना सुरेल सनई
तू नसताना फक्त जांभई
तू असताना जग हे हसते
तू नसताना सगळे फसते !
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान ..... विरोधाभास छान
छान ..... विरोधाभास छान मांडलाय.
-------------------------------------------------------------------------
अवांतर : मला माझ्या अपूर्ण कवितेची आठवण झाली.
"तू असताना सवे, काळ हा वायूवेगे जाइ पुढे
तू नसताना का मग त्याला कूर्मगतीचा रोग जडे"
पूर्ण करायचा मूड्/योग कधी येणारे देव जाणे
उल्हासराव, लवकर येऊ द्या मूड
उल्हासराव, लवकर येऊ द्या मूड . पटकन लिहा.
धन्यवाद आणि शुभेच्छा .
छान.
छान.
विदेश जी विरोधाभास उत्तम
विदेश जी
विरोधाभास उत्तम जमलाय व तुलना ही साधी पण छान
हे मात्र
>>तू असताना सुरेल सनई
तू नसताना फक्त जांभई >>
ऐवजी
>>तू असताना सुरेल सनई
तू नसताना फक्त आरोही अन अवरोही>>
कसे वाटतेल?
रेव्यु, आपण सुचवलेला बदलही
रेव्यु,
आपण सुचवलेला बदलही चांगलाच आहे .
धन्यवाद .
बी , आपल्या प्रतिसादाबद्दल
बी ,
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार .
छान!
छान!
रिया. , प्रतिसादाबद्दल आभार !
रिया. ,
प्रतिसादाबद्दल आभार !