अंकुर

Submitted by अज्ञात on 28 February, 2013 - 23:44

शुष्क दिसे, पोटी पण पाणी,
हृदयी एक कहाणी,
बीजे अगणित दडलेली,..
पाहिली कधी का कोणी ?

सर सर सर शिरवा शिडकावा
काहुरते एक विरह राणी
हुरहुरते सुप्त, डंवरते मन
अंकुरते व्याकुळ धरणी

....................अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर कविता , अज्ञातजी !
काही ओळींत मोहिनी घालण्याची क्षमता जाणवली तर
काही ठिकाणी लय बिघडल्यासारखी वाटली . विशेषतः शेवटच्या दोन ओळी .
वै म कृ गै न.