Submitted by -शाम on 18 February, 2013 - 11:41
ही कर्मदरिद्री वस्ती
चिलटांची भणभण नुसती
जंतू बरबटले घेती
ना वळवळण्याची तसदी
या खडकांवरुनी जातो
धडकून सूर्यही मागे
बेफिकीर हे वणवणती
समशानी जैसे जोगे
येतात पांढरी कुत्री
दिवसा वा अर्ध्यारात्री
जनल्यावर होते चर्चा
उगवली कुणाची छत्री
चिकटुन बसल्या जातीच्या
कुबड्यांची ऊब सुटेना
मनगटातल्या धमन्यांची
फटफट ऐकू येईना
नाचवून क्रांतीज्योती
स्मरणांचे उत्सव होती
आधार वर्तमानाचे
कवटाळत बसती माती
मी जपतो अंकुर काही
तेजाचे घालुन पाणी
पण फुटक्या पाटीवरती
टिकतील कोठवर गाणी
....................................शाम
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या काव्यावर खालील लोकांचे
या काव्यावर खालील लोकांचे सकारात्मक प्रतिसाद निश्चीत आहेत.
कवी पेशवा
कवी ट्यागो
प्रतिसादक गंभीर समीक्षक
आकाश व राजकारण तज्ञ गा मा पहिलवान
कवी बेफिकीर
कुशल संघटक, कवी व वैद्य कैलास गायकवाड
व
इतर
अनेक ओळी आवडल्या
कळावे
गं स
खूप खूप आवडली
खूप खूप आवडली ...............
अप्रतीम झाली आहे(तुमची प्रत्येक कविताच दिवसेंदिवस अधिकाधिक अप्रतीम होत चालली आहे )
विषय जातीपातीचा आहे का ? ...किंवा समाजातल्या एका विशिष्ट सामाजिक -आर्थिक इत्यादी स्तरातील लोकांचा ?
(कविता मला बरीचशी समजलेलीच आहे तरीही विचारून ठेवले सहजच ...)
व्वाह!!! डोळ्यासमोर उभं केलंत
व्वाह!!! डोळ्यासमोर उभं केलंत चित्र!
मी जपतो अंकुर काही
तेजाचे घालुन पाणी
पण फुटक्या पाटीवरती
टिकतील कोठवर गाणी
>> सुरेख!!
मी जपतो अंकुर काही तेजाचे
मी जपतो अंकुर काही
तेजाचे घालुन पाणी
पण फुटक्या पाटीवरती
टिकतील कोठवर गाणी
सुंदर.
सामाजिक आशयाचं आपण छान लिहीता.
काय म्हणायचे ते जाणवतेय. पण पार्श्वभूमी समजून घ्यावी लागते.
काही ठिकाणी लाउड झालीय. अर्थात सत्यही तसेच.
उत्तम काव्य... काही ठिकाणी
उत्तम काव्य... काही ठिकाणी अंगावर येतं ... पण ते अटळ आहे.
Dhanyawad dostanno!
Dhanyawad dostanno!
जबरी, जबरी... शेवटच्या चार
जबरी, जबरी...
शेवटच्या चार ओळी तर अप्रतिमच .....
अतिशय परिणामकारक काव्य.......
अतिशय परिणामकारक काव्य....... !!
शेवट जबरदस्त !!
फारच सुंदर ,आशयगर्भ आणि वर
फारच सुंदर ,आशयगर्भ आणि वर म्हटले तशी जबरदस्त .
उत्तम!! उत्तम!!! फार सुंदर!!
उत्तम!! उत्तम!!! फार सुंदर!!
शेवतच कदव सार्थक आहे पूर्ण
शेवतच कदव सार्थक आहे पूर्ण कवितेच....अफाट सुंदर कविता
शाम, परिणामकारक, प्रभावी
शाम,
परिणामकारक, प्रभावी कविता.
मनात खदखणारं प्रभावीपणे व्यक्त झालंय.
खूप खूप धन्यवाद सगळ्यांना!!
खूप खूप धन्यवाद सगळ्यांना!!