पेट्रोल पंपावरील फसवा-फसवी

Submitted by अनया on 22 March, 2013 - 03:25

पेट्रोल पंपावरील फसवा-फसवी
आपल्यातले बरेच लोक वाहन चालवत असल्याने पेट्रोल पंपांशी सतत संबंध येतो. पेट्रोल भरण्याचे अत्यावश्यक पण तरीही कंटाळवाणे काम करताना आपण बहुधा कुठूनतरी कुठेतरी जायच्या घाईत असतो. पंपावर सदैव गर्दी असते. त्या झटापटीतच दुचाकी असेल तर तिचा आणि स्वतःचा तोल सावरा, टाकीचे झाकण उघडा, तिथला शून्याचा आकडा नीट बघा, तेवढ्यात काहीतरी विकू पाहणाऱ्यांना किंवा लकी कुपन वाल्यांना तोंड द्या, सुट्टे पैसे घ्या अश्या असंख्य गोष्टींचे व्यवधान सांभाळावे लागते.
चार चाकी असली, तरी व्यवधाने असतातच. ह्या सगळ्या गोंधळाचा फायदा तिथल्या लोकांनी न घेतला, तरच नवल! मी मला आलेल्या दोन फसवणुकीच्या प्रयत्नांच्या अनुभवांनी सुरवात करते आहे. तुम्हीही तुमचे अनुभव लिहा आणि फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, तेही लिहा.

१ शहर: पुणे, टिळक रस्त्यावरील पेट्रोल पंप.

मी माझ्या दुचाकीत ३०० रुपयांचे पेट्रोल भरायला सांगितले. तिथल्या माणसाने ७० रुपयांचे पेट्रोल भरले. ‘अहो, मी तीनशे रुपयांचे सांगितले होते.’ ‘हो का, मी सत्तर ऐकल. अजून टाकतो,’माणूस. अस म्हणून त्याने मला मशीनवर २३०चा आकडा दाखवला. ‘तुम्ही एकूण २३० रूपयांचच पेट्रोल टाकल’ माझा निषेध. ‘नाही हो ताई. मी झीरोनंतर २३० रूपयांच भरल’
माझ्या गाडीच्या इंडीकेटरवरून मला कळल, की तस झालेलं नाहीये. मी आवाज चढवून त्याला मॅनेजरला बोलवायला सांगीतल. तो लगेच नरमला. ‘ कशाला ताई, इथेच कळेल’ अस म्हणून त्याने मशीनवर काहीतरी खाडखूड करून चूक मान्य केली, आणि मला अजून सत्तर रुपयांचे पेट्रोल भरून दिले.

१ शहर: पुणे, टिळक रस्त्यावरील तोच पेट्रोल पंप.

मी माझ्या दुचाकीत ३०० रुपयांचे पेट्रोल भरायला सांगितले. मागच्या अनुभवावरून ऐकण्यात गोंधळ होऊ नये म्हणून विक्रेत्याकडून ३०० रुपये वदवून घेतले. पेट्रोल भरल्यावर १००० रुपयांची नोट दिली. त्याने त्याच्या हातात शंभरच्या सात नोटा मोजल्या. माझ्या हातात घाईघाईने कोंबल्या. ‘चला मॅडम, गाडी पुढे घ्या’ अशी घाई करायला लागला. मी ठामपणे तिथेच थांबून हातातल्या नोटा मोजल्या. त्या सहाच होत्या! मी तसे दाखवून दिल्यावर दात काढत त्याने खाली पडलेली एक शंभराची नोट माझ्या हातात कोंबली. ती चुकून खाली पडली होती की मुद्दाम टाकली होती? तुम्हीच ठरवा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ झक्की...

"...ही फसवाफसवी भारतात चालते कारण चालवून घेतात. शिवाय अहो ते गरीब आहेत, त्यांचा नाइलाज आहे असे म्हणून लोक सोडून देतात...."

