नावात काय आहे?

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25

खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?

olakhu%20anande%20-%20new.jpg

पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक धन्यवाद.
श्रेय मामी आणि उदयन यांना.

हेलबॉय, रीवर्स इमेज सर्च इंजिन वापरुन तुम्ही बघितलेच असेल उत्तर मिळतय का ते ? Happy

धन्यवाद शोभा, उदयन

महान चालू आहे.... बक्षिसे तर अधिकच महान..
'ओष्ठकांडी' Happy
[सिगरेट ला 'बिडी' म्हटल्यावर त्यातलं ग्लॅमर निघून जाते तसे काहीसे वाटले..]

सामी अभिनंदन. Happy
(कुणालातरी कॅरमल कस्टर्डच्या बाजूची द्राक्षे आंबट लागलेली दिसतात. Proud Light 1 )

पुढचे कोडे द्या हो संयोजक लवकर

मघाचे चित्र आणि आताचे २ क्लू एकत्र करून हे उत्तर निघते.

इंदिरा गांधी आणीबाणी व भारतीय लोकशाही : पी. एन. धर. अनु: अशोक जैन
(:फिदी:)

पुस्तकही 'त्याच' काळाच्या आसपासचं आहे >> म्हणजे त्या काळात प्रकाशीत झालेलं का फक्त त्या काळातल्या विषयावरचं?

चिनूक्स ... Biggrin

डायरीया (क्ल्युमधल्या हिरव्या चित्रातला) --> डायरी का?

कल्पनाशक्तीचा पूरेपूर वापर! Happy

माणसं अरभाट आणि चिल्लर - जी ए कुलकर्णी
पहिला फोटो - माणसेच माणसे
दुसरा फोटो - इंदीरा गांधी अरभाट (बाई)माणूस
तिसरा फोटो - अधर दिशेला बाण चिल्लर माणसं

गर्दीतून वाट काढणारी सरकारी गाडी
क्ल्यु :
इंदिरा गांधी / आणिबाणी / काँग्रेस सरकार, निवडणुका
(खालच्या दिशेला दाखवलेला बाण) सरकार कोसळलं, सत्तेचा अस्त

हम्म ...

पुस्तक-जनांचा प्रवाह हो चालला
लेखक-विजय हर्डीकर.
संयो तुमच्या क्लू प्रमाणेच उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय...

Pages