आठवत नाही...

Submitted by मुग्धमानसी on 1 March, 2013 - 00:27

कुठे मी भेटले होते तुला ते आठवत नाही
’तशा’ स्मरणांस कोठे ठेवले ते आठवत नाही...

तुझ्या डोळ्यांत पाहून लाजलेला चंद्र माझा
घरावर टांगलेला कोणी खुडला आठवत नाही...

कधी तळहात माझे मेहेंदीचे तू चुंबिले होते
कधी ते रंगले त्यानंतरी ते आठवत नाही...

तुझा तो प्रश्न हळवासा अजुनही आठवे मज
कसे माझेच उत्तर हाय, मजला आठवत नाही...

मला उमलायचे होते, तुला बहरायचे होते
अचानक काय चुकले ते मलाही आठवत नाही...

तुझ्या स्वप्नांस माझ्या अश्रुंनी पोसायचे होते
कशी स्वप्नेच या अश्रुंत बुडली आठवत नाही...

कसा हा एकमेकांतून स्वतःचा शोध घेताना
कुणी कोणास पहिल्यांदा गमवले आठवत नाही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<कधी तळहात माझे मेंदिचे तू चुंबिले होते>

मेंदिचे की मेहेन्दीचे ?? एक शंका...

<कसे माझेच उत्तर हाय मजला आठवत नाही...>
हाय.. कि आहे?
कसे माझेच उत्तर हाय, मजला आठवत नाही..

(व्यक्तिगत सूचना)

बाकी मस्त .. आवडली.

मला उमलायचे होते, तुला बहरायचे होते
अचानक काय चुकले ते मलाही आठवत नाही

शेर आवडला.

तुझा तो प्रश्न हळवासा अजुनही आठवे मज
कसे माझेच उत्तर हाय, मजला आठवत नाही...

मला उमलायचे होते, तुला बहरायचे होते
अचानक काय चुकले ते मलाही आठवत नाही...

तुझ्या स्वप्नांस माझ्या अश्रुंनी पोसायचे होते
कशी स्वप्नेच या अश्रुंत बुडली आठवत नाही...

कसा हा एकमेकांतून स्वतःचा शोध घेताना
कुणी कोणास पहिल्यांदा गमवले आठवत नाही...
>>
वाह! वाह!

मिठीत शिरूनी तूझ्या काही सांगायचे होते
कोण जिंकले कोण हरले काही आठवत नाही
-----------------------------------------------

फारच छान.

ॅ मिठीत शिरूनी तूझ्या काही सांगायचे होते
कोण जिंकले कोण हरले काही आठवत नाही ह्ज ज्क
-----------------------------------------------

<कधी तळहात माझे मेंदिचे तू चुंबिले होते>

मेंदिचे की मेहेन्दीचे ?? एक शंका...

मला 'मेंदिचे' जास्त भावतो ,मराठी वाटतो. छान कविता .

हेलबॉय >>>???

सर्वांना धन्यवाद! विक्रांत, मलाही खरंतर 'मेंदी' हाच शब्द जास्त जवळचा वाटतो.