Submitted by पुरंदरे शशांक on 24 February, 2013 - 08:41
बाळासोबत
छान छोटी चिऊताई
कित्ती गोड गाणे गाई
कावळेभाऊ येतात तडक
खाऊवर मारती झडप
राणीसाहेब मनीमाऊ
दूध आणा लवकर पाहू
पोपटराव हिरवे पाटील
मिठू मिठू गजर करतील
भू भू येते इवले सान
बाळासोबत खेळे छान
चांदो येतो गोड हसत
बाळ झोपे खुसखुसत...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मस्तच!
मस्तच!
सर्व मान्यवर, जाणकार रसिकांचे
सर्व मान्यवर, जाणकार रसिकांचे मनापासून आभार - असाच लोभ असूद्या...