माझेच पंख मजला... (संकेत तरही)

Submitted by प्राजु on 24 February, 2013 - 01:17

ना शल्य आज याचे, आभाळ ना बरसले
माझेच पंख मजला, पसरावया न जमले

झाली सवय कधीची, पायांत जोखडांची
स्वातंत्र्य त्या बिचार्‍या, हत्तीस ना उमगले

पाहून राजहंसा, क्षण मात्र लोभ झाला
पण मन पुन्हा बकाचे, लावून ध्यान बसले

मी मोडता रुढींना, कर्मठ कितीक उठले
केला विरोध आधी, आता हळूच नमले

जेव्हा बघाय गेले उबदार गाव माझा
वाडे जुने न दिसले, दिसले मुजोर इमले

मैत्रीत विस्मृतींच्या मन आज हे स्मृतींनो!
सोडून साथ तुमची आहे अखेर रमले

ना धान्य ना मसाले, तो भूतकाळ सारा
जात्यामध्ये स्मृतींनी अश्रू अता भरडले

-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी केलेली रचना पाहून ; संकेत तरही ही संकल्पना मला व्यवस्थीत समजली आहे की नाही अशा संभ्रमात मी असल्याने मी विस्तृत प्रतिसाद देणे बरोबर नाही असे मानून टाळतो आहे

क्षमस्व

मी केलेली रचना पाहून ; संकेत तरही ही संकल्पना मला व्यवस्थीत समजली आहे की नाही अशा विभ्रमात मी असल्याने मी विस्तृत प्रतिसाद देणे बरोबर नाही असे मानून टाळतो आहे

क्षमस्व<<<

१. तुम्ही विभ्रमात नसून संभ्रमात असाल असे मला वाटते.

२. हा प्रतिसाद सर्वत्र देण्याचे काही कारण नसावे. गझल रचना - तरही गझल या धाग्याखाली हा प्रतिसाद दिल्यास तेथे व्यवस्थित चर्चा होईल.

प्राजू, गझलेबाबत काही वेळाने लिहीन.

धन्यवाद

बेफिंशी सहमत.

वैभव, उत्साहीपणामुळे काही वेळा न्युसन्स निर्माण होऊ शकतो त्याची काळजी घ्यायला हवी मित्रा.

न्युसन्स म्हणजे काय ....

माझ्या संकेत तरहीत काहीच चूक झाली नसावी असे अजून मलतरी वाटते
तरीही मल इतकेच जाणून घ्यायचे आहे की ती तरही संकेत तरही ठरू शकते की नाही आहे की नाही
मी प्रश्नही विचारला त्याचे उत्तर कोणी दिले नाही अजून तोवर मी काय करायला हवे हे मला समजत् नाही आहे

हा उस्ताहीपणा नकीच नाही

माझा एक शेर आहे

ऐक ना आता स्वतःला विठ्ठला ;
लवना माझा लळा तू लावना

यात लाचारी हा भाव आला असावा असे अप्रत्यक्ष मत एका मित्राकडून अप्रत्यक्षरित्या काही दिवसापूर्वी समजले पण मला ही लाचारी वाटत नाही आहे अजून तसेच त्या उस्ताहीपणाबद्दल असावे काहीसे

वैभव..
मला वाटतं तुमच्या शंका तुम्ही तरहीच्या धाग्याखाली लिहाव्यात.. इथे कृपया लिहू नका. गझलेबद्दल काही लिहावे वाटले तर लिहा..अन्यथा इग्नोर इट!

वैभव..
मला वाटतं तुमच्या शंका तुम्ही तरहीच्या धाग्याखाली लिहाव्यात.. इथे कृपया लिहू नका. गझलेबद्दल काही लिहावे वाटले तर लिहा..अन्यथा इग्नोर इट!>>>>>>>

मी इथेच लिहिणार !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मी कुठेही लिहीन !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

न्युसन्स म्हणजे काय ....

खेंकटें (p. 212) [ khēṅkaṭēṃ ] n (Low.) A speculation, project, scheme; an expedient; a shift; any petty and perplexing job or business entered into for subsistence. Applied, also, to an embarrassment or a difficulty; a let, bar, hinderance, or a scrape, hobble, pickle; or to an encumbrance, clog, pest, bore, nuisance (as of a family or an establishment); to a trouble- some matter or person gen. 2 A lying imputation or charge. 3 Confusion, intricacy, deranged and perplexed state (of an affair or a business). v कर, हो, उलगड, निस्तार &c. Ex. त्वां माझ्या का- माचें खें0 केलें परंतु ह्यानें माझ्या कामाचें खें0 उलगडलें or निस्तारलें. 4 Applied vulgarly to any epidemic disease; as खोकल्याचें खें0, पडशाचें खें0, तापाचें खें0, in the sense of a troublesome visitation, a plague, pest, bore.

