नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या वेगवेगळ्या कला आहेत का? pottery , sculptor , photography
वरच्या चित्रात पाककला , युद्ध, खेळ , नकाशा चा शोध ... काहीही ना? डोके कसे ही चालतेय Happy

किंवा कुणा कलाकराचे नाव ?

सामी, तुम्ही विषयाच्या जवळ पोचला आहात.
पहिल्या आणि शेवटच्या चित्रांचे अर्थ बरोबर ओळखले आहेत. मधले चित्र ओळखण्याची सुरुवातही बरोबर झाली होती. शिवाय चित्रांकडे जssssरा तिरकी मान करून पहा बरं काही मिळतय का? Happy

पहिल्या आणि शेवटच्या चित्रांचे अर्थ बरोबर ओळखले आहेत > पहिल्या सेट मधिल की दुसर्या?

एक क्षीण प्रयत्न. दुसरा क्लू पाहून जास्त वाटले हे शीर्षक असेल असं.

छंदांविषयी : अनिल अवचट
>>>> इतकं सोप्पं कशाला असेल? कळ लावून घे आधी मानेला. Proud

'स्टीव्ह जॉब्ज' नाही ना ?

त्यांचे शेवटचे शब्द होते "Oh Wow" (Ohio map ???#*)

दुसर्या क्ल्यु मधे सगळे जॉब्स होते ना ? ( काय्च्या काय ...लोकहो हसू नका)

अजून एक क्षीण प्रयत्न

स्वयंपाक शोध आणि बोध
लेखकः डॉ. मालती कारवारकर

पहिल्या क्ल्यु मधून स्वयंपाक - रेसिपी फोटो
शोध - नकाशा
बोध - बोधचिन्ह

Proud तोडले तारे

मान तिरपी केल्यावर कायबाय लिवल्यालं दिसतंय ... पण काय ते वाचता येईंन्ना. जर्मनगिर्मन मध्ये लिवलंय वाट्टं.

संयोजक क्ल्युलेल्स बनवणार्‍यांना शिकवणी देतात की काय????

दुसर्‍या चित्रातल्या कुंचल्यावरुन पुस्तक एलकुंचवारांचे/ त्यांच्यावर असेल असे वाटले होते Proud

स्टुडीओ चा कोट ऑफ आर्म्सशी काय संबन्ध संयोजक?
बाय द वे, स्टू वरून इतकावेळ पुस्तके आठवून झाली पण हे आवडलेले पुस्तक असूनही काय आठवले नाही Sad

Pages