धुळवड (चिखलफेक)

Submitted by उद्दाम हसेन on 27 March, 2013 - 01:23

कालपासून शिमगा हा सण चालू झाला. आज धुळवड. आज चिखलफेक करण्याचा दिवस. ज्यांच्यासाठी हा रोजच्या सरावाचा भाग आहे त्यांना त्यात विशेष ते काय वाटणार ? पण शिमगा अचानक दिसेनासा झाल्याने माझ्या बॅन झालेल्या आइअपी अ‍ॅड्रेसप्रमाणे हा धागाही उडाला कि काय असे वाटून आश्चर्य वाटले.

आश्चर्य याच्यासाठी कि हा धागा सुप्रब्रह्मेंसाठी होता. त्यांची मार्गदर्शक ठरू शकतील अशी वक्तव्ये त्यावर एकत्रित करण्यात येत आहेत. ज्या सदस्याच्या कुरकुरीवरून माझ्या धाग्यावरच्या त्याच्या पोस्टी प्रशासनाला गेल्या तीन महिन्यापासून उडवता आलेल्या नाहीत, ज्या सदस्याला उत्तर दिले की सदस्य बॅन होतात तो सदस्य इथला हिरा असला पाहीजे असा आमचा कॉमन सेन्स सांगतो. अशा सदस्याची वक्तव्ये संस्थळास कमीपणा आणणारी कशी बरं असू शकतील ? प्रशासनास लाज वाटेल असं ते कधीतरी वक्तव्यं करू शकतील का ?

त्या बाफचा शोध घेता असं आढळलं कि तो ग्रुपपुरता मर्यादीत करण्यात आलेला आहे.
http://www.maayboli.com/node/42107
या लिंकवर वाचकांना त्याचा लाभ घेता येईलच.

नवीन साहित्यिकांना मार्गदर्शन, रोमातून वाचणा-यांसाठी सदस्यत्वाची प्रेरणा हे सगळं त्यामुळे होणार आहे. आता रोमातून वाचणे शक्य होणार नाही. वाचकांनी सदस्यत्व घेऊन ललितलेखन या ग्रुपचे सदस्यत्व घेतल्यास आपल्याला तो धागा वाचता येईल. कृपया संधीचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती.

( जे कुणी रडीचा डाव खेळतात त्यांच्याकडे पक्षपातीपणा वगैरे शब्दांसाठी जागा नसते - एक महान व्यक्ती )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्रा किरण,

तुमच्या दोघांतले वेगळ्या ठिकाणी का सेटल करून घेत नाहीत?

उगाच मायबोली प्रशासनावर रोज कशाला अनावश्यक चिडचिड?

तुझ्या ह्या रोजच्या धाग्यांचे आता हसूही येईनासे झाले आहे.

मन मोकळे करायचे असल्यास माझ्या भ्रमणध्वनीवर फोन करशील....स्वागतच आहे!

अवांतर : मला हा प्रतिसाद द्यायला प्रशासनाने किंवा तुला वाटेल त्या माणसाने सांगीतलेले नाहीये ह्याची नोंद घे. केवळ मित्रत्वापोटी हे सांगावेसे वाटत आहे.

अती होऊन आधीच ह्सू झालेले आहे, आता मनःशांती हाच एकमेव उपाय दिसत आहे मलातरी.

मित्रा
पाटील

काय झालेय हे समजल्याने संस्थळाची बदनामी होईल असे आपल्याला का वाटते ?

माझे हसु होण्याची काळजी करू नका. जिथे तुमच्या मित्राची बदनामी होतेय असा संशय येईल तिथे आपण असता यात शंका नाही. मागे एका कवयित्री बद्दल त्यांचा एक असभ्य उद्गार आपण कॉपी पेस्ट केला होता ते निरागसपणे मी आपल्या लक्षात आणून दिलेले होते. त्या वेळी आपण एक सभ्य गृहस्थ आहात अशी धारणा होती. ते लक्षात आणून दिल्याने माझीच बदनामी होणे आणि नाहक डूख धरणे हे प्रकार घडतील याची जाणिव नव्हती. आपण हाच सल्ला स्वतःबाबतीत अंमलात आणल्यास मला अधिकच आनंद होईल.