- यू सेड इट. अर्थात इथे 'नाईलाज' ला एक वेगळी छटा आहे, आणि त्याला कारणीभूत ग्राहकच असतो.... मी वर एका प्रतिसादात म्हटल्यानुसार जर [किरकोळ का असेना] फसवाफसवीबद्दल जागेवरच वाद घालत बसलो तर माझ्या मागे असलेले आपलेच बंधू {आणि कित्येकप्रसंगी भगिनीसुद्धा} मलाच वेड्यात काढतात...."काय हा माणूस, ५० पैशाकरता आमचा खोळंबा करून राह्यलाय...!".

नेमकी हीच सार्वजनिक म्हटला जाणारी प्रवृत्ती पंपावरील अटेन्डंट्सनी हेरली आहे, बेमालूमपणे....आणि वाद घालणार्‍याचा अगदी कात्रज करून टाकतात.

बाकी... तुम्ही अन् डेलिया यानी अमेरिकेतील "ऑटो पेट्रोल पंप" ची उदाहरणे दिली आहेत, ती मी कित्येक हॉलीवूडपटातून पाहत आलो आहे. याबाबत मला एक शंका आहे की, समजा पंपावर जाऊन तुम्ही स्वहस्ते आपल्या वाहनात पेट्रोल [अमेरिकेन भाषेत "गॅसोलिन"] भरले तर त्याचा दर वेगळा आणि तिथे असलेल्या कामगाराने जाग्यावर येऊन तुम्हाला ती सर्व्हिस दिली तर त्याचा दर वेगळा {किंवा जादाचा} असतो का ?

असे असते हे ऐकले आहे....[वाचलेले नाही].

अशोक पाटील

नाही दर जिथे दाखवला आहे तोच असतो.

अर्थात एकाच गावात दोन वेगवेगळ्या पंपांवर दोन वेगवेगळे दरही असतात.५ ते२० सेंटचा फरक असू शकतो.

केदार, मी सेल्फ सर्विस आणि फुल सर्व्हिस (अटेण्डंट भरतो) चा दर वेगवेगळा बघितला आहे बर्‍याच ठिकाणी. न्यू जर्सी मधे वरती बोर्डवर असलेल्या दराने अटेण्डंट ने भरले होते बहुधा (झक्की म्हणतात त्याप्रमाणे सेल्फ सर्विस नसेल तर एकच दर असेल).

अशोकजी, प्रत्येक राज्यातील गॅसोलीन च्या क्वालिटीचे (मुख्यतः प्रदूषणाबाबत) निकष वेगळे असल्याने तेथे कोणत्या प्रकारचे पेट्रोल चालते हे बदलते व त्यामुळे दरही बदलतो. कॅलिफोर्नियाचे निकष प्रचंड स्ट्रिक्ट असल्याने इतर ठिकाणपेक्षा साधारण १ डॉ ने जास्त असतो.

तसेच एका शहरात अक्षरशः अर्ध्या मैलाच्या परिसरात असलेल्या ४-५ पंपांवर वेगवेगळे दर असतात. काही ठिकाणी "कॅश" दिली तर स्वस्त मिळते, क्रेडिट कार्डचा दर थोडा जास्त असतो.

आणखी एक म्हणजे उन्हाळ्यात लोक जास्त ड्राइव्ह करतात त्यामुळे दर वाढतात व हिवाळ्यात कमी होतात Happy

त्यात पुनः क्रेडिट कार्ड वापरणार असाल तर दर वेगळा, नि रोख पैशाला वेगळा असे सर्रास दिसते. गॅलनला निदान १० सेन्ट जास्त. कारण आजकाल म्हणे क्रेडिट कार्डवाले व्यापार्‍यांना जास्त फी लावतात.

