अध्यात्माचा समाजाला फायदा काय आणि किती?

Submitted by रमेश भिडे on 3 March, 2013 - 08:21

कुंडलिनी जागृत झालेल्यांचा, आत्मज्ञान्यांचा, योग्यांचा इ. समाजाला काय फायदा आहे ? - याचे उत्तर

प्रथमतः अशा काही महात्म्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करायला हवा. किंवा किंचित् माहिती तरी घ्यायला हवी -
क) महर्षी महेश योगी -
महर्षी महेश योगींनी जगाला ट्रान्सेंडेंटल मेडिटेशनची फार मोठी भेट जगाला दिली. लक्षावधी लोकांनी ट्रान्सेन्डेंटल मेडिटेशन करून स्वतःची कार्यक्षमता वाढवली. कमीत कमी प्रयत्नांत स्वतःची जास्तीत जास्त भौतिक प्रगती कशी साधावी हे महर्षींनी जगाला शिकवलं.
(याचा अर्थ त्यांनी जगाला आळशी बनवलं असा जर कोणी काढणार असेल तर त्याच्या बुद्धीची कीव करावी लागेल. कारण यालाच मॅनेजमेंटच्या भाषेत प्रॉडक्टिव्हिटी वाढवणं म्हणतात. होय ना ?).
टी.एम. ने चित्ताची स्थिरता, व्यवहार करतानाही शांतता व आनंदाचा अनुभव - हे महर्षींनी जगाला दिलं.
जगभर महर्षी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट त्यांनी चालू केलं. (याचाही अर्थ शिक्षणाचा धंदा केला असं कुणी म्हणत असेल तर त्याची कीव करावी तितकी कमीच)
वेदांमधल्या ऋचांचा वैज्ञानिक अभ्यास, तसेच टी.एम. आणि टी.एम.सिद्धी (वेदिक फ्लाईंग) चा अभ्यास हा जगातील 600 पेक्षा अधिक विश्वविद्यालयांमध्ये चालू आहे (भारता बाहेरच्या - हे म्हटल्यावर लोकांना जास्त अभिमान व खात्री वाटू शकेल !)

ख) स्वामी राम
आयुष्याची 40 पेक्षा अधिक वर्षे हिमालयीन साधूसंतांच्या सहवासात राहून, हिमालय उभा आडवा पायी पिंजून काढलेले, शिक्षणाने होमिओपाथ - असे स्वामीराम हे आधुनिक युगातील महान योगी. हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ची स्थापना त्यांनी केली. त्यांच्याबद्दलचीही माहिती नेट वर मिळू शकेल. 'लिव्हिंग विथ हिमालयीन मास्टर्स' हे त्यांचं आत्मचरित्र अवश्य वाचावं (मग जमल्यास टीका करावी).

ग) तपसी बाबा, प.पू.योगतपस्वी नारायणकाका ढेकणे महाराज, डॉ. जी.के. प्रधान अशा महात्म्यांचे, योग्यांचे त्यांच्या त्यांच्या वैज्ञानिक अभ्यासाच्या क्षेत्रातले योगदान काय आहे हे आधी अभ्यासावे, मग नावे ठेवण्याची हिंमत होणार नाही. नावे ही दिली, पण असे अनेक महात्मे आहेत.

घ) ओशोंसारखे लोक उच्चरवाने सांगतात की भरपूर पैसा मिळवा, राष्ट्राला श्रीमंत करा वगैरे, परंतु त्यांच्या त्या सांगण्यापेक्षा व इतर विषयांमधील अत्यंत सुंदर तात्त्विक विवेचनांपेक्षा मूर्ख व कामी लोक 'संभोग से समाधी' ही त्यांची ओळख करून ठेवतात. त्या बाबतीत गॉसिप करताना ते मूर्ख हे विसरतात की ध्येय समाधी आहे, त्यांना रस मात्र केवळ संभोगात असल्याने ते त्यातच अडकतात, आणि टीका करत बसतात. त्यांचं बाकीचं तत्त्वज्ञान मात्र पूर्ण डोळ्याआड करतात !

आता,

समाजाला काय उपयोग झाला - हे विचारताना - मला एक सांगा, स्वतःचे सांसारिक आणि पारमार्थिक - दोन्ही प्रकारचे प्रश्न घेऊन लोक अशा योग्यांकडे जातात. स्वतःसाठी कणभरही धन वगैरे न घेता योग्यांकडून होणारं मार्गदर्शन ज्या प्रमाणात समाजाला मदत करत आलं आहे - शतकानुशतकं - त्याचा किंचितसा देखील अनुभव अनेकांनी घेतलेला नसतो.

