नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय योगायोग आहे च्यामारी Happy अकरा कोटी गॅलन पाणी पण ७८लाच प्रसिद्ध झालय. आणि इंदिरा गांधी सोडल्यास सगळे क्लु जुळत आहेत.. अकरा कोटी (बरीच माणसे), पाणी, पळणार्‍या माणसाचे चित्र (खाणीतली एक्झिट), एक काळाकुट्ट माणुस चालतोय (कोळसाखाणीतला कामगार) Proud

सामी.....

गॉश्श !!! जवरा शोध. मी स्वतःला केटचा चाहता समजतो, पण ह्या केटबाई "वहिनी" म्हणून समोर ठाकतील ही बाब स्वप्नातही आली नसती. अभिनंदन.

संयोजक यांच्या कल्पकतेलाही मनमुराद दाद दिलीच पाहिजे.... विशेषतः 'नी' बाबत.

अशोक पाटील

मला आज खूप खाऊ मिळाला.>>>>>>>>>>>>सामी जास्त खाऊ नये.:डोमा: इकडे पाठव. Proud

मला पण केट ला वहीनी म्ह्ट्ल्यासारखे वाटतेय Happy

सामी जास्त खाऊ नये >> अग शोभा सगळा वर्च्युअल खाऊ. काश या पु-या ख-या असत्या Happy

धन्यवाद अशोकजी, मामी.

Pages