नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धा - पहिलं चित्र पाहिलंत का? तिथे 'राहणार्‍यांची' मराठी मूळं शोधा बरं. कदाचित काहीतरी 'आड'वाटेने लेखक गवसेल.

नाही शशांक. श्रद्धाने वर लिहिलंय त्याप्रमाणे मॉनेस्ट्रीकडे बघा. तिथे कोण राहतात ते शोधा. कदाचित लेखक तिथेच असेल.

The Black Saint and the Sinner Ladyचा काही संबंध????

नाही कविन. सगळे क्लू पहिल्यापासून वाचा बरं. लेखक दोन आहेत आणि प्राचीनी दोन्ही ओळखलेत.

Pages