महर्षी महेश योगींनी 'टी.एम. करणार्‍यांची टीम सीमारेषेवर नेमा, ते तिथे टी.एम. करतील. त्याने शेजारी शत्रू राष्ट्राच्या शत्रुतेचेच निरसन होईल. शत्रुता संपली की काही प्रश्न रहाणार नाहीत' असं सरकारला सांगितलं होतं. विज्ञानवाद्यांनी व त्यांची तळी उचलणार्‍या सरकारने हा प्रयोग करून बघितला काय ? आणि प्रयोग न करता 'हे असलं काही होत नसतं' अश्या प्रकारची मूर्ख बडबड करणारे विज्ञानवादी होऊ शकतात काय ? विज्ञानाचा आणि त्यांचा कणमात्र तरी संबंध आहे असं म्हणता येईल काय ?

ह्या देशात भौतिक उन्नतीला टाकावू समजले गेलेले नाही. पण केवळ भौतिक उन्नतीच्या मागे लागणे मात्र दरिद्रतेचे लक्षण समजले गेले आहे - हे निश्चित. शंकराचार्यांसारखे महात्मे आत्मिक उन्नतीबरोबरच भौतिक उन्नती, आर्थिक भरभराटीसाठी देखिल कनकधारा स्तोत्र, महालक्ष्म्यष्टकासारखी स्तोत्र देखिल देऊन गेले आहेत. पुरुषार्थ करूनही काही कारणाने अर्थप्राप्ती होत नसेल, तर ह्या स्तोत्रांचा अवलंब केला जातो.

इथे भर्तृहरीसारखे राज्यत्याग करून योगसाधनेच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेले निवृत्तीमार्गी आहेत तर त्याचाच भाऊ विक्रमादित्यासारखे राज्य करून, लोककल्याणही साधत, प्रवृत्तीमार्गी राहूनही आत्मज्ञान प्राप्त केलेले महात्मे आहेत.

ज्ञान आणि माहिती यात फरक केला तर तो का खटकावा? हे मात्र मला समजत नाही. माहिती ही बाहेरून मिळते. ज्ञान आतून उमलतं.

तेव्हा, अध्यात्म, कुंडलिनी, गुरू इत्यादींबद्दल अभ्यासाच्या व अनुभवाच्या अभावातून (ही शक्यता म्हणून लिहीत आहे, आरोप करणार्‍या सर्वांच्या बाबतीत ते तसेच आहे का हे मला निश्चित ठावे नाही) पूर्वग्रहदूषित विधाने करून गैरसमज पसरवणे विज्ञानवादी म्हणवणार्‍यांनी थांबवावे, अथवा त्यांचा विज्ञानाचे अभ्यासक असल्याचा बुरखा फाटेल - अशी मला खात्री वाटते.

(ह्या लिखाणात कोणावरही वैयक्तिक आरोप, आकस, टीका इत्यादी करण्याचा अजिबात मानस नाही. तात्त्विक चर्चा आहे, मोकळेपणाने होणारी आहे - त्यामुळे आडपडदा न ठेवता लिहीत आहे. कुणाचे मन दुखावल्यास मी त्याच्या हृदयस्थ परमेश्वराची क्षमा मागतोच, शिवाय त्यानेही 'आपण का दुखावलो' याचा शोध घ्यावा.)

(साभार -हर्षा परचुरे -फेसबुक यांच्या पूर्व परवानगीने इथे प्रकाशित )

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो हेलबॉय,
हे भिडे यांचे ज्ञान वा मत नाही. त्या कुणी परचुरे यांचे फेसबुकी तत्वज्ञान यांनी परावर्तीत केलेय.

>>> हेलबॉय | 3 March, 2013 - 10:27 नवीन भिडेकाका कशाला अमेरिकेत बसुन त्रास करुन घेता? आम्ही बघतो इकडचे काय ते, आपण मजा करा.

अहो हेलबॉय कशाला हेल मध्ये राहून त्रास करून घेता? भिडेकाका... तुमच चालू द्या... अजून येउ द्या... हेल मध्ये internet connection आल्या पासून तिथली बॉय लोक जास्तिच बोलायला लागली आहेत.

हे भिडे यांचे ज्ञान वा मत नाही. त्या कुणी परचुरे यांचे फेसबुकी तत्वज्ञान यांनी परावर्तीत केलेय.

>>>

लुक हू इज टॉकिंग Rofl

"असा" सावरकर,
तुमची विपूची सोय तुम्ही का बंद केली हो? आठवतंय का? गप पडा सांगितलं होतं ना?
अ‍ॅडमिनच्या विपूत रांगोळ्या काढता तुम्ही.
तुमची मला पाठवलेली "ती" मेल अ‍ॅडमिनकडे पाठवू का पुढे? Wink की सायबरक्राईमसेल कडे धमकीच्या मेल बद्दलची ऑफिशिअल तक्रार करू?

