नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी विजोड= भिन्न मोजे. आणि बहुतेक ते पुस्तक एड्स ह्या विषयावर आहे. त्यामुळे ती खूण.
>>> अरे देवा, मग ते नेमके गुलाबी, निळे रंग, मोज्यांवरच्या पाऊलखुणा हे सापळे होते तर!!!!
हा हंत हंत.

बिल्वा, धन्स.

ओ गॉड, हे सगळं मराठी बुक्सची नेम्स माहित नसल्यामुळे झालंय. जरा एफर्टस घेऊन मराठी बुक्सचं रिडिंग वाढवायला पाहिजे. Happy

1)नभात हसरे तारे
2)विज्ञानगंगेची अवखळ वळणे.
जयंत नारळीकर

काय राव संयोजक, माज्या कानात तर गानीबी वाजाय लागली हुती. Proud पुन्ना गॅलक्शीच्या टिरीपवर जाऊ म्हणता? ही मी निघाले!

ओ संयोजक, आता अगदीच एक रँडम गेस. तुम्ही ते १दा, ३ही लिहिताय त्यावरून.
पुस्तक सचिन तेंडुलकरावर आहे का? (असा घडला सचिन वगैरे?) कारण त्याचे नाव कधीकधी १०डुलकर लिहितात. आणि आकडे क्रिकेटच्या खेळावरही लावले जातात.

आता तो बाकीच्या गोष्टीशी कसा संबंधित आहे ते माहीत नाही मात्र. Proud

एकदा एका जुगार्‍याने झेन गुरुला विचारले," मला सगळ्या 'चित्रात' आकडे दिसतात. मी काय करु?" यावर झेनगुरु हसून म्हणाला," Don't panic!" त्याक्षणी त्या जुगार्‍याला 'अंतिम सत्य' गवसले.

चिनूक्स, 'अंतिम सत्या'ला न घाबरता सामोरे जा आणि त्याला +१ करा, मध्ये मंगळ- गुरु काहीही लागत नाहीत.
श्रद्धा - बरोबर रस्ता पकडला आहे. आता चिनूक्साला दिलेला सल्ला पाळा. सत्याला अनुमोदन द्या. जे सापडेल तेच उत्तरापाशी घेऊन जाईल.

७ हा Mersenne prime आहे. तो माणूस म्हणजे Marin Mersenne.
शेवटचे चित्र हिचहाईक आणि गॅलक्सी दाखवणारे. हिचहायकर्स गाईड टू गॅलक्सी नावाचे डग्लस अ‍ॅडम्सचे एक भन्नाट पुस्तक आहे. त्यातला महत्त्वाचा आकडा ४२. खाली ६*९ करून त्यात एक मिळवला आहे तसाच एक या ४२मध्ये मिळवायचा असे सूचित केले आहे. ते ४३. आता सात नि त्रेचाळीस मिळाल्यावर मध्ये सक्कं असणार. Happy

अच्छा, गणिताशी इतकं जास्त संबंधित होतं ... मला कळणं अशक्यच होतं Proud
असो. पण संयोजक एकदा प्रत्येक चित्र उलगडून सांगाच.

Pages