पण गंमत! आज आमच्याकडे आत्ता दर गॅलनला तीन डॉ. चाळीस सेंट रोख व ३:५० क्रेडिट कार्डने. आमच्या क्रेडिट कार्डाने सांगितले तुम्ही जानेवारी ते मार्च गॅस घ्यायला क्रेडिट कार्ड वापरले तर आम्ही ५ टक्के तुम्हाला परत करू. आता उद्योग नसल्याने हिशेब करत बसायचे - ३.५० च्या ५ टक्के म्हणजे १५ पेक्षा जास्त सेण्ट तरी परत मिळतील, म्हणजे गॅस ३:४० पेक्षा कमीच! रोख पेक्षा स्वस्त!

ज्या प्रमाणात पेट्रोल वापरत असाल त्या प्रमाणात काही लोकांना ही रक्कम लक्षात घेण्याजोगी वाटते. किंवा जरूरीपेक्षा जास्त पैसे का द्यायचे हेहि तत्व असते.
उगाच जास्त खर्च करून आपण किती श्रीमंत आहोत हे जगात सांगणार कुणाला, नि कुणाला त्याचे कौतुक? कुणीही उठून कर्ज घेऊ शकतो नि श्रीमंत होतो.

भारतातल्यांना हे कळणे कठीणच!
कारण नुसते आकडे पाहिले तर इतके क्षुल्लक वाटतात. शिवाय भारतात सर्वांजवळ हजार कोटी रुपये असतात, त्यातून दयाळू वृत्ति. मग परवडते, जाउ दे, गरीब आहे असे म्हणून सोडून द्यायला.

बाकी ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या. मग पैशाचे काय घेऊन बसलात? पेट्रोल पंप वाल्यांशी भांडणे याला आपल्या आयुष्यात एकंदर किती महत्व आहे? इतर उद्योग नि काळज्या नाहीत का? त्यापेक्षा आपलेच काम आणखी चांगले कसे करता येईल वगैरे विचार करा.

बाकी ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या. मग पैशाचे काय घेऊन बसलात? पेट्रोल पंप वाल्यांशी भांडणे याला आपल्या आयुष्यात एकंदर किती महत्व आहे? इतर उद्योग नि काळज्या नाहीत का? त्यापेक्षा आपलेच काम आणखी चांगले कसे करता येईल वगैरे विचार करा.
<<

41.gif

शेल च्या पंपावर नेहमीच खुप चांगला अनुभव आहे. गाडीवरुन/ गाडीतुन ड्रायव्हर सकट सगळ्यांना खाली उतरायला लावतात. नमस्कार करतात. ० दाखवतात. आपण ते पाहिले आहे याची खात्री करुन मगच पेट्रोल भरायला सुरवात करतात. पेट्रोल भरुन झाल्यावर पैशाची देवाण घेवाण होते.

पेट्रोल पंप वाल्यांशी भांडणे याला आपल्या आयुष्यात एकंदर किती महत्व आहे? इतर उद्योग नि काळज्या नाहीत का

असा विचार सर्वानी केला तर मायबोली निम्मीबंद पडेल.

शेल च्या पंपावर नेहमीच खुप चांगला अनुभव आहे. गाडीवरुन/ गाडीतुन ड्रायव्हर सकट सगळ्यांना खाली उतरायला लावतात. नमस्कार करतात. ० दाखवतात. आपण ते पाहिले आहे याची खात्री करुन मगच पेट्रोल भरायला सुरवात करतात. पेट्रोल भरुन झाल्यावर पैशाची देवाण घेवाण होते.

>>>
हो पण मला फार राग येतो...
गाडी वरुन कशाला उतरायला लावतात? Angry
कित्येकदा माझी बॅग, मित्राची बॅग, माझं हेल्मेट ( जेंव्हा असतं तेंव्हा ), त्याचं हेल्मेट,, स्कार्फ, मोबाईल्स इतकं सगळं सांभाळत त्या गाडी वरुन उतरावं लागतं Angry
कधी कधी उशीर झालेला असतो तेंव्हा तर जाम वैताग येतो... म्हणुन मी गाडी वर असले की त्याला त्या पंपावर गाडी नेऊच देत नाही... मी नसताना तिकडे पेट्रोल भरत जा असं सांगते. Angry

गाडी वरुन कशाला उतरायला लावतात? >>> Lol दिलंय की उत्तर- ० दाखवायला!!