नवा डूआयडी काढा आता.

ह्या यादीत प.पू.गगनगिरी महाराजांचे नाव राहिले की ओ. 'गगनगडावरचा आक्रोश' हे पुस्तक (अनियतकालिकदेखील असे ह्याच नावाचे) वाचा आणि मग चर्चा करा.

आठवतंय का? गप पडा सांगितलं होतं ना?

>> वैयक्तिक प्रतिसादाचा निषेध. तसं पण, "गप पडा" असं फक्त अ‍ॅडमिन (साईटचे मालक) सांगू शकतात. आणि अ‍ॅडमिन तुमचे पिताश्री असल्याचे ऐकिवात नाही Light 1 Proud Rofl Biggrin

---------------------------------------------------------------------------------------------------------
तुमची मला पाठवलेली "ती" मेल अ‍ॅडमिनकडे पाठवू का पुढे? Wink की सायबरक्राईमसेल कडे धमकीच्या मेल बद्दलची ऑफिशिअल तक्रार करू?

>>>

तुम्हाला स्वतःचे हसू करुन घेण्याची हौस दिसते. चालायचंच वय झालंय तुमचं. जरूर तक्रार करा. तुमच्यात धमक असती तर आत्तापर्यंत तक्रार केली असतीत.

तुमची पण तक्रार करायची आहे. तुमचे खरे नाव पत्ता देता का? नाही म्हणजे....आमचे बाकीचे कष्ट वाचतील म्हणून सांगितलं Wink

चला साडेदहा वाजायला आले आहेत आता. झोपा जाऊन. Proud

रमेशजी ,वरील लेख छान आहे,खरतर हा प्रश्न आणि त्यावरची उत्तरे आणि मते यात प्रचंड मतभेद असणार ,आणि त्यातून काही निष्पन्न होईल का हाही एक प्रश्न आहे .

ज्ञान आणि माहिती यात फरक केला तर तो का खटकावा?
हे दोन्ही वेगळे आहेत हे कसे, हे कळले की माहिती होते. ते वेगळे नाहीत असे वाटत असेल तर ते अज्ञान. माहिती मिळाल्यावरहि तसेच वाटत असेल तर अजून माहिती मिळायला हवी. त्याने ज्ञान येईलच असे नाही.

>>> कुंडलिनी जागृत झालेल्यांचा, आत्मज्ञान्यांचा, योग्यांचा इ. समाजाला काय फायदा आहे ? - याचे उत्तर <<<<<<
तुमचे इथे दिलेले उत्तर भारी आहेच
पण माझेही उत्तर.....
कुन्डलिनी जागृतीचे सोडा, पण जागृतीच्या जाणिवेच्या/इच्छेच्या जवळपासही जर मनुष्य पोचला, तर त्याच्यातील "माणुसपणही" जागे होते असे माझे मत.
त्याच्यातील क्रुरकर्मा/वाईट इच्छा/हपापलेली वृत्ती नाहीशी होऊन समाजाला एका परिपूर्ण उदार, दानी, व मुख्य म्हणजे निरुपद्रवी माणसाचा लाभ होतो.
अन जन्माला आलेल्या व्यक्तितून अशा मनुष्यान्ची निर्मिती व्हावि ह्याच हेतुने तर अवघे हिन्दू धर्मशास्त्र त्यातिल चालिरितीरुढीपरंपरा, देवपूजा, अनेकश्वरवाद, व शेवटी द्वैतातून अद्वैताकडे अशी वाटचाल करणे अभिप्रेत असलेल्या बाबी आल्यात. यावर विश्वास बसत नसेल, तर व्यक्तिस गीतेतून कर्मसिद्धान्तही सान्गितला आहेच. या सर्व बाबीन्चा अभ्यास म्हणण्यापेक्षाही, या सर्व बाबी नित्याच्या श्वासाप्रमाणे, रोजच्या स्नानशौचादिक कार्याप्रमाणे अंगवळणी पडणे अपेक्षित आहे, व असे अंगवळणी पडलेल्या व्यक्तिस हिंसा/अहिंसा वगैरे चा बोध वेगळा करुन द्यायची गरज पडत नाहीच शिवाय आत्यन्तिक हिंसा/अहिंसेच्या भ्रमातही तो सापडत नाही. व समाजास एक निखळ समाजास उपयोगी अशीच व्यक्ति तिच्या जिवित असेपर्यन्त लाभलेली असते. असो.

