चटण्या

Submitted by गोपिका on 25 February, 2013 - 13:33

ह्या पाकशास्त्रा चा ग्रुप मध्ये चटणि बद्दल थ्रेड असलेले मला दिसले नाहि, म्हणुन वाटलं हा थ्रेड सुरु करावा(अणि असेल तर मला लिंक नक्कि पाठवा).चटणि हि अशि गोष्ट आहे जि कुणाला आवडत नाहि असे होणार नाहि.अणि हि असेल तर एखाद दिवशि भाजि किव्वा आमटि नसेल तरि जेवण छानच होते.हा धाग जर चालु झाला अणि राहिला तर कित्ति प्रकारचा च्टण्या आपल्याला शिकयला मिळतिल!!!!
आपल्याला महित आसलेल्या चटण्या इथे शेर करुयात

काल मि कैरी चि चटणि बनवलि होति ति अशि

वेळ : साधारण २० मिन

१ कैरी
गूळ - ३/४ वाटि(किसलेला किवा फोडुन बारिक केलेला)
तिखट पूड - २ चमचे (तिखट जास्त असेल तर ३/४ चमचा)
मीठ - चविनुसार
भाजलेल्या दाण्याचा कूट(आगदि बारिक नको) - १/२ वाटि

फोडणि साठि - २ चमचे तेल, १/२ चमचा - मेथि, हिंग अणि हळद - एक चिमुट प्रत्येकि

कैरी चि साल कढुन ति किसुन घ्यावि.त्यात गूळ्,तिखट पूड्,मीठ्,दाण्याचा कूट घालुन व्यवसथित मिसळावे.
तेल चांगले गरम करुन हिन्ग्,हळद व मेथि चि फोडणि करुन ति चटणि वर घालवि अणि चटणि पुन्हा चांगलि मिसळुन घ्यावि.मेथि कच्चि न राहता कुरकुरित होइल ह्याचि काळजि घ्या.चटणि खायला तयार.

टिप : ज्याला जि चव जास्त आवडते त्यासाहित्या प्रमाणे साहित्यात बदल करता येतो.मला जास्त दाण्याचा कूट आवडतो म्हणुन मे जरा जास्त घातला आहे.

kairi.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users