Submitted by राजीव मासरूळकर on 15 March, 2013 - 15:15
गझल
चंद्र मी झाकून आहे आत माझ्या
पेटलेला सूर्यही रक्तात माझ्या !
वागतो दुःखातही योद्ध्याप्रमाणे
शूर शिवबा राहतो हृदयात माझ्या !
जाळतो मी जात वशिला अन् गरीबी
ध्येयशिखरे गाठणे हातात माझ्या !
वाटता तुज जाहले बेरंग जीणे
घे सखे तू रंगुनी रंगात माझ्या !
पेरणी कवितेत अर्थाची करावी
तीच शक्ती ओततो औतात माझ्या!
जन्मलो चिखलात मी 'राजीव' होउन
वाहतो मृद्गंधही श्वासात माझ्या !
- राजीव मासरूळकर
मु. पो. मासरूळ
ता. जि. बुलडाणा
rajivmasrulkar@ gmail.com
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पेरणी कवितेत अर्थाची
पेरणी कवितेत अर्थाची करावी
तीच शक्ती ओततो औतात माझ्या! << व्वा ! >>
धन्यवाद अरविंदजी .
धन्यवाद अरविंदजी .
दोन ओळीतील अनुबंध अजून पक्के
दोन ओळीतील अनुबंध अजून पक्के व्हावेत.
वाटले जेंव्हा तुला बेरंग जीणे >>> जगणे'ही चालेल
घे सखे तू रंगुनी रंगात माझ्या !>>> काळाचा ताळमेळ नाहीये... वर "वाटेल" किंवा खाली "घेतले" करावे लागेल.
एक उदाहरण म्हणून पहा, की आपला आशय अजून बोलका कसा व्हावा
तुडवतो मी जात वशिला अन् गरीबी
येत असतील आड जर ध्येयात माझ्या !
वरील सर्व केवळ आपल्यात चांगल्या गझलेची बीजे असल्याने लिहले आहे.
गै.स.न.
झप्पी, विचार आवडले. 'वाटले'
झप्पी,
विचार आवडले.
'वाटले' ऐवजी "वाटता तुज जाहले बेरंग जीणे"
असे घेतल्यास दोष राहणार नाही असे वाटते.
हार्दिक आभार !
जाळतो मी जात वशिला अन्
जाळतो मी जात वशिला अन् गरीबी
ध्येयशिखरे गाठणे हातात माझ्या !
वाटले जेंव्हा तुला बेरंग जीणे
घे सखे तू रंगुनी रंगात माझ्या !
पेरणी कवितेत अर्थाची करावी
तीच शक्ती ओततो औतात माझ्या!
बहोत खूब
वागतो दुःखातही योद्ध्याप्रमाणे
शूर शिवबा राहतो हृदयात माझ्या !
हा शेर प्रत्येक मावळ्या साठी
अतिशय आवडला मक्ता ही छानच
गणेश सोनवणे, खूप खूप आभार !
गणेश सोनवणे,
खूप खूप आभार !
अगदी खास स्फूर्तीदायी गझल,
अगदी खास स्फूर्तीदायी गझल, काहीशा निराशा पोसणार्या वातावरणात छान वाटली.
वागतो दुःखातही
वागतो दुःखातही योद्ध्याप्रमाणे
शूर शिवबा राहतो हृदयात माझ्या !
हा शेर प्रत्येक मावळ्या साठी >>>> अगदी अगदी.
भारतीताई, आबासाहेब, हार्दिक
भारतीताई,
आबासाहेब,
हार्दिक आभार !
चंद्र मी झाकून आहे आत
चंद्र मी झाकून आहे आत माझ्या
पेटलेला सूर्यही रक्तात माझ्या !
वागतो दुःखातही योद्ध्याप्रमाणे
शूर शिवबा राहतो हृदयात माझ्या !
जाळतो मी जात वशिला अन् गरीबी
ध्येयशिखरे गाठणे हातात माझ्या !
वाटता तुज जाहले बेरंग जीणे
घे सखे तू रंगुनी रंगात माझ्या !
छान शेर, आवडले!
गझलप्रेमी सर, हार्दिक आभार !
गझलप्रेमी सर,
हार्दिक आभार !
मतला आणि मक्ता छानच
मतला आणि मक्ता छानच
पेरणी कवितेत अर्थाची
पेरणी कवितेत अर्थाची करावी
तीच शक्ती ओततो औतात माझ्या!
मस्त.
विक्रांतजी, हार्दिक आभार !
विक्रांतजी,
हार्दिक आभार !
विक्रांतजी, हार्दिक आभार !
विक्रांतजी,
हार्दिक आभार !
स्फूर्तीदायी गझल.
स्फूर्तीदायी गझल.
आवडली
आवडली
भिडे सर , जाई , आपले हार्दिक
भिडे सर ,
जाई ,
आपले हार्दिक आभार !
चांगली आहे प्रतिसादही खूप
चांगली आहे
प्रतिसादही खूप काही शिकवणारे....... लाभ घ्या मासरूळकर !
वैवकु , हार्दिक आभार !
वैवकु ,
हार्दिक आभार !
आवडली...फार छान
आवडली...फार छान
वा, सुरेख गजल आहे, राजीवजी
वा, सुरेख गजल आहे, राजीवजी .....