ऑस्ट्रेलियन करंसी चे भवितव्य

Submitted by यक्ष on 26 December, 2012 - 04:56

माझ्या एका अमेरिकेत स्थायिक मैत्रिणिला ऑस्ट्रेलियन डॉलर ६० रु. चे आसपास गेल्याचे माहितच नव्हते! ती २५ - २६ च समजत होती.! तिला आश्चर्यच वाटले की यू.एस.डी. पेक्षा ज्यास्त कसा?

तर प्रश्न असा की ए.यू.डी. व यू.एस.डी. पैकी भविष्यात काय ज्यास्त स्थिर वा वाढिव राहिल?

ए.यू.डी. (करंसी) त गुंतवणूकिबद्दल कुणी माहिती देऊ शकेल?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

AUD कायमच USD पेक्षा जोरात पुढे रहाणार, कारण ओस्ट्रेलिया हा अतिशय सम्रुद्ध देश आहे. अमेरिकेप्रमाणे कर्जबाजारी नाही. Long term ला the best of all currencies !!

AUD is commodity rich country. If gold platinum & other material cost goes higher then AUD is high. I'f gold price stabilizes over few years than USD may be stronger than AUD.

ऑस्ट्रेलियाचे चलन हे फक्त सोन्याशीच निगडित नाही. चलन जोमात पुढे येण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. प्रामुख्याने खनिजे, भौगोलिक स्थान आणि देशाचे सरकार व त्याची धोरणे हे महत्त्वाचे असतात.

ऑस्ट्रेलियाची खनिजे - ऑस्ट्रेलिया वाळवंटी असला तरी हा अतिशय खनिज समृद्ध प्रदेश आहे. सोने, नैसर्गिक वायू, लोह, कोळसा, निकेल, युरेनियम आणि इतर खनिजांचे विपुल साठे येथे आहेत.

लोहः लोहाचे निर्यात चीन ला मोठ्या प्रमाणात होते. ही इतकी मोठ्या प्रमाणात होते की खास त्यासाठीच २४ तास चालणारी अतिभव्य बंदरे उभी केली गेली आहेत. ही रेल्वे ने जोडलेली आहेत.

नैसर्गिक वायू: ऑस्ट्रेलियामध्ये देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर नैसर्गिक वायू खुप मोठ्या प्रमाणात सापडला आहे. हा चीन व जपान ला निर्यात होतो. त्यासाठी २० व ३० वर्षांचे दीर्घ आणि अति प्रचंड रकमांचे व्य्वहार झाले आहेत. काही व्यवहार अजूनही होत आहेत.

कोळसा: उत्तम प्रतिचा कोळाश्याचे अतिप्रचंड साठे ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. सगळ्या जगाला सुमारे २० वर्ष पुरवता येईल इतका साठा येथे आहे असे म्हणतात. यातला काही भारतातही येतो. या शिवाय निम्न दर्जाचा म्हणजे तपकिरी कोळसा याचेही मोठे साठे आहेत. ते अजून फारसे वापरात नाहीत.

सोने: फक्त व्हिक्टोरिया या ऑस्ट्रेलियाच्या सर्वात छोट्या राज्यात आजवर शोध लागलेल्या जगाच्या ५% सोन्यासा साठा आहे!

शेती + पशु पालनः यांत्रिक शेतीचे उत्पन्न आणि उत्तम प्रतिचे पशु याची खाद्य म्हणून मोठी निर्यात होते. (घोडे आणी गायी हे पशु प्रामुख्याने अरब जगतात आणि इंडोनेशियाला)

शिक्षणः प्रामुख्याने आशियायी विद्यार्थ्यांना हे विकले जाते. पुर्वी अमेरिकेला विकले जात असे. पण ऑस. डॉलर महागल्यावर ते गायब झाले. काही युरोपीय येतात.

सरकारी धोरणः सध्या आशियायी देशात आलेल्या आणि येत असलेल्या वेगवान आर्थिक घडामोडींना ऑस्ट्रेलियाच्या खनिजांचे इंधन पुरवले जात आहे. हे व्यवस्थित घडण्यासाठी देशाचे सरकार डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत आहे. देशाच्या आर्थिक बाबींना सदैव प्राथमिकता दिली जाते. प्रत्येक व्यवसायातून फायदा कसा घेतला जाईला याची आखणी केली जाते. त्याची धोरणीपणाने अंमलबजावणी होते.
म्हणून या देशाचे चलन पुढे आहे. अजून काही काळ तरी ते अग्रेसर राहील असे दिसते.

(कोळसा क्षेत्रात काही भारतीय संस्थांच्या गुंतवणुकी आहेत जसे अदाने गृप वगैरे. तसेच काही सोन्याच्या खाणी भारतीय लोकांच्या मालकीच्या आहेत. भारताला आर्थिक घोडदौड साधायची असेल तर इंधने आणि आणि खनिज क्षेत्रावर आपला अंमल आणण्याशिवाय गत्यंतर नाही. पण भारतीय कंपन्यांचा भोंगळ कारभार पाहता हे सद्य स्थितीत शक्य दिसत नाही...)

धन्यवाद निनाद जी...फार छान माहिती दिलीत...

आता तरी अमेरिकेला जाण्याचा सोस सोडून ऑस्ट्रेलिया कडे वळतील लोक !

"आता तरी अमेरिकेला जाण्याचा सोस सोडून ऑस्ट्रेलिया कडे वळतील लोक !"

@कात्रे साहेबः आपण वरचा प्रतिसाद खवचटपणे लिहिलाय का?

नैसर्गिक साधन सामुग्री बघितली तर भारत ऑस्ट्रेलियापेक्षा कमी नाही पण (बहुसंख्य) आळशी, अप्रामाणिक, बेशिस्त, अंधश्रद्ध लोकांमुळे आपण मागं आहोत. ज्यांना यातून बाहेर पडायचय अश्या क्रिम लेयरमधली लोकं बाहेर जाउन बस्तान बसवतात. भारताची परिस्थिती सुधारायची असेल तर या लोकांना इथं थांबवण्याचे प्रयत्न करणं तशी वातावरण निर्मिती करणं आवश्यक आहे. ते सोडून आपण त्यांना संकुचित फायद्यासाठी खुशाल युएस सोडून ऑस्ट्रेलियाला जायला सांगताय? _/\_

तुर्रम खान , युएस व्हिसा नाकारला म्हणून निराश होवून बसण्यापेक्षा आयुष्यात काहीतरी चांगले इतरत्र ही करता येईल की, त्या दृष्टीने कातरे म्हणतात त्याप्रमाणे औस्ट्रेलिया ल जाने हा चांगला पर्याय असू शकेल

हा मुद्दा मांडल्याबद्दल यक्ष आणि दिंनेषदा यांचे आभार

अहो भिडे साहेब, आयुष्यात काहीतरी चांगले भारतातच का करता येणार नाही? युएस नाही तर मग ऑस्ट्रेलिया असं करत करत शेवटी गल्फ कंट्रीज आहेतच की. युएस मध्ये जायला न मिळालेल्यांच्या निराशेची काळजी का करायची?

निनाद्जी, छान व ऊपयूक्त माहिती.
मला दोन वेळा जाण्याची संधी मिळाली. त्यात त्यांची प्रगती दिसली. फक्त महागडे वाट्ले. त्यांचे टूरिजम वर सुद्धा बारिक लक्ष अस्ल्याचे जाणवले.