माझी गर्लफ्रेंड बरोबरची पहिली डेटिंग .....

Submitted by अव्या खलिफा on 15 February, 2013 - 05:09

आता कोकणात काजू चा हंगाम सुरु होईल.ठीक ठिकाणी काजूची झाडं मोहरून गेली असतील.
वर्ष भर काजूचं ते शुष्क आणि थकलेलं झाड मोहोर आल्यावर खूप श्रीमंत वाटतं, विलक्षण सुंदर वाटतं.
तसं त्याचं अप्रूप वाटणं स्वाभाविक नाही इतरांसाठी.कारण ते नुसतं काजूचं झाड नसतं तर ते पैशाचं झाड असतं....! मी बरीच अशी मुलं पहिलीत जी रणरणत्या उन्हात राना वनातून जांभी (काजू) गोळा करतात
( गोळा कसले करतात ...चोरतात म्हणा ना ) आणि त्या विकून आलेल्या पैशातून आपलं शाळेचा पूर्ण खर्च भरून काढतात, वह्या पुस्तकं घेतात .
मीही त्यातलाच एक गरजवंत चोर ......पण माझी हि गरज शाळेचा खर्च भरून काढण्याची नव्हती ...तर गर्लफ्रेंड ला पहिल्यांदा डेट वर नेण्यासाठी पैसे पाहिजे होते .....
सांगायला जरा सुद्धा लाज वाटत नाही ...असो पुढे वाचा....!

एक छानशी सुंदरखासीन सुबक ठेंगणी आवडली होती. एकाच कॉलेज ला असल्याने नजरा-नजर व्हायची बर्याचदा.पुढे वार्षिक स्नेहसंमेलना मध्ये जास्त ओळख झाली, वाढली.तशी डेटिंग वगैरे हि संकल्पना मला ती करताना सुद्धा माहित नव्हती. पण तत्सम इवेन्ट्स करताना पैशाची गरज भासते ह्याची कल्पना होतीच.

तर कॉलेज मधून घरी आलो कि रपारप जेवायचो आणि पिशवी घेवून माळावर जायचो .....३-४ तास उन्हातानातून भटकल्यावर जेम तेम किलो भर जांभी (काजू) हातात यायच्या.मग घरी यायचो.पण ह्यात अर्धा वाटा माझ्या लाडक्या लहान बंधुराजांचा सुद्धा असायचा !!
असो पैसे नव्हते अशातला सुद्धा भाग नव्हता पण घरातून पैसे मागायला काही सबळ कारण लागतं आणि तसं माझ्या कडे तत्कालीन स्थितीस दूर दूर वर तरी काहीच कारण दिसत नव्हतं Wink .
मग असे करून मी जवळ जवळ १९ किलो काजू जमवले.त्यावेळी मार्केट मध्ये ६५ रुपये भाव चालू होता ...मग ६५ गुणिले १९ बरोबर १२३५ रुपये रोख जमा झाले.आणि एक झक्कास रविवार निवडला.तिला कळवलं.नाही होय नाही होय करता ती तयार झाली आणि भेटलो .....काम ९० % फत्ते झालं होतं ..तो सहवास भलताच सुखावून गेला होता.आणि केलेल्या कष्टाचं चीज झालं वगैरे काय म्हणतात तस वाटलं...!

( सविनय खुलासा- इथे माझी टवाळकी- भावकी आणि मला ओळखणारे काही जेमतेम चार जण आवर्जून उपस्थिती दर्शवतील आणि ह्या गोष्टीचा मोठ्या उत्साहाने पंचनामा करतील हे ठावूक असल्याने मी स्थळ, काळ आणि कसं काय जमलं ते जरा गुपितच ठेवलंय Wink )

असो तर सांगण्याचा मुद्धा असा कि कोकणात काजूचोरी मधून मस्त पैकी अर्थ सहाय्य मिळतं.आणि हे चौर्यकर्म मोठ्या मनाने माफ देखील केलं जातं.खरं तर मला काजू चोरण्याची गरजच नव्हती.आमची चिक्कार झाडं आहेत...पण ती आमच्या घरापासून खूप लांब आणि दुर्गम भागात आहेत.आणि तिथं एकट्यानं जाण्याचा धीर मला होत नव्हता.
सो मी हा जवळचाच पर्याय निवडला......आणि माझी डेटिंग यशस्वी झाली Blush Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवी.. मस्त लिहिलं आहेस.. डेटिंग यशस्वी झाली हे महत्वाचं Happy पहिलीच अन अश्या कष्टाच्या पैशाने Wink

मस्त

<<असो तर सांगण्याचा मुद्धा असा कि कोकणात काजूचोरी मधून मस्त पैकी अर्थ सहाय्य मिळतं.आणि हे चौर्यकर्म मोठ्या मनाने माफ देखील केलं जातं. >> बरोबर अव्या जी .मीही कोकणातलाच ! पण आंबे काजू यांच्याबाबतीत आपले हे जे धोरण आहे ते देशावरच्या माणसांना पचनी पडत नाही बहुधा.

