अनोळखी

Submitted by कौतुक शिरोडकर on 22 March, 2013 - 02:59

असून ओळखीचे,
अनोळखीच आपण
शब्द फुके,
स्पर्श फिके,
कळे ना तुझे मुकेपण

दिसावया समांतर
देह भिंती अलिप्त
श्वास श्वासात गुंफे
अंतरे चित्ती सुप्त
दोन दिशा,
समोरी जशा,
उदय अस्ताचे मधे सण

नेणिवेच्या क्षितीजी
घरटे तुझे सुरेख
जाणिवेच्या किनारी
खग मी तृषार्त एक
मनाचाच दंगा
तुजभवती पिंगा
अबोल मात्र पैंजण

स्वप्नातल्या रानवाटा
नेतील तुला दूर देशी
परीकथेच्या कुमारा
गोष्ट उरली जराशी
हरवेन मी
तरीही हमी
चंद्र मी देईन आंदण

(माझ्या आगामी सिनेमाची कथा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता तर मस्त आहे.. पण कथेचा अंदाज नाही आला नीट.. परत वाचावी लागेल कविता.. Happy

श्वास शासात गुंफे>>>>>> इथे श्वासात हवय का?

काव्य अगम्य आहे.
चित्रपट सुद्धा अगम्य असेल (??) (अंदाज कम प्रश्न :फिदी:)

मतितार्थ
सिनेमा ऑस्करला जाण्याचे पुर्ण चान्सेस आहेत.

परत वाचावी लागेल कविता.>>>>>>>>>>मी वाचली. छान कविता. Happy

मतितार्थ
सिनेमा ऑस्करला जाण्याचे पुर्ण चान्सेस आहेत.>>>>>>>>>>>तुझ्या तोंडात गुळ पडो. Proud

apratim

रियाशी १००% सहमत
छान आहे
गीत आहे ना हे ?
चाल लावायला जरा अपारंपारिक आहे प्रत्येक कडवयात दर दोनतीन ओळीत लय /ठेका बदलावे लागतेय पण सर्व कडव्यात तोच सेम पॅटर्न रीपीट होतोय हे आवडले
मस्त