दिवे देत नाही

Submitted by सांजसंध्या on 15 March, 2013 - 13:45

Light 1 दिवे देत नाही Light 1

काल एका कवीच्या, गाली होत्या खळ्या
चष्मा उचलून म्हटले "ते", अल्सर आहे खुळ्या Sad

पुन्हा होती कवितेत, काळजामधे चिता
पुस्तक काढून म्हटले ते, पोर्शन कुठे होता Lol

जास्वंदीच्या ओठांना, भुंगा दंशून गेला
स्केच काढून म्हणाले, ओठ कुठे गेला Uhoh

मी ही आता ठरवलंय, हुश्शार जरा होऊ
लपून छपून झाडीमधे, टोचा मारत जाऊ.. Wink

कविता आता शिकणारै, मेडीकलला जावून
कथा लिहून देईन बाई, टॅलीक्लास लावून Proud

तरीदेखील म्हणेल कुणी , हद्द झाली बाई
म्हणेना का लगेच आम्ही, दिवे देत नाही :हहगलो::फिदी::खोखो::हाहा:

- संध्या

( Light 1 कवितेत काही शास्त्रीय चुका असतील तर कळवाव्यात ही नम्र विनंती :दिवा:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

गिरीकंद, थँक्स लक्षात आणून दिलंस ते. डन डना डन Happy
गिरीकंद, लोक म्हणतात खळ्या आतल्या बाजूला पडतात का ? Rofl मग गालास तोंड नसते का म्हटले ? Lol

केलं शोभा ते ही. Lol

पाकळीला गुलकंद कसा द्यायचा म्हणून ला ला ला ठेवला होता Lol पाकळी म्हणजे बॉटनीची आणि गुलकंद फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूटचा...कुठं कुठं शिकायला जायचं !!! अजून बायोलॉजी पण राह्यलंय. ट्रॅप(सापळा) वापरायसाठी स्केलेटन शिकायचाय..

पाकळीला गुलकंद कसा द्यायचा म्हणून ला ला ला ठेवला होता हाहा पाकळी म्हणजे बॉटनीची आणि गुलकंद फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूटचा...कुठं कुठं शिकायला जायचं !!! अजून बायोलॉजी पण राह्यलंय. ट्रॅप(सापळा) वापरायसाठी स्केलेटन शिकायचाय..>>>>>>>>>>>>.शिका. शिका. सगळ शिकून घ्या. म्हणजे नवीन कविता करायला सोप्प होईल. Lol

नक्की नक्की. आता युरेनियमचं हाफ लाईफ शिकायला जाणारै.. म्हणजे एकाचे दोन, दोनाचे चार कसे होतात ते शास्त्रीय दृष्ट्या कळेल तरी Lol
आता मात्र घ्याच Light 1

ती दिवा लावते काळजात थरथरता
रोजचा गडद पदरात थोपवुन वारा.................. ह्या गदीमांच्या ओळी उगाचच आठवल्या.

आपल्या सुंदरशा कवितेच्या प्रतिक्षेत!!

हम्म. प्रयत्न करीन. धन्यवाद.

इतरपापफ़लानि यथेच्छया विलिख तानि सहे चतुरानन
अरसिकेषु कवित्त्वनिवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख

Proud

Happy

अरे मुला
ज्येष्ठ नागरिकांची ही कसली रे थट्टा ? आता का माझं वय राहीलं अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचं ? ही संध्याबाळ ही भांबावली असेल बिचारी या अनपेक्षित हल्ल्याने.