Submitted by मुग्धमानसी on 15 March, 2013 - 03:35
तुला पाठमोरे पाहून वाटले रे
मी एकटी सभोती धुके दाटले रे
तु दे ना मला रुंद छाती तुझी
किती हुंदके या उरी साठले रे
रुसूनी तुझा गारवा दूर गेला
नी घरकुल उन्हाने इथे थाटले रे
माया नसू दे असू दे निखारे
कळू दे मला जे तुला वाटले रे
किती शब्द अडकून बसले गळ्याशी
किती दाट आभाळ हे दाटले रे
दिसेना मला भाबडा चंद्र माझा
कसे चांदणे कोवळे फाटले रे?
कसे कोरडे जाहले सप्त सागर
कशी मी तुझ्या आतुनी आटले रे?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडेश
आवडेश
किती शब्द अडकून बसले
किती शब्द अडकून बसले गळ्याशी
किती दाट आभाळ हे दाटले रे
कसे कोरडे जाहले सप्त सागर
कशी मी तुझ्या आतुनी आटले रे?<<< उत्तम शेर
किती हुंदके या उरी साठले रे
कळू दे मला जे तुला वाटले रे<<< या दोन ओळीही सुंदर!
गझलतंत्रात बसवल्यास चांगली गझल होईल. (अर्थात, 'साठले' हा काफिया चालण्यासाठी मतला सैल करावा लागेल). काही ठिकाणी र्हस्व दीर्घ बदलावे लागतील. शुभेच्छा! अर्थात कविता म्हणून चांगली आहेच, पण तरी गझलेच्या अंगाने जात असल्यामुळे तसे सुचवले.
-'बेफिकीर'!
befi + 1
befi + 1
मस्त. ....आवडेश बहोत खूब
मस्त. ....आवडेश
बहोत खूब
धन्यवाद सर्वांना... धन्यवाद
धन्यवाद सर्वांना...
धन्यवाद बेफीजी. गज़ल हा प्रकार हाताळावा असे वाटते खरे. पण त्यातले तांत्रिक काही कळत नाही. आणि मायबोलीवर 'गज़ल' विभागात काही प्रतिक्रीया वाचल्या की त्या क्षेत्रात प्रवेश करण्याचे धाडस होत नाही. कदाचित हे वाचून तुम्हाला हसू येईल.
र्हस्व दीर्घाचा अभ्यास खरोखर करायला हवा असे दिसते...
सुरेख !!
सुरेख !!
धन्यवाद!
धन्यवाद!
मस्त कविता, आवडलीच.
मस्त कविता, आवडलीच.
नेहमीप्रमाणेच मस्तच!
नेहमीप्रमाणेच मस्तच!
धन्यवाद विजय, रिया...
धन्यवाद विजय, रिया...
व्वा...नितांत सुंदर कविता...
व्वा...नितांत सुंदर कविता... अप्रतीम !!! तुमच्या लिखाणात एक सुंदर फेमिनीन टच आहे... त्याबद्दल अभिनंदन !!! तुम्ही लिहीत रहा... गज़ल - कविता ते दुय्यम !
गिरीश +१
गिरीश +१
माया नसू दे असू दे निखारे कळू
माया नसू दे असू दे निखारे
कळू दे मला जे तुला वाटले रे
किती शब्द अडकून बसले गळ्याशी
किती दाट आभाळ हे दाटले रे
ही दोन कडवी आवडली.
धन्यवाद गिरिश! तुम्ही
धन्यवाद गिरिश! तुम्ही मनापासून केलेल्या कौतुकाने फार बरे वाटले.
धन्यवाद आनंदयात्री, समीर...
आशय आणि कविता सूंदर
आशय आणि कविता सूंदर
अप्रतिम अभिव्यक्ती फार फार
अप्रतिम अभिव्यक्ती
फार फार आवडली कविता
बेफिंशी सहमत!
धन्यवाद किरण, सुप्रिया...
धन्यवाद किरण, सुप्रिया...
तु दे ना मला रुंद छाती तुझी
तु दे ना मला रुंद छाती तुझी
किती हुंदके या उरी साठले रे
रुसूनी तुझा गारवा दूर गेला
नी घरकुल उन्हाने इथे थाटले रे
<< व्वा ! खूपच सुंदर!
छान ..... "किती शब्द अडकून
छान .....
"किती शब्द अडकून बसले गळ्याशी
किती दाट आभाळ हे दाटले रे"
या ओळी सर्वात आवडल्या.
धन्यवाद!
धन्यवाद!
मानसी तुझ्यामुळे मी कविता
मानसी तुझ्यामुळे मी कविता विभागात डोकावायला लागले!
छान .. खुप आवडेश!
धन्यवाद सखी. चला... कवितेचा
धन्यवाद सखी. चला... कवितेचा प्रचार केल्याचे पुण्य लाभले म्हणायचे मला....