याचे कारण माझ्या एका मित्राला शेजारच्या बागेतले पडलेले आंबे खालल्याबद्दल त्याच्या देशावरच्या अतिशहाण्या आध्यात्मिक गुरुने प्रायश्चित्त घ्यायला लावले होते..............................
आता बोला !

mansmi18 जी , कोणतीही चोरी ही वाईटच! पण कोकणात या मुद्दयाकडे जरा निराळ्या स्वरुपात पाहिले जाते. पण हल्ली अनेक परप्रांतीय मंडळी कोकणात जमीन विकत घेवून आंबा लागवड करत असल्याने त्यातही व्यावसायिक दृष्टीकोण आलेला आहे,त्यामुळे बाग राखायला आणि चोरांना रोखायला नेपाळी गुरखे ठेवणे वगैरे प्रकार होवू लागले आहेत हल्ली.

अव्याने लिहिले त्यात काहीही आक्षेपार्ह वाटत नाही.
हलके घ्यावे.
छान आहे किस्सा.
तसे पाहू गेले तर लोकांच्या झाडावरच्या कैर्यानवर दगड मारून पाडून मी खाल्ल्याबद्दल मी लिहिले तर चुकीचा संदेश जातो का?
श्रीकृष्णाने देखील असलेच प्रकार केलेत ना?
Happy

धन्यवाद सर्वांना. Happy

मुळात एक गोष्ट दुर्दैवाची सांगावीशी वाटते. कि आमच्या मालकीची बेसुमार काजूची झाडं आहेत.
पण ती अतिशय दुर्गम भागात आणि गावाच्या एका टोकाला आहेत. तिथे व्यवस्थित राखण करता आली तर तिथून कमीत कमी १० लाखाचं उत्पादन सहज मिळू शकतं. पण ते शक्य नाही कारण आम्ही कितीतरी वेळा तिथे नेपाळी गुरखे ठेवून पाहिले,
दोन चार दिवसाच्या वर ते तिथे राहतच नाहीत. न सांगताच पळून जातात. आणि माझ्या घरी तसं कुणी समर्थ नाही कि हा एवढा सगळा उपद्व्याप सांभाळता येयील.
अर्ध गाव चोरून नेतं आमच्या काजू, कुणाला कुणाला पकडणार, सो म्हणून हतबलतेने म्हणा किंवा मोठ्या मनाने म्हणा हे चौर्यकर्म मोठ्या मनाने माफ केलं जातं.

हो ना आंम्हालाहि या गोष्टीचं काही वाटत नाहि.. गावी हे सर्रास चालतं.. आमच्या मामाचीहि कुडाळला मोठी काजुची बाग आहे.. मामा इकडे मुंबईला तिकडे घरी कुणीच नाही सगळी बाग कोणच्या कोणच नेत असतं मामा कधी काडुन विकतहि नाहि. मालवणातहि खुपशी मुलं आपला छोटा छोटा खर्च असा परस्पर भागवतात. Happy

अवी, छान लिहिलंय! मला सुद्धा माझ बालपण आठवलं ! ह्या दिवसांत आमची खूप धमाल असायची.
कोकणातली बरीचशी घरं रिकामीच असायची. आणि माझे वडिल शाळामास्तर ! त्यामुळे बदलीच्या गावी गेल्यावर त्या गावातली लोकं स्वतः यायची आणि आम्ही त्यांच्या घरी रहावे म्हणून गळ घालायचे. मग ते घर आणि आंबे, फणस, काजू, चारोळ्याची झाडं, नारळ ह्या सर्वांचे मालक आम्ही तेथून बदली होईपर्यंत Wink

छान लिहिलंय. अव्या, कुठल्या गावचे तुम्ही? पहिल्या डेटला हजार रूपये खर्च म्हणजे भारीच की Happy

मे महिन्याच्या सुट्टीमधे घालवलेल्या त्या दुपारी आठवल्या. आंबे काजू, कोकमं, करवंदं गोळा करत दिवसभर भटकायचो आम्ही. आता दारात फणस, आंबे काजू आहेत पण मे महिन्याची सुट्टी नाही. Sad

आवडल...काय भारी वाटल असेन न तुम्हांला स्वकष्ट,स्वखर्च पहिली डेट... Happy नाहीतर आजकाल सगळे ५०-५० करतात

माझं गाव रावाचे गोठणे .राजापूर, रत्नागिरी.

एक समुद्र सोडला तर सगळं कोकण इथेच दिसतं ,अनुभवता येतं.
एकीकडे विस्तीर्ण माळरान संपूर्ण हिरवेगार,
तर दुसरीकडे घनदाट जंगल सदाबहार ,
तांबडी माती ,नारळी-पोफळी, आंबा फणस काजी छोट्या छोट्या विहिरी ,टुमदार
कौलारू लाल चीर्याची घरं आणि साधी-भोळी प्रेमळ माणसं .
आणि वाईट वाटतं कि मी ह्या सर्वात कुठेच नाही.........

