चपखल!

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 06:18

इंग्रजी, मराठी, हिंदी अशा स्वतंत्र भाषांमधून आता आपण मिंग्रजी, हिंग्लिश वगैरे भाषांपर्यंत येऊन पोचलोय. भाषेची सर्रास मिसळ करताना मात्र एक जाणवतं, की एका भाषेतला तोच अचूक भाव दुसर्‍या भाषेत मात्र मांडता येत नाही. का, येईल? करायचा का प्रयत्न?

सादर करतोय एक गंमत खेळ 'चपखल'.

chapakhal_0.jpg

ह्यात दिल्या गेलेल्या इंग्रजी अथवा हिंदी वाक्यांचे दोन अनुवाद करायचे आहेत. एक शब्दश: आणि एक भावानुवाद. शब्दशः अर्थातच शब्दश: अनुवाद करायचा आहे. भावानुवादात, वाक्याच्या आशयानुसार शब्द बदलले तरी चालतील.

उदाहरणार्थः What's up? / Wassup?

शब्दशः काय आहे वर?

भावानुवाद: काय मग, कसं काय चाललंय?

या ऐवजी, एखादा अस्सल कोल्हापुरी असेल, तर म्हणेल, 'काय काय आनि?'

आलं लक्षात? मग करूया सुरू..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा... हा डायलॉक अती भयानक " ओम शांती ओम मधला आहे" ... तुम्ही तो पाहिला नसणारच.... आणि पाहु सुद्धा नका...

हा डायलॉक " साहब बिबी और गुलाम" मधला वाटतोय, रमेश च्या जागी भूतनाथ हवा !>>>>>>>>>>>>>>>>>>>>> नाही हा डायलॉग ओम शांती ओम मधील आहे

आई ग!

सध्या कुठलाही सिनेमा ( अगदी "देऊळ" सुद्धा ) त्याच्या सबटायटल सकट बघावा. अक्षरशः तारे तोडलेले असतात.

तुम्ही सगळे असे का हसताय? हा डायलॉग देवदास सिनेमात आहे असं विचारलं तर त्यात इतकं हसण्यासारखं काय आहे? काहीतरी मजेदार सिच्युएशन आहे का? मलाही सांगा प्लीज. Happy मी दोन्ही सिनेमे पाहिलेत आणि दोन्हीही व्यवस्थित विसरलेय.

हायला, हे सॉलीड वाक्य होते. एक चिमटी सिंदूर... ते सगळ्या चुटक्या द्यायच्या ना... भरपूर ड्रामा आहे त्यात.

इश्वर का आशिर्वाद होता है एक चुटकी सिंदूर...

बरं ते वाक्य मूळच ओम शांती ओम मधले नाहीये...

ओम शांती ओम मध्ये बर्‍यापैकी त्याचा उपहासाने वापर केलाय. मला वाटते ते आधीच्या कुठल्या जुन्या हिंदी चित्रपटातले आहे.. मी नाव विसरले.
बहुधा देवदास्..(जुना)

ओम शांती ओम मध्ये बर्‍यापैकी त्याचा उपहासाने वापर केलाय. मला वाटते ते आधीच्या कुठल्या जुन्या हिंदी चित्रपटातले आहे.. मी नाव विसरले.
बहुधा देवदास्..(जुना)
>>>>> मी म्हटलं नव्हतं??? ती रीया उगीचच दात काढून राहिली. Proud

भगवान के लिये मुझे छोड दो!"
_देवासाठी मला सोडून दे
_देवाच्यान पिच्छा सोड माझा आता

>> " भगवान के लिये मुझे छोड दो!"

शब्दशः - देवाच्याकरता मला सोडून द्या ..

भावानुवाद - कृपा करा आणि मला सोडा

देवाच्याकरिता मला सोडून दे.

देव बघतोय ह्याची जाण ठेवून तरी मला सोड / मला सोडून देण्याचं काय घेशील रे ?

देवाकरता मला सोड (भाषांतर असलं तरी मराठीत काहीतरी विचित्रच वाटतं :फिदी:)
मेल्या, मुडद्या, हलकटा, सोड मला!

Pages