प्राजक्ता, अवांतर प्रतिसादांबद्दल क्षमस्व!

ना शल्य आज याचे, आभाळ ना बरसले
माझेच पंख मजला, पसरावया न जमले

छान मतला, दुसरी ओळ विशेष आवडली.

खेंकटें (p. 212) [ khēṅkaṭēṃ ] n (Low.) ................................>>>>
अजोनही समजले नाही क्षमस्व
मला कुठे इतके इन्ग्लिश समजायला :).......फोनच करीन म्हणतो सायंकाळी
_______________________________________
प्राजू .....सॉरीssssss..................................

"पाहून राजहंसा, क्षण मात्र लोभ झाला
पण मन पुन्हा बकाचे, लावून ध्यान बसले

जेव्हा बघाय गेले उबदार गाव माझा
वाडे जुने न दिसले, दिसले मुजोर इमले" >>> हे शेर सर्वात आवडले.

मैत्रीत विस्मृतींच्या मन आज हे स्मृतींनो!
सोडून साथ तुमची आहे अखेर रमले

<<<

शेर मस्त

गझल एकंदरीत छान आहे. पण संकेत तरही ही संकल्पना (माझी स्वतःची गझल वाचूनही) थोडी अधिक स्पष्टपणे लिहायला हवी होती असे वाटत आहे.

बेफीजी..
मला संकेत तरही संकल्पना समजली आहे.
पण तुम्हाला ही संकेत तरही का योग्य वाटली नाही ते समजले नाही.

१. मतला बहुधा जमला असावा

२. मंदिराचा तुम्ही उल्लेख केला होता. मी अर्थ असा घेतला की, माणूस सवयीचा गुलाम असतो. त्यामुळे मंदीर तिथे नसलं तरी तो नमस्कार करतो. तसेच हत्तीचे होते. जोखडातच राहिल्यामुळे, जोखड काढले तरी हत्तीला आपण स्वतंत्र आहोत हे समजत नाही..आणि तो त्याच जागी राहतो.. (मी हे ऐकले आहे.. की हत्तीला काही दिवस साखळदंडांमध्ये ठ्वेअले की.. त्या जागी उभे केल्यावरही त्याला आपल्या पायात साखळ्या असल्यासारखेच वाटते)

३ तुम्ही जी गरीब मुल आणि श्रीमंत मूल अशी प्रतिके दिली होती.. त्यात मी राजहंस आणि बगळा अशी प्रतिके घेतले आहेत.

४. तुम्ही निर्भयाचे उदाहरण दिले होते.. तसे मी माझ्या रिवाज मोडण्याने उठलेले वादळ.. असा अर्थ लावून लिहिला आहे शेर.

५. तुम्ही आईचे उदाहरण दिले. ती जेव्हा घरट्यात गेली तेव्हा पिले उडून गेली होती. मी माझ्या गावाबद्दल लिहिले आहे. मी माझा गाव, वाडे पहायला गेले तेव्हा ते पाडून तिथे इमले बांधले गेले होते..

यामध्ये नक्की कोण्ते प्रतिक चुकले?
संकेत तरही मध्ये वेगवेगळी प्रतिके वापरली जावेत असे लिहिले होते. म्हणून इतकी सविस्तर चर्चा.

धन्यवाद.

आमची निरिक्षणे..........
१) संकेत तरहीचे सर्व संकेत धाब्यावर बसवणारी रचना वाटली!
२) आभाळ बरसणे व पंख पसरणे........दुरावलेली सोयरीक वाटली
३) अभिव्यक्ती अजून थेट हवी होती!
४) उदाहरणार्थ: पंखांची पाखर असते, जी पिलांवर पक्षी धरतात वगैरे...........

५) जोखड म्हणजे जूं जे मानेवर असते!
लाक्षणिक अर्थ.....जबाबदारी
६) पायात जोडव्या असतात, बेड्या असतात, साखळदंड असतात ऐकले होते!
पण पायात जोखड? अगदीच कर्णकटू वाटले!

७) बकाचे मन???????
८) बघाय.....हे आता काय? नवीन क्रियापद नाही ना जन्मले?

९) इमले मुजोर का वाटले?.......अव्यक्त असावे बहुधा!

१०) अश्रू भरडले????????
फारच दांभिक, अशास्त्रीय, अप्रत्ययकारी व कांगावी कल्पना वाटली!
अश्रू हा द्रव पदार्थ आहे!
द्रवास कधी भरडता येते का?
फक्त घनपदार्थच भरडता येतात असे विज्ञान मानते.....द्रव वा वायू भरडता येत नाहीत!
कारण भरडणे म्हणजे differential crushing
अश्रू भरडले ही शास्त्रीय दृष्ट्या पूर्ण चुकीची कल्पना आहे व अकाव्यात्मकही आहे!