[झक्कीबोवा, २००५ साली तुम्ही मला प्रत्यक्षपणे काही एक प्रश्न विचारला होतात की असे असे आहे, तर याचा न त्याचा उपयोग काय? माणसाने कसा उपयोग करुन घ्यावा, तर वरील धाग्याच्या निमित्ताने तुमच्याही प्रश्नाच्या उत्तराच्या जवळपास पोचायचा मी प्रयत्न केला आहे. त्यावेळेस २००५ मधे ठामपणे उत्तर देता आले नव्हते असे पुसटसे स्मरते. Happy ]

ओशोंसारखे लोक उच्चरवाने सांगतात की भरपूर पैसा मिळवा, राष्ट्राला श्रीमंत करा वगैरे, परंतु त्यांच्या त्या सांगण्यापेक्षा व इतर विषयांमधील अत्यंत सुंदर तात्त्विक विवेचनांपेक्षा मूर्ख व कामी लोक 'संभोग से समाधी' ही त्यांची ओळख करून ठेवतात.>>>>>>> हास्यास्पद पोस्ट. असु देत. तुमच्याशी वाद घालण्याचा काहि उपयोग नाहि याची मला जाणीव आहे.

असा >> +१
हेलबॉय >>> +१

अमेरिकेत बसुन त्रास करुन घेता?
अहो अमेरिकेतच बसून त्रास करून घ्यायचा.

भारतात कधी कुणी काही करतच नाही. नुसतीच बडबड! दुसर्‍याला नावे ठेवणे, त्यांनी काही केले की ते चोरून घेणे याशिवाय त्यांना दुसरे काहीच येत नाही.
शिवाय हा विषय फक्त मनुष्यप्राण्यांसाठी आहे, तुम्हाला त्याचा त्रासच!!
इकडे न येणेच तुमच्या भल्यासाठी.

भिडेकाका,

अध्यात्माचा विषय अनुभवाचा नाही तर अनुभुतीचा आहे अस म्हणल जात. ज्याला अनुभव आला तो गुण गाईल. अध्यात्म हा टाकाऊ विषय आहे असे ज्याने मत बनवलेले आहे त्याला सांगुन काही फायदा नाही.

ज्यांना अनुभव घ्यायचा आहे किंवा अनुभुती घ्यायची आहे ते पैसे मोजुन सुध्दा जातात. जे स्वतः या विषयातलते तज्ञ आहेत ते लोक काय म्हणतात याची पर्वा करत नाहीत.

मी बजाज अ‍ॅटो या कंपनीत योग अभ्यास योग विद्या धाम नाशीक यांच्या समन्वयाने सुरु केला. ( हे आत्मप्रौढी साठी लिहलेले नाही ) जेव्हा जेव्हा सर्व्हे घेतला जायचा तेव्हा अनेक लोकांनी जे विनाकारण चिडायचे आणि आपली मनस्थिती गमवायचे त्यांनी लिहुन दिले आहे की आम्हाला मनस्वास्थ्य लाभले.

Limbu-Timbu, Nitin Chandra, Zakki, Maanus, Asaa . . . .

+++++1 x 33 Koti . . . .

१ नंबर लेख. limbutimbu तुमचा प्रतिसादही अव्वल. अध्यात्माच्या विरोधात ओरड करणाऱ्या मंद्बुद्दी लोकांकडे लक्ष द्यायची गरज नाही . योगी महेश ह्याचं १ पुस्तक मी वाचला होतं. नाव आत्ता आठवत नाही .
स्वामी राम ह्यांच्यावारचा 'हिमालय के संतोन के संग निवास ' हे पुस्तक वाचलंय . अद्भुत पुस्तक आहे अनेक वेळा प . पू श्री नारायणकाका ढेकणे ह्यांच्याकडून अनुग्रह घेण्याच मनात आला होतं . पण चालढकल नडली . आता पश्चाताप होतोय. कारण आता असे योगी फार दुर्मिळ. भोंदू बाबांनीच जग भरू गेलंय.

अरे हा एवढा चांगला लेख कसा काय सुटला ?
ज्यांनी कोणी लिहिला आहे भिडे असोत नाही तर परचुरे (मुळ विषयाकडे का लक्ष देत नाहीत लोक देव जाणे) त्यांनी कमीत कमी शब्दात बरोब्बर मुद्द्याचे लिहिलेले आहे.

>>तसेच टी.एम. आणि टी.एम.सिद्धी (वेदिक फ्लाईंग) चा अभ्यास हा जगातील 600 पेक्षा अधिक विश्वविद्यालयांमध्ये चालू आहे (भारता बाहेरच्या - हे म्हटल्यावर लोकांना जास्त अभिमान व खात्री वाटू शकेल !) Lol

>>आत्मचरित्र अवश्य वाचावं (मग जमल्यास टीका करावी). +१०१

>>त्या बाबतीत गॉसिप करताना ते मूर्ख हे विसरतात की ध्येय समाधी आहे, +१०१

येथे कोणी फारसे फिरकलेले दिसत नाही. Wink