मायबोली प्रशासनास किरणच्या धाग्यावरील घाण उडवण्यापेक्षा आयडी बॅन, आयपी अ‍ॅड्रेस बॅन, धागा मर्यादीत करणे हा खेळ खेळण्यात जास्त मजा येत आहे.
प्रशासनालाच मजा येतेय तर आम्ही काय घोडं मारलंय !!!

पाटीलबुवा

ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येणार नाही ते तुम्हाला विचारत नाही. पण इथे येऊन संभावितासारखे सल्ले देताय तर

१. तुम्ही भ्रमणध्वनी का केला नाही ?
२. बेफिकीर या तुमच्या मित्राच्या माझ्या धाग्यावरच्या प्रतिक्रिया तुम्हाला योग्य वाटतात का ?
३. प्रशासनास त्या उडवणे अवघड आहे असं तुमचं मत झाले आहे का ?
४. मी मायबोली सोडलीये हे माहीत असताना बेफिकीर अनेक आयड्यांच्या माझ्याबद्दल कुरापती काढत असताना आपण त्यांचं बौद्धीक घेतलंय का ?

या प्रश्नांची उत्तरे द्या आणि मग आपण गप्पा मारू.

१. तुम्ही भ्रमणध्वनी का केला नाही ?

>>>माझ्याकडचा नंबर गहाळ झालाय हँडसेट बदलल्यामुळे

२. बेफिकीर या तुमच्या मित्राच्या माझ्या धाग्यावरच्या प्रतिक्रिया तुम्हाला योग्य वाटतात का ?

>>>मी शीर्षक बघूनच ठरवतो धागा वाचायचा की नाही ते, तू म्हणतोयस तो कोणता धागा आहे हे मला ठाऊक नाही. माझे आयुष्य केवळ आंतरजालातल्या फुसक्या घटनांनी व्यापलेले नाही त्या गोष्टींचा जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्यांचाच विचार करायला.

३. प्रशासनास त्या उडवणे अवघड आहे असं तुमचं मत झाले आहे का ?

>>>धागाच वाचलेला नाही त्यामुळे नो कॉमेंट्स.

४. मी मायबोली सोडलीये हे माहीत असताना बेफिकीर अनेक आयड्यांच्या माझ्याबद्दल कुरापती काढत असताना आपण त्यांचं बौद्धीक घेतलंय का ?

>>> सोडलीये???? मग आता कोण बोलतेय इथे? सोडण्यासाठीचे प्रयत्न दिसून येतात तुझे पण खरे तर तुला सोडायचीच नाहीये असे वाटते ह्या प्रकारांवरून

त्या वेळी बुरखा घेऊन तसे असभ्य वक्तव्य एखाद्या सदस्याच्या कवितेच्या धाग्यावर लिहीणा-या सदस्याचा आयपी अ‍ॅड्रेस आणि नेहमीच्या आयडीचे नाव तत्काळ जाहीर झाले असते तर आज इथे सल्ला देण्यासाठी यायची कुणाला हिंमत झाली नसती.

माहिती करून न घेता, न वाचताच सल्ला देणा-याला काय म्हणतात तुमच्याकडे ? Lol

पाटला
मी म्हटलं ना, ज्या प्रश्नांची उत्तरे तुला देता येणार नाहीत... चल सोड. तुझ्या मित्रापेक्षा तू जास्त हास्यास्पद निघालास.

माहीती करून घ्यायची काय गरज आहे. तुझ्या ह्या सगळ्या लेखांमधे तू स्पष्ट कुणाचे नावच घेतलेले नाहीयेस.

तू सैरभैर झालायेस किरण्या..... काय करू आणि काय नको असे तुला झालेले आहे हे स्पष्ट दिसत आहे.

एनीवे, तुझी अवस्था तुला लखलाभ!

माझ्याकडून हे प्रकरण बंद.

तुला सोडून ते सर्वांना कळालेले आहे Lol

प्रशासनाला नक्कीच माहिती असेल. कशासाठी कारवाई केली, आणि तीन महीने माझ्या बाफवरची प्रतिक्रिया का साफ झाली नाही. तू मधे पडण्याचं कारणच नाहि, कारण तुला काहीच माहिती नाही. तुला फक्त मित्राची बाजू घेताना आपण काय कॉपी पेस्ट करतो आहे याची सुद्धा शुद्ध राहत नाही.

आधी शुद्धीत राहून कॉपी पेस्ट करायला शिक.

