परत का आलात?

Submitted by सई केसकर on 18 February, 2013 - 10:42

सध्या मी माझं भारतातील "फॉर गुड" आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. मला "भारतात परत का आलात?" हा प्रश्न हमखास विचारला जातो. याला बरीच वैयक्तिक आणि नॉट-सो-वैयक्तिक करणं आहेत. त्यातील दुस-या श्रेणीतील सगळी महत्वाची आणि पहिल्या श्रेणीतील एकच मी सांगणार आहे Happy

त्या आधी मला इथे आवर्जून असं सांगायचं आहे की हा लेख अमेरिकेत (किंवा परदेशात) राहणाऱ्यांच्या विरोधात अजिबात लिहिलेला नाहीये. कधी, कुणी, का आणि कसं परत यावं, किंवा का येऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भारतात परत येण्याच्या निर्णयात "ऐसा देश हैं मेरा", किंवा "आय लव्ह माय इंडिया" वगैरे गाण्यांचा अजिबात हात नव्हता. आणि माझं परदेशातील वास्तव्य आणि मित्र मंडळ अतिशय आनंदी आणि मजेदार होतं. एकटेपणा किंवा एकटेपणाची भीती हेही माझ्या निर्णयामागचं कारण नाही. मी अजूनही माझ्या ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत झालेल्या काही परदेशी मित्र-मैत्रिणींशी अगदी रोज बोलते. आणि त्यातील काही लोक मला भेटायला भारतात यायचे बेतही करतायत.

पण परदेशात आणि खास करून अमेरिकेत न राहण्याचं एक कारण म्हणजे तिथलं वास्तव्य कायम व्हिसावर अवलंबून असतं. आणि ९/११ नंतर दोन वेळा अमेरिकेच्या व्हिसा प्रक्रियेतून गेल्यावर मला तिसऱ्या वेळी त्यातून जायची अजिबात इच्छा नव्हती. माझी शैक्षणिक शाखा आणि माझा भारतीय पासपोर्ट मला अमेरिकेच्या TAL (Technology Alert List ) मध्ये समाविष्ट करतो. या यादीत आतंकवादी ज्या ज्या तांत्रिक माहितीचा वापर करू शकतो त्या सगळ्या शाखा येतात (केमिकल, बायोमेडिकल, बायोलॉजी इत्यादी). त्यात जर तुम्ही ठराविक देशाचे नागरिक असाल तर सहा ते सात महिनेसुद्धा लागू शकतात. त्यामुळे अमेरिकन व्हिसा मिळवताना नेहमी मला २२१ g, हा फॉर्म देऊन चार ते सहा आठवडे थांबावं लागतं (यात व्हिसा मिळेल याची हमी नसते. काही लोकांना सहा महिन्यानंतर नकार आल्याच्या केसेस आहेत). पहिल्यांदा जेव्हा मी या २२१ च्या चक्रात अडकले होते तेव्हा मी ऑस्ट्रेलियात होते. माझ्या बरोबर व्हिसा साठी आलेल्या माझ्या युरोपियन सहकार्याला एका दिवसात व्हिसा मिळाला. मला तब्बल अडीच महिन्यांनी माझा पासपोर्ट परत मिळाला. तोपर्यंत माझे सगळे सहकारी कॉनफरन्स उरकून परतही आले होते. तेव्हा मला अमेरिकेला जाता येत नाही यापेक्षा मी परदेशात पासपोर्टशिवाय राहते आहे याचाच जास्त राग येत होता. काही दिवसांनी "मला व्हिसा नको पण माझा पासपोर्ट परत द्या" म्हणून त्यांना फोन केला तेव्हा मला अतिशय उद्धटपणे, "तुमचा पासपोर्ट FBI कडे देण्यात आलाय आणि आम्ही काहीही करू शकत नाही" असं सांगण्यात आलं.

या २२१ g मुळे गेल्या काही वर्षांत कित्येक शास्त्रज्ञ ठरवलेल्या कॉनफरंसला वेळेत पोहोचू शकले नाहीत. काही काही लोकांची व्हिसा रिन्यू करताना अडकल्यामुळे परिवारापासून सहा सहा महिने ताटातूट झाली आहे. काही विद्यार्थ्यांचे एक सेमिस्टर वाया गेले आहे. सुट्टीला परत आलेले विद्यार्थी ऐन पी.एच.डी च्या मधेच भारतात अडकून राहिलेले आहेत. काही विषयांच्या कोन्फरंस आता दुस-या देशांमध्ये आयोजित केल्या जातात. कारण मान्यवरांना व्हिसा मिळून वेळेत पोहोचायची हमी देत येत नाही.