कमाल आहे. ० दाखवत नाहीत हे फसवणूकीचं एक कारण आहे. ते आवर्जून ० दाखवतात तरी राग!! Happy

सातारा रस्त्यावर दोन पंप शेजारी शेजारी आहेत. एकावर हमखास भेसळयुक्त पेट्रोल असतं. दुसर्‍यावर पेट्रोल चांगलं असतं, पण फसवणूक- अ‍ॅज इन ० न दाखवणे, एकाशेजारी एक दोन मीटर असतात, त्यामुळे आपल्या वाहनात नक्की कुठून पेट्रोल भरलं जातंय हे न कळू देणे, बोलण्यात गुंतवणे, गचके देत पेट्रोल भरणे- हे सगळं यथास्थित चालतं. अटेन्डन्ट टपलेलेच असतात. तुम्ही बेसावध असलात की गेलेच पैसे. एखादाच अटेन्डन्ट चांगला आहे तिथला.

अग ० काय गाडीवर बसुन दिसत नाही का? Uhoh
चारचाकीतुन ड्रायव्हरला उतरायला लावतात हे मी समजु शकते पण दुचाकीवर का?
आणि सगळ्यांना कशाला उतरायला लावायच?

पण दुचाकीवर का?>>> दुचाकी कुठली आहे? पोटात पेट्रोल टाकी असलेली दुचाकी असेल तर सगळ्यांनाच उतरायला हवं, त्याशिवाय टाकी उघडून पेट्रोल कसे भरणार? नाही का?

छातीत पेट्रोल टाकी असलेली दुचाकी असेल तर त्यांनी सांगितलं म्हणून उतरायला हवंच का? 'बसल्या जागेवरूनच ० दिसतंय' असं सांगता येतं की... आणि ते ऐकतातही Wink

कित्येकदा माझी बॅग, मित्राची बॅग, माझं हेल्मेट ( जेंव्हा असतं तेंव्हा ), त्याचं हेल्मेट,, स्कार्फ, मोबाईल्स इतकं सगळं सांभाळत त्या गाडी वरुन उतरावं लागतं >>> स्कार्फ बांधून हेल्मेट घातलेल्या स्थितीतच उतरलं तरी चालतं. एटिएमसारखा नियम नाही पेट्रोलपंपावर Happy मित्राला सुद्धा हेल्मेट डोक्यावरच ठेव असा सूचनावजा सल्ला द्यावा. आणि मोबाईल हातात कशाला धरायला पाहिजे? खिशात किंवा पर्समधे ठेवावा.

मागच्या महीन्यात मगरपट्टा चौकातील भारतपेट्रोलियम पंपात पेट्रोल भरताना माझ्या समोरील गाडीवाल्याने ५०र. चे भरले. मी २००रु. चे मागताच ५० पासूनच टाकायला सुरुवात केली. मी ओरडलो व १००र. च्या रिडींगवर थांबवले व भांडायला लागल्यानंतरही तो एकायलाच तयार नव्हता होता आणी मीटर ० च होते म्हणून माझ्यावर तणतणायला लागला. मी शेवटी ऑफिस मध्ये जाऊन म्यानेजरशी भांडलो व म्यानेजरने ऊरलेले १५० चे पेट्रोल भरून दिले.
सगळ झाल्यावर मी पुन्हा त्या माणसाकडे वळून पाहिल्यानंतर तो व आणखी एक जण दात काढत मला हसत होते आणी इतर ग्राहंकासमोर मला दबक्या आवाजात शिवीगाळ करत होते. विशेष म्हणजे इतर ग्राहकही त्यांच्या हसण्यात सामील होत होते. काय म्हणावे याला!
त्यानंतर कधीही त्या पंपात गेलो नाही व सर्व कलीग्सन त्या पंपातला अनुभव सांगीतला आहे. असो, आतापर्यंत फक्त RTOसमोरील पंपातच नेहमी चांगला अनुभव आला आहे.

