गडबडगुंता

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

gadbadgunta.jpg

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शहाण्याचा चाकर व्हावं मूर्खाचा धनी होऊ नये. (आता ही म्हण वरच्या अक्षरांप्रमाणे ठीक करावी लागेल. 'मू' दीर्घ हवा ना.)

>>क चा न ऊ ध चा ऊ चा हा हो ण्या मु ये नी हो न र्खा र श ये
काहीतरी गडबड आहे. यातली अक्षरं कॉपी पेस्ट करून म्हण केली. पण 'न ऊ ये हो' ही अक्षरं उरतात.

शहाण्याचा चाकर **** मुर्खाचा धनी होऊ नये.

मग ही अशी करायची..?
शहाण्याचा चाकर होऊन ये, मुर्खाचा धनी होऊ नये. (सगळी अक्षरं वापरल्या गेली.)

शहाण्याचा चाकर होऊन ये, मुर्खाचा धनी होऊ नये.>>> शहाण्याचा चाकर होऊ नये, मुर्खाचा धनी होऊ नये.
असं लिहीता येईल की!

आहे रेडा आणि म्हणे माझी धार काढा >>>> च्च च्च च्च च्च .... कुठुन म्हणींचं भांडार उघडलंय संयोजकांनी देव जाणे! एकेक असली चीजा येताहेत बाहेर. चँपियन लोकं ओळखतातेतही. Proud

Shahanyacha hou naye dhani, murkhacha hou naye chakar

शहाण्याचा होऊ नये धनी मुर्खाचा होऊ नये चाकर

सशल "हो" दोन आहेत की

मृ, बरोबर, पण माझ्याकडे असलेल्या दोन पुस्तकात दोन वेगवेगळ्या म्हणी दिल्यात. संदर्भासाठी मी बघितलं तेव्हा कळलं. ह्या आधीच्याही एका म्हणीच्या संदर्भाने तपासलं होतं तेव्हा दोन पुस्तकात दोन वर्जन्स आठळली म्हणींची.

एक पुस्तक पार जुनं आहे १८९९ मधलं अल्फ्रेड नावाच्या लेखकाचे आणि एक एका शिक्षिकेचे आहे इतक्यातले.

परवाच एक म्हण एकली ती आता आठवली(इकडच्या चावत म्हणी वाचून). हि कशी अजून दिली नाही हो?

हाडाचा अडकित्ता आणि बो* बेपत्ता

(खुतिगु मधून समा कडून साभार)

आजच्या कोड्यांसाठी तयार आहेत का सगळे?

चला तर, आजचा दिवस चालू करूया या कोड्याने Happy

ते रे चे ले गे ले रे रे रे ण आ य वा म को य आ सो धो वा

Pages