कित्येक युरोपियन देशांच्या नागरिकांना विना व्हिसा ३ महिन्यापर्यंत अमेरिकेत राहता येते. यात असे बरेच देश आहेत जिथे त्याच देशातील नागरिकांनी आतंकवादी हल्ले केलेले आहेत (उदा. ब्रिटन, फ्रांस). अशा देशांतील लोक कधीही विमानात बसून कुठल्याही तपासणीशिवाय अमेरिकेत दाखल होऊ शकतात. मध्यंतरी अशा एका ब्रिटीश नागरिकाच्या बुटात स्फोटक पदार्थ सापडले होते (तेव्हापासून एयरपोर्टवर बूट काढायचा नियम निघाला). या नियमांमध्ये तुमचं नाव जर इस्लामिक वाटत असेल तर तुम्हाला जास्त वेळ थांबावे लागते. ब्रिटीश पासपोर्टवर जन्माला आलेले असे किती इस्लामिक नावाचे लोक असतील? फ्रांसमध्ये कित्येक अरबी लोक वर्षानुवर्षं स्थाईक झालेले आहेत. त्यांचा फ्रेंच पासपोर्ट त्यांना विना इंटरव्यू अमेरिकेत येऊ देतो. पण अरबी देशातून आलेल्या अरबी लोकांना कित्येक महिने थांबावे लागते. २२१ मधून जसे तपासणी नंतर माझ्यासारखे लोक सुटतात तसेच कित्येक पाकिस्तानी, अरबी, चीनी लोकही सुटतात. पण ज्यांची काहीच तपासणी होत नाही त्या लोकांमध्ये एखादा आतंकवादी नसेल असे कशावरून?

मला अमेरिकेत पोस्ट डॉक मिळाल्यावर पुन्हा त्या प्रक्रियेतून जावं लागणार याचा विचार करूनच अंगावर काटा आला. दुसऱ्यावेळी देखील चार आठवडे लागले आणि व्हिसा ऑफिसरनी, "You are smart and single. what if you find yourself an American husband? You are just paying the price of being so smart." असा शेरा मारला होता. पोस्ट डॉक चे काही महिने संपल्यावर मी हा व्हिसा रिन्यू करायचा नाही हे पक्कं ठरवलं होतं.

अमेरीकेनी ही प्रक्रिया आमच्यासारख्यांसाठी सुखद करावी असं माझं अजिबात मत नाही. त्यांनी त्याच्या देशात कुणाला थारा द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. आणि अमेरिकन नागरिकांचं संरक्षण करण्याचे सगळे मार्ग त्यांनी वापरले पाहिजेतच. त्यात आमच्यासारख्या लोकांची गैरसोय होणे ही तशी छोटी बाब आहे.अमेरिकेतील वास्तव्यात मला स्वत:बद्दल आणि माझ्या कामाबद्दल खूप काही शिकायला मिळालं आहे. आपण तिथे उगीच गेलो असं मला अजिबात वाटत नाही. पण आपण उगीच परत आलो असंही वाटत नाही.

खरं सांगायचं तर मला परदेशात राहून फेसबुकवर किंवा ट्विटर वर "भारतातील राजकारण, भारतातील अत्याचार, भारतातील भ्रष्टाचारावर मतं व्यक्त करायची हळू हळू लाज वाटू लागली होती. मी अमेरिकेत राहून अमेरिकेच्या राजकारणाचा अभ्यास करायचे पण तिथे मला नेता निवडता यायचा नाही. आणि भारतातील राजकारणाचा उहापोह करून, फेसबुकवर मित्रांशी वाद घालताना त्यांच्यावर लिंका फेकून, खूप सारा दंगा करूनही मला भारतात मतदान करणं जमेलच याचीही खात्री नव्हती. मग आपण नुसतेच पेपर टायगर आहोत असं वाटू लागलं होतं. आणि अशी आयुष्यभर नोकरी करत करत कदाचित आपल्यातली ही टोचणारी सुई बोथट होईल याचीही काळजी वाटू लागली होती.

