नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूर्य - श्री दा पानवलकर
ह्यातल्या लघुकथेवरून अर्धसत्य सिनेमाची पटकथा तेंडुलकरांनी लिहिली. त्यात दिलीप चित्रेची 'चक्रव्युहमें घुसने से पेहले, कौन था मै और कैसा था' अशी एक कविता आहे. दिलेल्या चित्रात चक्रव्युह आहे Proud

घ्या लै ताणलं

इतक्या मोठ्या हेलबॉयला एक मोदक?? शोनाहो..
किमाण सिंडरेला म्हंताहेत तसे तूप तरी घाला वरून Happy

मज्जा येतेय गेम पहायला
(किब्बित्झिंग) इब्लिस

चमन म्हणतोय ते उत्तर दिसतय. चमन व पु काळे असे पुर्ण लिही!

पण चित्र भुलभुलैय्या इतकेच दाखवतेय. जर का "का रे भुललासी" दाखवायचे असेल तर आधी निदान एक प्रश्नचिन्ह वगैरे टाकायला हवे. संयोजक चित्रे आणखी पर्फेक्ट हवीत. (अर्थ अनेक निघाले तरी हरकत नाही पण खेळणार्‍याला योग्य निर्णयाला यायला काही ठोस आधार मिळाला पाहीजे)

.

असल्या भिन्न चित्रांचा संबंध लाऊन इतक्या लवकर ओळखणारे सर्वजण नक्कीच सी.आय.ए., मोसाद, रॉ वगैरेंचे छुपे एजंट असावेत अशी भावना वाढीस लागत आहे आणि देव 'बुद्धी' वाटत असताना फिरायला गेल्याचा पश्चातापही.

Pages