माझ्याकडून हे प्रकरण बंद. धन्यवाद

भ्रमणध्वनी गहाळ झाला तरी अनेकांकडे माझा नंबर आहे. ज्याच्यासाठी तू इथं धावतपळत आलास त्याच्याकडेही. कॉमनसेन्स वापरला असतास तर नंबर मिळवून बोलला असतास. जर माझ्यासाठी तुझ्या भावना सच्च्या असत्या तर...

इथे येऊन शहाणपणा केला नसतास.

या वादात इतरांनी पडायचं कारण नव्हतं.

त्या दुस-या बाफवर देखील सुपरब्रह्मे म्हणून कुणाचा उल्लेख होतोय याची कल्पना नाही. पण ती वक्तव्ये एकाच व्यक्तीची असतील तर त्याला उपचारांची गरज आहे हे नक्की. मात्र त्या व्यक्तीसाठी वेळ खर्चावा या पात्रतेची ती नसावी हे त्या वक्तव्यावरून लक्षात येते आहे. मुळात ते अनेकांना आधीपासूनच ठाऊक असण्याशी शक्यता आहे.

तात्पर्य : थांबणे श्रेयस्कर

मी शीर्षक बघूनच ठरवतो धागा वाचायचा की नाही ते, >>>

विदिपा, ब-याचशा चांगल्या धाग्यांवर तुमचा सहभाग का दिसत नाही हे लक्षात आलं. धुळवड, शिमगा अशी शीर्षकं असतील तरच तुम्ही धागा उघडता असं दिसतंय Wink

^^
मी ठरवलं होतं त्या प्रकरणाबद्दल बोलायचं नाही. पण ठराविक लोकांच्या पोस्टी डिलीटच होत नसतील तर मग..

एका महिलेला उद्देशून इथल्या एका महान व्यक्तिमत्वाने तुला मूळव्याध आहे का असा प्रश्न विचारला होता. ती पोस्ट या विदिपाने कॉपी पेस्ट केलेली. मूळ पोस्ट उडवल्यावरही विदिपांनी ती पोस्ट कॉपी करून आपल्या प्रतिसादात डकवल्याने त्या कारवाईला अर्थ राहत नव्हता. म्हणून विदिपांना मी लक्षात आणून दिल्यावर ती पोस्ट डिलीट झाली.

आता इथे सूज्ञपणाचे सल्ले देणा-या विदिपांची अक्कल तेव्हां काय शेण चरायला गेली होती का ? आणि ते महान व्यक्तिमत्व प्रशासनाला कसं चालतं हे विदिपांना जास्त चांगलं ठाऊक असेल.

त्याच दिवशी चातकला मी ती पोस्ट कुणी टाकली हे कळलंय असा खडा टाकून पाहिला. त्यावर त्याची अवस्था सैरभर झाली होती. काय झालंय सांग नाहीतर मला हार्ट अ‍ॅटॅक येईल असं त्यानं चक्क विणवलं होतं. आणि गंमत म्हणजे हीच अवस्था संसर्गजन्य रोगाप्रमाणे आपल्या त्या महान व्यक्तिमत्वाचीही झाली होती. दोघंही सारखेच सैरभैर झाले होते.

रात्री उशिरा "जानी" या आयडीला महान व्यक्तिमत्वाची विपू आली. "आय नीड युवर सपोर्ट "
आजवरचं ते सर्वात विनोदी वाक्य होतं मायबोलीवरचं.
त्यानंतर कुणी तो आयडी खरा आहे म्हटलं काय, फोनवरून बोललो, कन्फर्म केलं वगैरे म्हटलं काय त्यांचं त्यांना लखलाभ.

चला बाय. धन्यवाद.

किरण तुझी (एकेरी बोलले तर चालेल का?) पोस्ट वाचून (रादर तुझ्या पोस्ट्स वाचुन) आंतरजालावरची भांडणे खुप मनावर घेतली तर खर्‍या आयुष्यातली मनःशांती कशी ढळते हेच पुन्हा-पुन्हा जाणवते आहे.

तू करतो आहेस ते चुक कि बरोबर हे सांगण्याइतकी मी मोठी नाही. पण स्वत:ला एकदा विचार..

"Is it worth?"

"Does the person about whom you are writing so much deserves occupying such a big part of your brain/time?"

तुझे तुच ठरव..

Does the person about whom you are writing so much is deserves occupying such a big part of your brain/time?

NO

Thanks Piyu Pari.

