Submitted by जहीर कलाम on 12 March, 2013 - 03:48
कताह:-
मी कुठे होतो असा, कोणी घडवले मज असे…!
दैव किंवा देवता कोणी फ़सवले मज असे….!!
मेघ-मल्हारात ज्याने काळजाला जाळले-,
दीप-रागाने तयाच्या का विझवले मज असे….!!!
गज़ल…..!
जे यायचे सदा मला, भेटावयास लोक…!
आता कशास लागले, टाळावयास लोक...!१!
मी ही सदाच पोळलो, वैराण जीवनात-
राखेत चालले मला ,शोधावयास लोक….!२!
मी श्वास सोडल्यावरी,ना लाभली उसंत-
झाले किती उतावळे, जाळावयास लोक…!३!
आलो कसे बसेच ते आयुष्य संपवून-
माझे हिशोब लागले ,मांडावयास लोक…!४!
देवून कवच-कुंडले मी टाकली ‘ज़हीर’
आले सुवर्ण-दंत ही मागावयास लोक…!५!
ज़हीर कलाम
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वागत आपले !!
स्वागत आपले !!
----------------------------------------------
माणसांशी वागतांना, चूक होणे टाळले मी
माणसांना टाळतांना, उंब-यांना चाळले मी
- संध्या
सुंदर आपल्याच शैलीतली
सुंदर आपल्याच शैलीतली गझल....
मायबोलीवर खूप खूप स्वागत आहे, मजा येणार आता.
जहीरजी नमस्कार आणि
जहीरजी नमस्कार आणि स्वागत!
अधिक येऊद्या.
छान आहे.....आवडली...
छान आहे.....आवडली...
प्रत्येक शेर लाजवाब, खूप छान
प्रत्येक शेर लाजवाब, खूप छान गझल
जहीरजी, मस्त. आवडली गझल
जहीरजी,
मस्त. आवडली गझल .
फेसबुकवर आपलं लेखन वाचतोच. इथंही वाचायला आवडेल.
जहीरजी, मस्त. आवडली गझल
जहीरजी,
मस्त. आवडली गझल .
फेसबुकवर आपलं लेखन वाचतोच. इथंही वाचायला आवडेल.