Submitted by gajanan59 on 27 February, 2013 - 01:00
सुखाच्या शोधात.....
चालताना वाटेत
लागतो विसावा
आयुष्याच्या संघर्षातही
लागतो ओलावा,
नात्यांच्या या गर्दीत
कोण आपला नि कोण परका
मुखवट्या मागील जेव्हा
कळतो खरा चेहरा,
स्वतःचा शोध घेताना
संपते आयुष्यही
जगायचेच राहून जाते
सुखाच्या शोधापरी
गजानन....
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रसिकहो हि माझी पहिलीच कविता
रसिकहो हि माझी पहिलीच कविता कशी जमली नाही सांगता येत पण तुमच्यासमोर सादर करताना निश्चित आनंद होत आहे.