धन्यवाद नंदिनी, अंकू Happy

अव्या, छान किस्सा.
पुर्वी बियांना फार भाव नाही मिळायचा. कारण त्यातून गर काढायला भरपूर खटपट असे. आता नव्या तंत्राने ते सोपे झालेय. म्हणून भावही चांगला मिळतो.

गोव्यात वेगळा प्रकार असतो. एक टिम आधी निव्वळ फळे गोळा करते. अर्थातच फेणी करण्यासाठी. त्यावेळी बिया तिथेच झाडाखाली टाकतात. मग दुसरी टीम बिया गोळा करते. महाराष्ट्रातून पेडण्याला असे ट्रक भरुन जाम येत असतात, सिझनमधे.

आम्ही पण मूळचे राजापूरचेच. अजून नातेवाईक आहेत तिथे, पण माझे जाणे झाले नाही.

फेणी .... Blush Lol
टिम वाईज काजू गोळा करण्याची पद्धत आवडली, आमच्या कडे फेणीतीर्थ नावाला सुद्धा मिळत नाही हो.
तेवढ्यासाठी गोव्यात जाणारे शौकीन पाहिलेत मी बरेच, बाकी गोवा म्हणजे माझा सुद्धा विक्प्वाइन्ट.
मला पहिल्यापसून गोवन राहणीमान, भाषा आणि तिथल्या माणसांबद्दल आकर्षण,उत्सुकता आहे. पण कधी जास्त संबंध नाही आला. असो आता मज्जा येईल Happy

धन्यवाद दिनेशदा, अनुजा राणे जी Happy

Happy
चोरी करणं चूक. पण तुम्ही किस्सा भारी गोड आणि सोज्वळपणे लिहिलाय, ते आवडलं.
आपण लहानपणापासून जिथे राहिलो, वाढलो, तेथून दूर जातांना खूप उजाड आणि पोरकं वाटतं. कुठेही गेले तरी 'ती' ओढ कायम राहतेच. एकदा मनासारखी बासुंदी ओरपल्यावर किती पंचपक्वान्न खाल्ली तरी 'ती' सर येत नाही.
तुमच्या या किश्श्यानं ढवळून निघालय सगळं..

छान लिहिलंय. आमची पण काजूची बाग आहे. पण त्यात राखण करणारा गडी असला तरी दुसर्‍या बाजूने आत घुसून चोरी होतेच! त्यात काही विशेष नाही!

मी तर स्त्री पुरूष समानतेवर थोडे बोलबच्चन देतो..
थोडा ड्रामा करतो.

डेटिन्ग फुकटात आणि स्वस्तात होउन जाते...

चिन्नु जी .....आपण लहानपणापासून जिथे राहिलो, वाढलो, तेथून दूर जातांना खूप उजाड आणि पोरकं वाटतं. कुठेही गेले तरी 'ती' ओढ कायम राहतेच. एकदा मनासारखी बासुंदी ओरपल्यावर किती पंचपक्वान्न खाल्ली तरी 'ती' सर येत नाही.>>> खरंय ......पण काळापुढे हतबल आहे. पण त्या आठवणीना उजाळा देण्यासाठी मी वर्षातून दोन-तीनदा गावी जातोच....आणि पूर्ण वर्षभराची माझी ब्याटरी चार्ज करून येतो. Happy

मी तर स्त्री पुरूष समानतेवर थोडे बोलबच्चन देतो..
थोडा ड्रामा करतो.>>>> Lol हे हे हे हे हे हे हा हा हा हा भन्नाट Rofl ........पण हि ट्रिक परत कधी करता येणार नाही ह्याची समाधानवजा खंत Proud

ज्योती जी एकटा राखणी कुठे कुठे लक्ष देणार, भौगोलिक दृष्ट्या आपल्या कडची शेतं किंवा फळबागा आडभागात किंवा उंचसखल अशी असतात.त्यामुळे चोरांचं फावतं.

मी १९९२-९३ च्या वेळेस श्रीवर्धन जवळील 'खामगाव' येथे राहीलो आहे. तिथे देखिल आंबा आणि काजुंच्या बागा आहेत. त्यावेळेस माझा लहान भाऊ ईतरांच्या झाडावरचे आंबे पाडून आणायचा, आणि लोक माझ्या नावाने बोंम्ब मारत यायचे. कारण नंतर समजले की हा गोंधळ दोघांच्या सारख्या दिसणाय्रा चेहरेपट्टीमुळे होता
male30-male-sad-lonely-smiley-emoticon-000072-large.gif

हे हे हे हे हे हा हा हा हा हा हा हा हा Rofl ......लोक माझ्या नावाने बोंम्ब मारत यायचे. >>>
एक दिवस माझ्या नावाने सुद्धा बोंब झाली होती. बागमालकाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण बर्यापैकी नेपाळी गुर्ख्यासारखा दिसत असल्याने 'तुम्ही कुठल्यातरी गुरख्याला बघितल असेल' हे सांगून वेळ मारून नेली होती.

>>>> Lol हे हे हे हे हे हे हा हा हा हा भन्नाट Rofl ........पण हि ट्रिक परत कधी करता येणार नाही ह्याची समाधानवजा खंत Proud<<<

अभिनंदन...