चपखल!

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 06:18

इंग्रजी, मराठी, हिंदी अशा स्वतंत्र भाषांमधून आता आपण मिंग्रजी, हिंग्लिश वगैरे भाषांपर्यंत येऊन पोचलोय. भाषेची सर्रास मिसळ करताना मात्र एक जाणवतं, की एका भाषेतला तोच अचूक भाव दुसर्‍या भाषेत मात्र मांडता येत नाही. का, येईल? करायचा का प्रयत्न?

सादर करतोय एक गंमत खेळ 'चपखल'.

chapakhal_0.jpg

ह्यात दिल्या गेलेल्या इंग्रजी अथवा हिंदी वाक्यांचे दोन अनुवाद करायचे आहेत. एक शब्दश: आणि एक भावानुवाद. शब्दशः अर्थातच शब्दश: अनुवाद करायचा आहे. भावानुवादात, वाक्याच्या आशयानुसार शब्द बदलले तरी चालतील.

उदाहरणार्थः What's up? / Wassup?

शब्दशः काय आहे वर?

भावानुवाद: काय मग, कसं काय चाललंय?

या ऐवजी, एखादा अस्सल कोल्हापुरी असेल, तर म्हणेल, 'काय काय आनि?'

आलं लक्षात? मग करूया सुरू..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुशा, कोण येईल मगर्मिठी मारायला?
शोभा डिस्क्व्हरी वगैरे जनावरांच्या चॅनलवरचे फेवरीट आहोत आम्ही

लोकहो, सहसा हे वाक्य इंग्रजीत 'विशुद्ध प्रेम/ वात्सल्य' ह्या भावनेने म्हणले जाते. भावानुवादात या भावनेची अपेक्षा आहे.

ये माझ्या जवळ.....मला तुझ्या मिठीत घे .......

हम को हमी से चुरालो
दिल मे युही तुम छुपालो
हम अकेले हो ना जाये
दुर तुमसे हो ना जाये
पास आओ गले से लगालो
पास आओ गले से लगालो.........
.
.तुमच इंग्लिश तर आमच """""हिंदी"""" ... Happy

हह, शक्यतो नाही.

थोडं अवघड पडलं का हे वाक्य? Happy

हह आणि इन्द्रधनु संयुक्त विजेते या वाक्यासाठी.

हे तुमच्यासाठी:

2013 prize 8.jpg

संयोजक : खेळ मस्त आहे ! विजेता जाहीर करताना त्यांची उत्तरं लिहा प्लीज तुमच्या पोष्टित. (बर्याच वेळेला लिहिले आहेत. १/२ दा मिस झालंय). नाहीतर पार वरपर्यंत जाऊन शोधावे लागतात विजेती उत्तरं.

हे जग, ही मैफील माझ्या कामाची (उपयोगाची) नाही...

मैफिली कंटाळवाण्या, जगही कंटाळवाणे,
काय माझे काम येथे, मी बरे येथून जाणे...

हे जग, ही मैफील माझ्यासाठी निरुपयोगी आहे.
ह्या जगात माझे असे कोणी कोणी नाही....हा मी चाललो मरायला....

हे जग, ही मैफील माझ्या कामाची नाही.

आयुष्यात काही राम उरला नाही आता / आयुष्याची मैफल माझ्यासाठी सुनी सुनी झालीय.

'यह दुनिया यह महफिल मेरे काम की नही'
हे जग, ही मैफिल माझ्या कामाची नाही.
असलं कंटाळवाणं आयुष्य घालवण्यापेक्षा, संन्यास घ्यावा न हिमालयात निघून जावं झालं.

शब्दशः भाषांतरच करायचे आहे का ?

त्या गाण्याचा मूड बघता,

आग लागो या दुनियेला.

अरे थुंकतो या दुनियेवर मी,

काय कामाचे हे जग ?

असे शब्द पण चालतील.

ये Happy पहीलं बक्षीस Lol
आधी मला वाटलं झकास(रावांना) आणि मला संयुक्त मिळालं की काय Proud
धन्स संयोजक Happy

आधी मला वाटलं झकास(रावांना) आणि मला संयुक्त मिळालं की काय >>>>>>>>>>>मला पण. मी परत वर (तिकडे वर नाही) जाऊन वाचल. Lol

आज्जी Happy

Pages