पायांची काळजी (निगा)

Submitted by निंबुडा on 9 April, 2010 - 07:59

बदलत्या ऋतु नुसार पायांची काळजी (निगा) कशी घ्यावी यासंबंधी माहिती इथे द्यावी. पावले स्वच्छ, सुंदर, नितळ दिसण्यासाठी करता येण्यासारखे उपाय, नखांची काळजी तसेच घरच्या घरी पेडीक्युअर करण्याची पद्धत यावर इथे मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुशपी, टाचांना भेगा पडल्या असतील, तर कोकमतेल वितळवून कोमट झाले की ते टाचांना चोळून ठेवावे. टाचा स्वच्छ धुणे, अंघोळ करतेवेळी हळूवार हाताने प्युमिक स्टोनने घासणे, रात्री झोपण्यापूर्वी व्हॅसलिन/ पेट्रोलियम जेली लावून सॉक्स घालणे... इत्यादी उपाय करता येतील.

u lac नावाचे एक क्रीम मेडिकल च्या दुकानात मिळते . आधी टाचा घासणे वगैरे केल्यानंतर झोपायच्या आधी पायाच्या भेगांना लावल्यास खुप फरक पडतो.

kokmetale pani mhanje.panyat kokam takun garam karayache ka?ani nantar payanchya tachana lavayache ka?

तुशपी, अहो नीट वाचा. कोकमातले पाणी असे लिहिलेले नाही. कोकमतेल असे लिहिले आहे.

कोकमापासून जे तेल काढतात ते रूम टेम्पला मेणासारखे घट्ट असते. ते थोडेसे गरम करून वितळवायचे आणि पायाला चोळायचे. हा धागा पहिल्यापासून वाचलात तर अजून अनेक उपाय सापडतील.

हे माझ्या आईला तिच्या Diabetics च्या Dr नी सांगितले होते . मी पण लावते . . बाहेरून लावायचे असल्याने मी प्रयोग केला. मला तरी चांगला result मिळतो. तुम्हाला वाटले तर लावा.

टाचा स्वच्छ धुणे व COTARYL & WHITEFIELD OINMENT सम प्रमाणात घेवून टाचाना लावणे.कोणत्याही Medical Shop मध्ये मिळते.
टाचा स्वच्छ धुणे, अंघोळ करतेवेळी हळूवार हाताने प्युमिक स्टोनने घासणे, सॉक्स घालणे हे तर आहेच.

टाचांना पडण्यार्‍या भेगांवर १ घरगुती क्रिम-
२-२.५ इंच मेणबत्तीचा तुकडा वितळवुन घ्यायचा, आचेवरुन काढून, हे मेण गरम असतानाच त्यात १ मोठी डबी vaseline mix करायचे मिश्रण घट्ट होईपर्यंत चमच्याने ढवळत रहायचे.
रात्री झोपताना पाय स्वछ करुन भेगांवर लावायचे.

हसरी आयुर्वेदीक दुकानांमध्ये मिळेल. ( आयुर्वेदीक फार्मसी) तसा तो कोकमाचा घट्ट गोळा मिळतो, तो किसुन त्याचे तेल निघते ते पायाला चोळावे.

हाताची काळजी असा कुठे धागा नहिये का?
माझे हाप खुप ruff झालेत
रोज रात्री तेल लावते पण सकळी खुप कोरडे पणा वाटतो,

भेगाळलेले पाय, खरखरीत कोपरं/गुडघे इत्यादीसाठी 'ब्युटिक' चे 'त्वकल्प' नावाचे क्रीम सुपर्ब आहे. हात/पाय स्वच्छ धुवून (पाय प्युमिस स्टोनने घासून वगैरे) त्यावर हे क्रीम लावावे. पायांत मोजे घालावे म्हणजे धूळ बसणार नाही. शक्यतो रात्री हा उद्योग करावा. 2-3 दिवसांत फरक जाणवतो.

खरं तर या धाग्यावर मी येणं/लिहिणं संयुक्तिक नसावं. पण आज दुपारी हा धागा सहज नजरेस पडला. फिश पेडीक्युअर बद्दल वाचले. काय असेल याबद्दल थोडा अंदाज आला होता. अत्ता थोडा मोकळा वेळ होता; गूगल केल्यावर थोडी माहिती वाचली, व्हीडियो क्लिप बघितली.

ग्रेट प्रकार आहे.... काय काय आयडिया शोधून काढतील !!!
धन्य आहे !!...... उद्या डोक्यातल्या उवा काढायला माकडांचा वापर केला तर नवल नाही..... Wink

Light 1 घ्या.
(मी आधीच घेतलाय :P)

अम्म.. ही कोणतीही जाहिरात नाहीये. जाहिरात वाटल्यास सांगा. पोस्ट संपादित करेन. पुण्यात टिळक स्मारक मध्ये एक प्रदर्शन लावले आहे. त्यात एका स्टॉलवर ६ दिवसात पायाच्या भेगा भरणारे एक क्रीम पाहिले. (खखोदेजा). मी घेतले नाही पण ज्यांना खुप त्रास होतो त्यांनी घेउन पाहा.

(त.टी. हे प्रदर्शन फक्त सोमवार संध्याकाळपर्यंत असल्याचे ऐकिवात आहे)

Whatever I type does get translated in Marathi, anyone knows why? I tried toggle key too.

Proud
माणसाच्या डोक्यापाशी चुकुनमाकुन पोचले की माकड लगेचच्च उवा शोधायला लागते हे मात्र पाहिले आहे. म्हणुन माकडाच्या डोक्यापाशी डोके नेऊ नका. (ह्म्म, पायाच्या निगेवरुन डोक्यातल्या साळ्कायामाळकायांपर्यंत गाडी पोचली).

कॉर्न कॅप लावा .
निघत नसेल तर डॉक्टरांना विचारून काढता येते का बघा.
काही वर्षापूर्वी माझ्या पायाची डॉक्टरांनी लोकल भूल देवून काढून दिला होता .

Pages