छोटू अन त्याची आई..

Submitted by मितअमित on 21 March, 2013 - 05:19

छोटू अन त्याची आई

छोटु आता मोठा झालाय
बीरजू , कुंती , दीपु , बबलू
सगळेच आहेत सहमत
छोटु आता मोठा झालाय
पण वय नक्की ठरत नाहीय अजून
पाच कि साढे-पाच वर्षे ते

पण छोटुच्या कुरळ्या केसात
हात फिरवत फिरवत नकळत
डोळ्यात आलेले पाणी पुसत पुसत
नसीबन आपा पण हे नाकारतात..
" पांच वर्षे नक्की..अरे ४ वर्षच झाली
त्याला पहिले पाउल टाकून...
पांच वर्षे नक्की...."

छोटु मात्र ठरवतो .. आईलाच
विचारायला हवंय .. पांच की साडे-पांच
काय नक्की वय माझे ..
तिला असेल नक्की माहिती..

छोटु सगळे सांगतो आईला
काहीही लपवून नाही ठेवत तो आईपासून..
त्याच्या जगात दोघांचंच स्थान..
त्याची आई आणि त्याची लाडकी मनी जिला
तो प्रेमाने माऊ म्हणतो...

पण मग आई काहीच बोलत नाही..
छोटुच बोलत राहतो ..
आई तशीच राहते.. निरुत्तर..
SHE ALWAYS REMAIN SILENT

छोटु आता खरच मोठा झालाय
आता पूर्वीसारखे हात पसरताना
आतुन काही भरून नाही येत..
डोळ्यात पाणी नाही येत..
उलट आता त्याला मजाच वाटते..

सिग्नलवर फुगे, फुले, पेपर, मासिके विकताना
आता पूर्वीसारखी गाड्यांची भीती नाही वाटत..
ज़ुम्मनच्या मताप्रमाणे छोटु आता पक्का बिज़्नेस्मेन झालाय..
सध्या वीडी ओढण्याचे..पाकीट मारण्याचे
क्लासेस घेतोये ज़ुम्मन छोटुचे.. ते जमले
ना एकदा की झाला छोटु पक्का बिज़्नेस्मेन..

पण अजूनही गाडीत आपल्या लहान बाळाला घेऊन शांत तृप्त
झोपलेली आई बघितली की छोटुच्या इवल्याशा डोळ्यात टचकन पाणी येते..
छातित काहीतरी भरून येते.. कुणास ठाऊक काय ते..

आता संध्याकाळ झालीये.. आज भरपूर गल्ला जमलाये छोटुकडे..
पाय खूप दुखताते.. डोळ्यावर अनीवार झोप आहे..
पोट मात्र भरलये..
त्या कोपरयावरच्या नवीन घरातल्या बाईने.. आज एक तुकडा भाकर जास्तच दिली
छोटुला.. अन् वर डोक्यावरून हातही फिरवला.. भाकर नाही खाल्ली छोटुने अजुन..
पण पोट मात्रा भरलये...का कुणास ठाऊक...

पण , आता मात्र आईकडे परत जाण्याची ओढ वाटू लागलीये छोटुला..
कधी एकदा तिच्या कुशीत जाउन बसतो ...तिला सगळे सांगतो अस झालेय छोटुला
सांगता सांगता नक्की झोप येईल खात्री आहे छोटुला..

छोटु अन त्याची आई बागेत राहतात.. घरच नाही ना त्याना ..
अजूनही तो बिज़्नेस्मेन छोटु आपल्या आईच्या कुशीत झोपतो..
त्याला खूप छान वाटते तिथे.. अगदी छान..

तुम्ही भेटणार का छोटु अन त्याच्या आईला .. ?

या मागून या.. लांबवर पहा.. दिसतोय का तुम्हाला तो.. त्या तिथे .
गुलमोहोराच्या झाडाखाली... त्या बेंचवर शांत झोपलेला तो छोटु..
2/3 फुटकि भांडी , 1 तुटकी छत्रि, 1 फाटकी स्लिपर एवढाच संसार छोटु अन त्याच्या आईचा..

तो बघा कसा झोपलाय छोटु.. पोटाशी पाय घेऊन, कुडकुडणारा,अंधाराला घाबरणारा छोटु
डोळ्याजवळ सुकलेले अश्रू घेऊन झोपलेला छोटु, स्वप्नात आईशी बोलणारा छोटु ...
त्याच्या उष्याशी झोपलेली ती त्याची माऊ.. अन वर अंधार पानोपानि साकळलेला गुलमोहोर...

काय म्हणता त्याची आई कुठाये.. ?
अहो तोच तो बेंच नो 3 .. तीच त्याची आई..
तिथेच सापडला ना तो ज़ुम्मन आणि नासिबनआपाला ..

छोटु अन त्याची आई.. Bench NO 3....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक , आणि भारतीजी … प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद … तुम्हाला माझी कविता आवडली हे पाहून खूप बरे वाटले Happy

अतिशय भावस्पर्शी.
शेवट अगदि Unexpected अन ह्रुदयस्पर्शी होता.

फक्त ओळ ब्रेक अन punctuations वर लक्ष्य दिले तर अजुनच मान्डणी चान्गली होइल.
यमक सुद्धा जुळतील असा प्रयत्न करा.

Emotions wise hats off...