टीप: बाकी भूषणरावांच्या संकेत तरहीने गझलकारांना त्यांच्या पात्रतेनुसार वस्तुनिष्ठपणे अनुक्रमाने बसविले आहे हे निश्चितच!
अनुक्रम कोणता हे स्वत: भूषणरावच सांगतील!
मग कुणी हे सत्य मानो वा न मानो!
निकाल लागलेला आहे!
कल्पनाविलास/कल्पनादारिद्र्य/सौंदर्य/काव्यबोध सगळे काही अनावृत झाले!

.................प्रा.सतीश देवपूरकर

(शांत, तटस्थ मुद्रा).

प्राजु मघाशी मी इथेच लिहिणार म्हणालो तो चुकून तुझ्यावर राग काढला गेला क्षमस्व

प्राजु तरहीच्या धाग्यावर माझा प्रतिसाद वाच वाटल्यास तुझाही हा प्रतिसाद तिथे दे चर्चाही करू या

(अरे बापरे ..आता हा प्रतिसाद देवसरही वाचतील मग तेही तिकडे येतील.......आ बैल मुझे मार असेच झाले हे ...असो :))

अरे बापरे ..आता हा प्रतिसाद देवसरही वाचतील मग तेही तिकडे येतील.......आ बैल मुझे मार असेच झाले हे ...असो स्मित)

वैभ्या, इतका धसका घेतलास आणि असे लिहितोस काय?
देवसर वाचतील आणि मग इकडे येतील<<<<<<<<<<<,,,

कधीचेच वाचले व ,आलोही!

प्रा साहेब नमस्कार तुम्ही एक संकेत तरही करा की <<<<<<<
वैभू बाळा, काय विचारतोस? चष्मा वगैरे नाही ना लागला?
नीट बघ संकेत तरही सकाळीच इथे पोस्ट केली आहे!

अश्रू भरडले????????
फारच दांभिक, अशास्त्रीय, अप्रत्ययकारी व कांगावी कल्पना वाटली!<<< Rofl

प्राजू,

मी आज रात्री प्रतिसाद देऊ शकेन Happy

मग इकडे येतील<<<<<<<<<<<,,,

ओ सर मी खोटेनाटे खपवून घेणार नाही ......मी "तिकडे" ............म्हणालो होतो उगीच माझ्या म्हणण्याचा विपर्यास करू नका
(.............माबोकरानो आता येतील बघा देवसर बरोबर तरहीच्या धाग्यावर ..मघाचा " ग्रीन सिग्नल" वाया गेला ......जाऊद्या)

अश्रू भरडले????????
फारच दांभिक, अशास्त्रीय, अप्रत्ययकारी व कांगावी कल्पना वाटली!<<< हे आकाशातल्या बापा, त्यांना क्षमा कर!
मुलांनो, आता आपण खालील घनचक्कर गोष्टी कशा दांभिक, अशास्त्रीय, अप्रत्ययकारी व कांगावी कल्पना आहेत हे शिकणार आहोत.

विषारलेले अतीत माझे धुऊ कितीदा ?
मनास वर्षानुवर्ष खंगाळतो कधीचा!>>>>
मन ही घनरूप, द्रवरूप अथवा वायुरूप गोष्ट आहे किंवा नाही हे मुलांनो सिद्ध करता आलेले नाही. तरी त्याला खंगाळणे कसे शक्य आहे बरे? हॅ हॅ हॅ

उगाच नाही झळाळणारी गझल लिही तो
व्रतस्त राहून तोच तेजाळतो कधीचा!
गझल ही द्रवरूप, घनरूप किंवा वायुरूप किंवा तेजोमय गोष्ट आहे असे अजून कुणाला 'दिसलेले' नाही. ती कशी काय झळाळणार बरे? हॅ हॅ हॅ

कशास मी पौर्णिमेकडे याचना करावी?
पिऊन मी चांदणे तुझे झिंगतो कधीचा!>>>>
आता चांदणे ही पिण्याची गोष्ट आहे हे देखील शास्त्रीय प्रयोगावरून सिद्ध करता आलेले नाही. त्यामुळे चांदणे कसे पिणार मुलांनो? हॅ हॅ हॅ (येथे चांदण्याऐवजी काय 'प्यावे' हे कदाचित बेफिकीरराव जास्त चांगले सांगू शकतील)

तुझ्या स्मृतींच्या सरोवरी डुंबतो कधीचा!
मनोगतांचे महाल मी बांधतो कधीचा!!>>>>
स्मृती (इराणी नव्हे) ही रवरूप, घनरूप किंवा वायुरूप गोष्ट आहे हे देखील अजून सिद्ध करता आलेले नाही. त्यात स्विमिंग कॉस्चुम घालून कसे बरे डुंबणार मुलांनो? हॅ हे हॅ

मला तसे खळखळून होते हसायचे पण........
तडेच मी काळजातले सांधतो कधीचा!>>>>>
काळजातले तडे हे खड्ड्यांसारखे किंवा हड्डीसारखे कसे सांधतात हे शास्त्रीय प्रयोगावरून वगैरे सिद्ध करता आलेले नाही. कसे सांधणार बरे? हॅ हॅ हॅ
थोडक्यात फारच दांभिक, अशास्त्रीय, अप्रत्ययकारी व कांगावी कल्पना वाटल्या!

