बिनसले आहेच थोडेफार हल्ली....

Submitted by मुग्धमानसी on 23 February, 2013 - 03:22

बिनसले आहेच थोडेफार हल्ली
कोरड्या श्वासांस असते धार हल्ली!

ठाव नसतो या मुळी चित्तास माझ्या
अन् विचारांना नसे आधार हल्ली!

बोचर्‍या असतात या नजरा जरा पण
सोसवत नाहीत त्यांचे वार हल्ली!

त्या तिथे मेघांत नसतो अंशसुद्धा
दाटते आभाळ डोळ्यांपार हल्ली!

भक्तिचा श्रुंगार लेउन झाक भीती
मंदिरे ही जाहली बाजार हल्ली!

तू जशी आहे तशी तुज पेलणारी
माणसे नसती अशी दिलदार हल्ली!

जे पुढे गेले तयांनी आखलेल्या
पायवाटा जाहल्या बेकार हल्ली!

दगड-मातीतून असतो 'राम' माझा
माणसातुन घेइना अवतार हल्ली!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त!!! मस्त Happy
<<<त्या तिथे मेघांत नसतो अंश सुद्धा
दाटते आभाळ डोळ्यांपार हल्ली!>>> व्वाह! बाकीचेही शेर छान Happy

काही ठिकाणी र्‍हस्व दीर्घ बदलले आहे. >>>> नक्की कुठे कुठे ते सांगाल का? सुधारणा करता येईल.

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद!

त्या तिथे मेघांत नसतो अंश सुद्धा<<< अंशसुद्धा हे जोडून लिहावे.

भक्तिचा श्रुंगार लेऊन झाक भीती<<< लेन करावे लागेल

तू जशी आहे तशी तुज पेलणारी<<< येथे अव्यक्त स आहे का?

माणसातून घेईना अवतार हल्ली!<<< माणसातुन घेना करावे लागेल

शुभेच्छा!

"दगड-मातीतून असतो 'राम' माझा
माणसातुन घेइना अवतार हल्ली!" >>> छान खयाल आहे.

'दिलदार' 'बेकार' यातील खयालही चांगले आहेत.
परंतु, वृत्तात बसवताना काहीशी ओढाताण झाली असावी या शंकेस वाव आहे. वैम. कृगैन.