हिंजवडी ला जाणार्‍या लोकांनी Shell च्या पंपा वर पेट्रोल भरावे. अश्या गोष्टी कधी ही होत नाहीत.

नाहीतर मला HP चा अनुभव चांगला आहे, त्यात सुद्धा शक्य असल्यास कंपनी संचालित पंपा वर भरावे.

Indian Oil वर कधीच भरु नये.

फक्त आयालाच माझा त्रागा कळाला Proud
समदु:खी Lol

मंजुडीने तर पार वाट लावली माझ्या त्राग्याची Rofl

मंजु ,
पोटात पेट्रोल टाकी असलेली दुचाकी असेल तर सगळ्यांनाच उतरायला हवं, त्याशिवाय टाकी उघडून पेट्रोल कसे भरणार? नाही का?
>>> हे मला कळत नाही का????????

छातीत पेट्रोल टाकी असलेली दुचाकी असेल तर त्यांनी सांगितलं म्हणून उतरायला हवंच का? 'बसल्या जागेवरूनच ० दिसतंय' असं सांगता येतं की... आणि ते ऐकतातही
>>>>
ते नाही उतरणार म्हणलं तर ऐकत नाहीत ते Happy उतरल्या शिवाय पेट्रोल भरत नाहीत .

स्कार्फ बांधून हेल्मेट घातलेल्या स्थितीतच उतरलं तरी चालतं. एटिएमसारखा नियम नाही पेट्रोलपंपावर स्मित मित्राला सुद्धा हेल्मेट डोक्यावरच ठेव असा सूचनावजा सल्ला द्यावा.
>>>
असोच! Wink :फिदी:.

तू उतरल्याशिवाय तुझा मित्र कसा उतरेल?
>>>
माझं तेच म्हणणं आहे की एक वेळ मला उतरवतात हे ठिक आहे पण त्याला पण कशाला उतरायला लावायचं!

खर तर हे पोस्ट टाकायचं कारण म्हणजे मला वाटलं त्यामागे काही खास कारण आहे का जे मला माहित नाही.. कोणाला माहित असेल तर मला कळेल Happy

बाईक वरुन उतरवितात, ते बहुधा, चूकून पेट्रोलची नळी भरताभरता बाहेर आलि अन अन्गावर पेट्रोल सांड्ले म्हणण्यापेक्षा फवारा/धार उडली, खास करुन गुप्तांग/मान्ड्या/पाय वगैरे भिजवुन गेली, तर महा अनवस्था प्रसंग ओढवेल म्हणुन असेल. अशी गोष्ट लाखात एखादेवेळेस घडणे शक्य आहे, पण घडली तर? विचार करुनच अन्गावर शहारा येतो. त्यामुळे तो त्यान्च्या 'सुरक्षाविषयक' धोरणाचा भाग असेल.
खरे खोटे देव अन पम्प्वाले जाणोत.

ग्राहक पंचायत / संघटनेचे पेट्रोल पंपावरील या प्रकारांबद्दल काय म्हणणे आहे?
ग्राहकांसाठी सावधानतेच्या सूचना प्रत्येक पेट्रोल-पंपावर लावल्यास हे प्रकार कमी होतील का?

या बाफामुळे ही ग्राहक मंचाची लिंक वाचनात आली : http://www.grahakpanchayat.org/articles/52-2010-07-14-19-37-16.html

त्यात स्पष्ट म्हटले आहे :

पेट्रोल पम्प पर ध्यान रखने योग्य बातें-

  • पेट्रोल लेने से पूर्व मीटर पर शून्य रीडिंग के लिए आशवस्त हो ले!
  • मिलावट पर संदेह होने पर फिल्टर पेपर परिक्षण की मांग करें !
  • कैश मेमो लेना न भूलें !
  • सेवा से संतुष्ट न होने पर शिकायत अवश्य करें !
  • पेट्रोल पम्प के नज़दीक बीडी/सिगरेट का प्रयोग न करें !
  • कंपनी के प्रमाणिक पेट्रोल पम्प से ही पेट्रोल या डीजल खरीदें !

