विडंगझल (झब्बू)- आले कुजलेले मिठ नसलेले

Submitted by योग on 21 February, 2013 - 08:15

||'३४६८१' प्रसन्न!||

(भुंग्याकडून प्रेरणा घेऊन..)

आले कुजलेले मिठ नसलेले
मी एक मठ्ठा (मला) सर्वांनी टाकलेले..

माझे मला कळेना पिऊ कसा मला मी
प्रत्त्येक घोट माझे ईतके 'कोथींबीरलेले'

पिऊ नये कुणाचा मठ्ठा कुणिही
असतात मिशांचे केस सांडलेले

डोळे भरू न देता* आम्ही पिऊन घेऊ
दिसतील सर्व मठ्ठे टेबलावर सांडलेले

ती बाई वाढणारी समजूतदार होती
दिसले कुणास नाही मठ्ठयात थुंकलेले

शिक्षा मला मिळाली वाटीत राहण्याची
मी एक ताक होतो पाणी घुसळलेले

केली कुणि न परवा माझ्या विटं(डं)बनाची
मी आत्मवृत्त होतो लिहून मठ्ठलेले.

['कोथींबीरलेले': हा आम्ही मराठी साहित्यास एक नविन शब्द बहाल केला आहे..]
* यजमानाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा आपण देवसरांचे एक एक शेर या रचनेत मस्त गुंफले आहेत

यावरून देवसरांच्या गझला आपण किती लक्षपूर्वक वाचता व लक्षात ठेवता हे लक्षात आले खरेच हे काही 'खायचे काम' नाही

यासाठी खरेतर त्यांनी तुमचे आभार मानायला पाय्जेत

'कोथींबीरलेले' = Lol .............'विठ्ठलाळलेले' हा माझा शब्द आठवला Happy

वैभ्या, तारीफ करतोस की, बुराई रे बेट्या?

यावरून देवसरांच्या गझला आपण किती लक्षपूर्वक वाचता व लक्षात ठेवता हे लक्षात आले
<<<<<<<<<<<,,
आणि तू रे बेट्या? तू काय काय लक्षात ठेवतोस रे?

Happy