उमेश..
अरे चक्क चक्क तू प्राध्यापक महाशयांना शिकवतो आहेस? इन्फॅक्ट ही नीड्स इट. आता तूच शिकव बाबा त्याला बघू काही शिकतो का? की पालथ्या घड्यावर पाणी??

बेफीजी, मी आपल्या प्रतिसादाची वाट पाहतेय.

@देवपूरकर..
दोन चांगली माणसे बोलत असताना आपण त्यात बोलू नये हे साधे शिकवलेले नाही बहुतेक तुम्हाला. शिकून घ्या बरं लवकर!!

उमेश कोठीकर,
आपल्या प्रतिसादाबाबतीतली आमची निरिक्षणे......
(मुद्देनिहाय)

१) मन ही एक abstract म्हणजेच सूक्ष्म गोष्ट आहे! म्हणून त्याला खंगाळणे म्हणणे म्हणजे एखादे भांडे जसे आपण धुवून घेतो वा कपडे जसे खळबळून घेतो अशी भावना मनाच्या बाबतीत व्यक्त केल्याने मन खंगाळणे ही कल्पना सहृदयी माणसाला हृदयंगम वाटते! इथे सूक्ष्म गोष्टीवर स्थूलाचा आरोप केला आहे ज्यातून काव्य निर्माण होते!
टीप: अश्रू ही स्थूल गोष्ट आहे सूक्ष्म नव्हे, म्हणून अश्रू या स्थूल शब्दाला भरडणे शब्द(स्थूल प्रक्रिया) हा विजोड, अशास्त्रीय व कर्णकटू वाटतो!
२) झळाळी म्हणजे lustre, चमक, चकाकी, जी कुठल्याही स्थूल वस्तूला, व्यक्तीला, वा कलाकृतीलाही लागू होते, हे सहृदयी रसिकाला सांगावे लागत नाही!
३) चांदणे, पिणे, झिंगणे ही प्रतिमांची भाषा आहे!
पिण्याच्या शारिरीक प्रक्रियेला महत्व देणे म्हणजे शब्दाचा फारच उथळ अर्थ घेणे होय.
एखादी गोष्ट प्राशिल्यानंतर उदाहरणार्थ दारू.....ती पिल्यानंतर माणूस झिंगतो!
इथे तुझे चांदणे(प्रेमाचे प्रतिक) म्हणजे तुझ्या रूपाचे चांदणे, तुझी आभा इतकी मदिर आहे की जणू ते रिचवल्यावर मी झिंगतो.....असे यातील काव्य आहे!
पिणे आहे, म्हणून झिंगणे आहे. प्रेमातला संवाद आहे, प्रियेच्या रूपाची आभा आहे म्हणून चांदण्याचे प्रतिक आहे. ही सर्व प्रतिकांची गुंफण अरसिकांच्या डोक्यावरूनच जाणार!
४) स्मृतींचे सरोवर, त्यात डुंबत बसणे, यात सूक्ष्मावर स्थूलाचे आरोप करून खयाल काव्याच्या उंचीवर गेला आहे!
५) तडा म्हणजे भेग, दुभंग!
चरा असेल, तडा असेल, भेग असेल!
तड्यामधे तडकणे येते! काच तडकते तसे काळीजही तडकते हे काव्य आहे! कुठलाही तडा, भेग, चरा हा सांधावा/जोडावा लागतो!

टीप: उमेश कोठीकर..........
काव्यातील प्रतिके, त्यांचे सौंदर्य, त्यांची कलात्मक गुंफण, अलंकार, वक्रोक्ती, सूक्ष्मावर स्थूलाचा आरोप, personification इत्यादी मूलभूत काव्यगोष्टींचा अभ्यास करून या, मग काय ते कुणाला शिकवा!
तुमचा प्रतिसाद म्हणजे अभ्यास न करता वर्गात घुसून हवेत गोळीबार करणा-या, डिग्र्यांनी मढलेल्या तोतया प्राध्यापकी अविर्भावातला वाटला!
आता काय ते ह ह ह हा हा हा........सर्व हची बाराखडी दात विचकत करा! इथे हांजीबाबा आहेतच जी जी करायला! नाचे कुठले!

...........प्रा.सतीश देवपूरकर

Pages