मी नाशिकच्या इंडियन ऑईलच्या (गंगापूर रोड वरील) पंपात गेले ३ वर्षे पेट्रोल व डिजेल भरतो. आजपर्‍यंत काहीच तक्रार नाही. सौजन्यशील वागणूक, काटेकोर आणि प्रामाणिक.
बाय द वे- पुण्यात असले प्रकार सर्रास आहेत का हो? ( ख्यातीस साजेसे? Happy

मी नाशिकच्या इंडियन ऑईलच्या (गंगापूर रोड वरील) पंपात गेले ३ वर्षे पेट्रोल व डिजेल भरतो.
----- होय, पण तशीच परिस्थिती सर्वत्र असेलच असेही नाही. जवळच मनमाड मधे रॉकेल - पेट्रोल ची भेसळीच्या प्रकारात एका अधिकार्‍याचा जिव गेला.
http://www.rediff.com/news/report/ias-officer-burnt-alive-by-mafia-in-ma...

मुळ कम्पनी मधुन निघताना (आणि स्थानिक वितरण करताना) तरी टाकी सम्पुर्ण भरलेली असते का ? किवा जेव्हढे कागदावर दाखवले जाते तेव्हढे तरी टाकीत पडते का ?

सकाळी लवकर(7 AM च्या आधी) पेट्रोल भरावे, डेन्सीटी जास्त असल्याने जास्त पेट्रोल मिळते.कंजुषांना तेवढेच समाधान

Indian Oil वर कधीच भरु नये.>>>> खरंच त्या कंपनीच्या पुणे डिव्हिजनल ऑफिसला लेखी तक्रार करा अथवा हेड ऑफिसमध्ये तक्रार करा. अशी तक्रार केल्याशिवाय कधी कधी वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत गैरकारभार पोहोचत नाहीत. जेव्हा सरप्राईझ चेकअप होत असते तेव्हा हे पेट्रोलपंपवाले आधीच कसा कोण जाणे सुगावा लागून सगळं आलबेल करुन ठेवतात आणि सापडत नाहीत. ग्राहकांनी ही तक्रार करायची पावलं उचलली पाहिजेत. भेसळ, मिटर रिडिंग किंवा अजून काही गैर होत असेल ते स्पष्टपणे तक्रारीत नमुद करावे. वरपर्यंत गेलं तर नक्की फायदा होतो. आपलाही आणि इतर ग्राहकांनाही. ह्यात बरेच वेळा पेट्रोल पंप ओनर आणि त्याचे एम्प्लॉयीज इन्व्हॉल्व्ह्ड असतात. कॉर्पोरेशन ओन्ड कॉर्पोरेशन ऑपरेटेड असेल तर हंगामा कराच. तिथे पोस्टिंग असलेल्या एम्प्लॉईजची कसून चौकशी होईलच.

