महिला व्यावसायिक : सखी युनिक रुरल एंटरप्राईज प्रा. लि.

Submitted by चंपक on 17 March, 2013 - 04:02

महाराष्ट्रातील १९९३ च्या भुकंपानंतर त्या भागामध्ये काम करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. अश्या अनेक स्वयंसेवी संथांमधीलच "स्वयं शिक्षण प्रयोग" ही एक. या संस्थेने जागतीक बँकेचे काम पुर्ण झाल्यावर तेथील महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक प्रकल्प सुरु केले. गेली २० वर्षे त्यांचे हे काम अव्याहतपणे चालु आहे. या संस्थेबद्दल अधिक माहिती http://sspindia.org/ येथे उपलब्ध आहे.

याच संस्थेच्या एका उपक्रमा अंतर्गत, सखी युनिक रुरल एंटरप्राईज प्रा. लि. (Sakhi Unique Rural Enterprise Pvt Ltd - SURE Pvt Ltd) (http://www.sureindia.co.in/) ही संस्था महिला व्यावसायिक घडवण्याचे काम करते. गेली काही वर्षे लातुर, उस्मानाबाद ह्या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचे व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत केली जात आहे. याचाच पुढील भाग म्हणुन १००० महिलांचे व्यावसायिक नेटवर्क तयार करण्याचे ठरवले आहे. ह्यात अहमदनर आणि वाशिम ह्या जिल्ह्यांचा नव्याने समावेश केला गेला आहे.

या अंतर्गत Green and Clean Technologies वर भर दिला जातो. ग्रामीण भागातील जनतेचा राहणीमानाचा दर्जा उंचावणे, अपारंपारिक उर्जेचा प्रसार करणे, महिला सबलीकरण करणे हे या उपक्रमाचे प्रमुख हेतु आहेत.

भारतातील आणि परदेशातील अनेक नामांकित उद्योगसमुह आपली उत्पादने ह्या नेटवर्क मार्फत बाजारात आणत आहेत. टाटा, युनिलिव्हर, गोदरेज, किर्लोस्कर, पॅनासॉनिक, डी-लाईट, सेन्डोप, युरेका फोर्ब्स - अ‍ॅक्वा गार्ड ही त्यापैकी काही उत्पादणे आहेत. Solar Systems, Biogas यांसारखे अपारंपारिक उर्जा स्रोत वापरणार्‍या उपकरणांचा प्रसार व्हावा म्हणुन प्रयत्न केले जातात. प्रत्येक तालुक्यात अंदाजे २५ महिला व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले जाते. त्यातुन प्रत्येक महिलेने २०० कुटुंबांना उपकरणे / सेवा पुरवावी अशी व्यवस्था केली जाते. जेणेकरुन ते बिझनेस मॉडेल स्वयंपुर्ण होउ शकलेले आहे.

महिला सबलिकरणाच्या ह्या उपक्रमाच्या यशाची दखल जागतिक स्तरावर घेऊन नुकतेच ह्या संस्थेला USAID कडुन साडे पाच कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. त्यातुनच अहमदनगर आणि वाशीम ही नवीन कार्यक्षेत्रे सामिल केली जाणार आहेत. (याचाच एक भाग म्हणुन अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील करडकवाडी येथे सात लाख रूपये खर्चुन "अ‍ॅक्वागार्ड वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम" बसवण्यात आली आहे. त्यातुन नेवासा अन परिसरातील घरगुती वापर अन व्यावसायिकांना अल्प दरात शुद्ध पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे.)

आपणास जर काही नाविन्यपुर्ण उत्पादने या नेटवर्क द्वारे ग्रामीण भागात जावीत असे वाटत असेल, तर जरुर सुचवावीत. आम्ही त्या उत्पादकांशी चर्चा करुन पुढील कार्यवाही करुत.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users