.....चित्र तसं पूर्ण होत आलंच होतं!!

Submitted by बागेश्री on 1 March, 2013 - 23:29

अनेक उभ्या- आडव्या
रेखा जोडत,
पूर्णत्वाचा आकार
साकारला गेलाच होता,
......चित्र तसं पूर्ण होत आलंच होतं!!

घोंघावणारा वारा होता,
शमलेली धूळ होती,
पावसाचा भास होता,
सुख- दु:खाची सरमिसळ होती....

आता हवी फक्त 'एक रेषा'
तुझ्या ओठांच्या दोन टोकांना जोडणारी
निर्जीव ह्या चित्रात,
स्मितहास्य भरणारी..

रंगाशिवायही जुळून आलेलं
ते एक रेखाचित्र होतं,
शेवटच्या ह्या रेषेनंतर
आजन्म जपावं असं गुपित होतं,
......चित्र तसं पूर्ण होत आलंच होतं!!

पण;
नियतीचं वादळ चुकलंय कुणाला?
माझा कागदच उडवून नेलाय....

पूर्वप्रकाशित @
http://venusahitya.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नियतीचं वादळ चुकलंय कुणाला?
माझा कागदच उडवून नेलाय.... >>>>>> ओहो हो ...

सर्व कविता - क्या बात है.....

वा वा क्या बात
म्हणतात ना ; की स्फूट-काव्य लिहावं तर बागेश्रीनेच !!! ते कै उगीच्च नै कै !!!
क्या बात क्याबात

खासंच !
नियतीने उडवून नेलेल्या कागदातून हृदयालाच हात घातलात वाचकाच्या !
कविता खूप आवडली .

कागद ऊडून गेला म्हणून काय झालं.
मनातलं चित्र पूसलं जातं का ?
नविन विचारांचे ब्रश घ्या आणि जोमाने कामाला लागा
चित्र पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसू नका....!
----------------------------------------------------------

खूप सूंदर विचार आहेत....कविता आवडली.

बागेश्री:

शेवट सोडल्यास कविता भावली.
प्रत्येक कवितेत कलाटणी हवीच का, हा विचार आला.

नियतीचं वादळ चुकलंय कुणाला?

ते एक रेखाचित्र होतं,
शेवटच्या ह्या रेषेनंतर
आजन्म जपावं असं गुपित होतं,

आवडली कल्पना......

नियतीचं वादळ चुकलंय कुणाला?
माझा कागदच उडवून नेलाय....
>>> व्हाय धीस कोलावरी डी?

सर्वांची मनःपूर्वक आभारी आहे दोस्तहो...!

वैभव, मधेच काय रे हे Happy

समीर,
पटण्यासारखं आहे...
कलाटणी हवी का? >> ह्या प्रश्नाचं उत्तर "आवश्यकता नाही" असंच आहे

कलाटणी हवी म्हणून तसं घडतं असं मात्र नाही, हा फॉर्म इतका अंगभूत आहे की सुचतानाच तसं सुचतं! मुद्दाम असं लिहावं असा हेतू नसतो... शिवाय आहेत अशाही कविता ज्यात प्रत्येकच वेळी असा शेवट नाही... असो.. सखोल विचार करायला लावल्याबद्दल तुझे आभार Happy

चिखल्या, मला प्रतिसाद आवडला तुझा Lol

@बाबा: थँक यू Happy

बागु सुप्पर्ब!!!!!!!!!!!!!!!!!!!