Submitted by मुग्धमानसी on 1 March, 2013 - 00:27
कुठे मी भेटले होते तुला ते आठवत नाही
’तशा’ स्मरणांस कोठे ठेवले ते आठवत नाही...
तुझ्या डोळ्यांत पाहून लाजलेला चंद्र माझा
घरावर टांगलेला कोणी खुडला आठवत नाही...
कधी तळहात माझे मेहेंदीचे तू चुंबिले होते
कधी ते रंगले त्यानंतरी ते आठवत नाही...
तुझा तो प्रश्न हळवासा अजुनही आठवे मज
कसे माझेच उत्तर हाय, मजला आठवत नाही...
मला उमलायचे होते, तुला बहरायचे होते
अचानक काय चुकले ते मलाही आठवत नाही...
तुझ्या स्वप्नांस माझ्या अश्रुंनी पोसायचे होते
कशी स्वप्नेच या अश्रुंत बुडली आठवत नाही...
कसा हा एकमेकांतून स्वतःचा शोध घेताना
कुणी कोणास पहिल्यांदा गमवले आठवत नाही...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<कधी तळहात माझे मेंदिचे तू
<कधी तळहात माझे मेंदिचे तू चुंबिले होते>
मेंदिचे की मेहेन्दीचे ?? एक शंका...
<कसे माझेच उत्तर हाय मजला आठवत नाही...>
हाय.. कि आहे?
कसे माझेच उत्तर हाय, मजला आठवत नाही..
(व्यक्तिगत सूचना)
बाकी मस्त .. आवडली.
मला उमलायचे होते, तुला
मला उमलायचे होते, तुला बहरायचे होते
अचानक काय चुकले ते मलाही आठवत नाही
शेर आवडला.
धन्यवाद विनायक. बदल केले
धन्यवाद विनायक. बदल केले आहेत.
धन्यवाद समीर.
छान . आवडली .
छान . आवडली .
तुझा तो प्रश्न हळवासा अजुनही
तुझा तो प्रश्न हळवासा अजुनही आठवे मज
कसे माझेच उत्तर हाय, मजला आठवत नाही...
मला उमलायचे होते, तुला बहरायचे होते
अचानक काय चुकले ते मलाही आठवत नाही...
तुझ्या स्वप्नांस माझ्या अश्रुंनी पोसायचे होते
कशी स्वप्नेच या अश्रुंत बुडली आठवत नाही...
कसा हा एकमेकांतून स्वतःचा शोध घेताना
कुणी कोणास पहिल्यांदा गमवले आठवत नाही...
>>
वाह! वाह!
छान ...! समीर +१
छान ...!
समीर +१
मिठीत शिरूनी तूझ्या काही
मिठीत शिरूनी तूझ्या काही सांगायचे होते
कोण जिंकले कोण हरले काही आठवत नाही
-----------------------------------------------
फारच छान.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
आवडेश !!!
आवडेश !!!
ॅ मिठीत शिरूनी तूझ्या काही
ॅ मिठीत शिरूनी तूझ्या काही सांगायचे होते
कोण जिंकले कोण हरले काही आठवत नाही ह्ज ज्क -----------------------------------------------
<कधी तळहात माझे मेंदिचे तू
<कधी तळहात माझे मेंदिचे तू चुंबिले होते>
मेंदिचे की मेहेन्दीचे ?? एक शंका...
मला 'मेंदिचे' जास्त भावतो ,मराठी वाटतो. छान कविता .
हेलबॉय >>>??? सर्वांना
हेलबॉय >>>???
सर्वांना धन्यवाद! विक्रांत, मलाही खरंतर 'मेंदी' हाच शब्द जास्त जवळचा वाटतो.