मी मायबोली सोडून तीन महीने झाले. मायबोली सोडण्याचं कारण एव्हाना सर्वांच्या लक्षात आलेच असेल. माझ्या बाफवर बेफिकीर या सदस्याने घाण करूनही आणि प्रशासनाच्या लक्षात आणून देऊनही त्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांनी या पोस्टस उडवल्या नाहीत. विशेष म्हणजे या बाफचं कारण काय आहे याबाबत मी बेफिकीरशी बोललो होतो. फोनवरून रिक्व्सेस्ट केली होती. मायबोली सोडल्यानंतर बेफिकीर या सदस्याच्या मी वाटेला गेलो नाही. पण ज्या सदस्याला तो माझा ड्युआय आहे असा बेफिकीरचा समज होता त्याला बेफिकीरने त्रास दिलेला आहे. एका सदस्याला घाणेरडी कमेण्ट केली आहे. गेल्या आठवड्यात हे जास्त झाल्यावर बेफिकीरच्या गझलुमियां, खवटुन्निसा, खवचटखान, कावळा, गंभीर समीक्षक, तिलकधारी इ. सदस्यांच्या शैलीत उत्तर दिल्याबरोबर माझा आयडी डिलीट झाला.

प्रशासनाच्या या रडक्या डावाचे वाभाडे काढण्यासाठी माझ्या आयुष्यातला अर्धा दिवस या कामासाठी वाया घालवला. देवाने मला लिखाणाची कला दिलेली आहे, ज्याची मला जाणिव आहे. आजवर ही कला विकलेली नाही, प्रसिद्धीसाठी वापरलेली नाही याची साक्ष त्या देवाला आहे. कुठलाही आयडी लपवलेला नाही. बाबूराव हा देखील माझाच आयडी आहे. त्याने देखील विचित्र पद्धतीने का होईना निर्मितीच केली आहे.

बेफिकीर सारख्या अमूक एका सदस्याला मायबोलीवरून घालवीनच अशा प्रतिज्ञा करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. खरंच कालचं माझं नुकसान हे रु. पाच लाखपर्यंत गेलं. त्याची फिकीर नाही. काही वेळा त्यावर पाणी सोडावं लागतं.

आयुष्यात यशस्वी आहेच. लिखाणालाही योग्य ते व्यासपीठ मिळतेय याचं समाधान आहे. बस फक्त नाहीये ती वेळ. या वेळेअभावी नेटचा वापरही ऑफीसमधे तुकड्या तुकड्यात केलाय. सलग वेळ असता तर कुठल्या न कुठल्या गप्पांच्या धाग्यावर मी दिसलोच असतो. त्यातूनही जो काही फावला वेळ काढला त्यात कविता पोस्ट केल्यात. काही वेळा आयुष्यात अशा आल्या कि व्यवसायातलं टेण्शन प्रचंड वाढलं. जे कुणासोबतही शेअर करता येत नव्हतं. त्या वेळी भान हरपून कथा लिहील्या. त्या वेळी स्वतःला विसरण्यासाठी मला ड्युआयचा फायदा झाला. त्याचा वापर टोपणनावासारखा करता आला. त्याहून जास्तच. खरंच सांगतो, कथा लिहून झाल्यावर जरी थकवा आला तरी त्या वेळी मिळालेल्या समाधानातून आणि मन एकाग्र झाल्याने टेण्शन्स कुठल्या कुठे पळालीत.

वेळेचा अभाव आहे. त्या बाबतीत मी अक्षरशः भिकारी आहे. वेळ खरेदी करायलाही मी तयार आहे. वेळ बेफिकीर यांच्याकडे आहे, ज्यासाठी मला खरंच हेवा वाटतो. वेळेच्या बाबतीत बेफिकीर अत्यंत श्रीमंत आहेत. खरंच चांगल्याचा चांगलं म्हणायलाच हवं. त्यांच्याकडून वेळ विकत मिळाला तर अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत.

धन्यवाद आणि फुलस्टॉप.

(ता.क : पुढच्या गटगला मोहिनी पवार आल्यास तिचेही फोटो टाकायला विसरू नये ही नम्र विनंती :हाहा:)

धन्यवाद.

बाबूराव हा देखील माझाच आयडी आहे. त्याने देखील विचित्र पद्धतीने का होईना निर्मितीच केली आहे.
>>>>>>>>>>
हडळीचा मुका.. या शतकी धाग्यावाले बाबूराव का?