>>> अशी तक्रार केल्याशिवाय कधी कधी वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत गैरकारभार पोहोचत नाहीत. <<<<
बेसिकली आमच्या इथल्या सरकारी कारभारात हीच गोची होऊन बसली आहे, की तक्रार आल्याशिवाय, सरकारी खाती हलतच नाही, अन तक्रार दिली तरी मग त्याचा वापर "अन्य उत्पन्नासाठी" वा तक्रारदारासच उपद्रव देण्याकरता "अन्य प्रकरण/खात्यात" गुन्तविण्यास कसा होईल ते बघितले जाते. ही दहशत सामान्यजनांत जबरदस्त आहे व दहशतीमागील उपद्रवाची ताकदही माणसास आयुष्यातुन उठवुन टाकण्याइतकी जबरदस्त आहे.
मला एक सान्गा, की वरिष्ठ म्हणविले जाणारे हे अधिकारी काय इन्द्राच्या स्वर्गात रहातात का? की येवढे अडाणि अस्तात की त्यान्चे हाताखालचे/अंमलाखालील लोक कसा कसा किती प्रकारे भ्रष्टाचार करतात्/लुबाडणूक करतात ते त्यान्ना समजतच नाही? अन असे अडाणी असतिल तर ते वरिष्ठ अधिकारि कसे काय?
दुर्दैवाने हाताखालिल/अंमलाखालिल कोणीही भ्रष्टाचार करताना/केल्यामुळे (चुकुनमाकुन जरी ) सापडलाच तरीही त्याचे गुन्ह्यास वेळीच अटकाव न केल्याबद्दल/गुन्हा करु देण्याची परिस्थिती ठेवल्याबद्दल कोणाही वरिष्ठ अधिकार्‍यास कसल्याही प्रकारे जबाबदार धरण्याची तरतूद नाही वा दुसर्‍या शब्दात, अंमलाखालील कामात अंमलाखालील व्यक्तिंकडून भ्रष्टाचार होऊ न देण्याची तजवीज करणे व अंमल करणे याबाबतची जबाबदारी नाही. फारफार तर निलंबन वगैरे उपाय तत्कालिक लोक उद्रेक शांत करण्यापुरते केले जातात.
विरोधाभास हा की तिकडे कुठे रेल्वे अपघात वगैरे झाल्यावर माणसे शेकड्यान्नी मेल्यावर रेल्वे मन्त्र्याचा राजीनामा मागुन घेऊन त्यामुळे खुष होणारी जन्ता/विरोधी पक्ष वगैरे लोकं, हीच बाब खालवर झिरपवू इच्छित नाहीत/दुर्लक्ष करतात/वा असे करुन घेण्यास कचरतात.

ग्राहक राजा जागा हो! ग्राहकांनी तक्रार केल्याशिवाय, दाद मागितल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही हे स्पष्ट आहे!! Happy

मलाही 'एचपी'चा अनुभव जास्त चांगला आहे. पण खरं तर असं सरसकट लेबलिंग योग्य होणार नाही. उदाहरणार्थ मी वर लिहिलेल्या सार्‍या गोष्टी एकाच पंपावर एकाचवेळी एकाच माणसासोबत होणं- हे अशक्य आहे. आणि यातल्या अनेक गोष्टी तर क्वचितच अनुभवास येतात. त्या नेमक्या आपल्याच वाट्याला येऊ नयेत, म्हणून सावधगिरीचा इशारा. शिवाय एकदा वाईट अनुभव आला, की पुढल्या वेळी नीट जागे राहतो आपण, किंवा ते ठिकाणच टाळतो. असं अनेक लोकांनी ठरवल्यावर कसा चालणार तो पंप? त्यामुळे तेही हळुहळू सुधरत आहेत. (दांडेकर पुलासारख्या पंपावर या गोष्टी नेहमी व्हायच्या. ते डिस्प्ले खरवडून ठेवण्यात तर हा पंप आद्य असेल. आता तिथं तसं फारसं होत नसावं, पण त्यांच्यावरचा विश्वास उडाला तो उडालाच). पेट्रोलचे भाव प्रचंड वाढल्यापासून आजकाल लोक डोळ्यांत तेल घालून गाडीत पेट्रोल घालतात- त्यामुळेही हे प्रकार जरा कमी झाले असावेत.

मालक लोकही जातीने नीट लक्ष देतात आजकाल. सुशिक्षित, प्रशिक्षित आणि नम्र अ‍ॅटेंडंट्स ठेवतात. पण भेसळीचं काय? ते तर मालकाच्या परवानगीवाचून होणारच नाही.

Pages