माझी निर्णय प्रक्रियेचा ढाचा "आधी ठरवा मग विचार करा" हा आहे. माझे सगळे निर्णय नेहमी असे एखाद्या सकाळी, अचानक उद्भवतात. त्यामुळे हा निर्णय झाल्यावर जवळपास आठ महिने माझी नोकरी बाकी होती. त्या काळात मी खूप लोकांशी बोलले. काही तिथे राहणाऱ्या काही परत आलेल्या, काही तिथलं नागरिकत्व मिळवलेल्या, माझे अमेरिकन आणि युरोपियन मित्र मैत्रिणी. काही लोक माझा आदर्श बनले. त्यातलीच एक गायत्री नातू. मला तिचं नाव आवर्जून घ्यावासं वाटतं कारण माझ्यासारखा लेख बिख लिहायच्या भानगडीतही ती कधी पडली नाही. तिचा निर्णय सुरवातीपासूनच पक्का होता. आणि नुकतंच तिचं प्रसाद बोकीलशी लग्न झालं. त्या लग्नाची गोष्ट तर म.टानी देखील उचलून धरली. तिच्या लग्नाचा एक छोटा भाग बनल्याचा मला अभिमान आहे.

परत येताना मला दिल्या गेलेल्या सल्ल्यांमध्ये पुन्हा व्हिसा ऑफिसरचाच मुद्दा निघाला -- लग्नाचा. भारतात जाऊन तुझ्यासारख्या उच्च शिक्षित, जग बघितलेल्या मुलीसाठी नवरा शोधणं अवघड आहे. अर्थात, हा प्रश्न वयक्तिक आहे. आणि खूप दिवस मी त्यावर ठरवून लिहिलेलं नाही. पण परत येऊन तीन महिने झाल्यावर माझे याबद्दलचे विचार अजून ठाम झाले आहेत. एखाद्या देशात जाताना किंवा तिथून परत येताना दोन्हीवेळी हा लग्नाचा प्रश्न का उपस्थित व्हावा? लग्न होणार नाही, हा आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या निर्णयातील अडसर का व्हावा? आणि नाही झालं तर असा कोणता मोठा गहजब होणार आहे? हे आवर्जून लिहायचं कारण असं की मी खूप वर्षं या "सामाजिक अपेक्षेच्या" ओझ्याखाली राहून माझ्या आयुष्याला वेसण घालण्याचा प्रयत्न केला. आणि माझी खात्री आहे की माझ्यासारख्या इतर मुलीदेखील "आपलं लग्न झालं नाही तर?" या भीतीपोटी त्यांच्या आयुष्यातील काही निर्णय पुढे ढकलत असतील किंवा रद्द करत असतील. अर्थात इथे पुन्हा विरोध लग्न करण्याला नाही. पण न मिळालेल्या जोडीदारासाठी हातात असलेलं उच्च शिक्षण, नोकरी, प्रवास करायची संधी दवडणंदेखील बरोबर वाटत नाही. आणि ही भीती फक्त भारतीय मुलींची नाही हे ही लक्षात आलं. ही सगळ्या देशांतील मुलींना सतावणारी भीती आहे. पण भारतात परत येण्याच्या निर्णयातील सगळ्यात समाधानाची बाजू ही, की अशी भीती, काळजी पोटात असतानाही मी परत येऊ शकले. आणि याचं सगळ्यात मोठं श्रेय माझ्या आई बाबांचे आहे. त्यांनी माझ्या प्रत्येक प्रवासात माझी पूर्ण साथ दिली आहे. आणि या बाबतीतही कुठल्याही प्रकारची चिंता, चिडचिड, दु:ख, असंतोष कधीही व्यक्त केलेला नाही. माझा परत येण्याचा निर्णय पूर्णपणे माझा होता. अर्थात आई बाबांना त्याचा प्रचंड आनंद झाला. पण मी नसल्याची त्यांना खंत होती हे त्यांनी मला कधीही दाखवून दिले नाही.

इतरही खूप छोटी छोटी करणे आहेत. जसं की, रविवारी फुले मंडईत जाणे, हक्काची बेकारी उपभोगणे, रिक्षातून फिरणे, रोज सकाळी अंजीर खाता येणे, माझ्या भाचरांचे लाड करता येणे. पण सगळ्यात महत्वाचं कारण हेच की मला भारतात परत यायचं होतं आणि माझ्या डोक्यात कोण्या एका शनिवार सकाळी लक्ख प्रकाश घेउन आलेला तो विचार कधीच कमजोर झाला नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन.. एक महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल.
आणि मनापासून शुभेच्छा... या निर्णयाबद्दल आयुष्यात कधीही पश्चाताप होऊ नये यासाठी !
मायबोलीवर असे अनेक सभासद आहेत. त्यांचे मार्गदर्शन मिळेलच.

दिनेशदा +१, "माझा परत येण्याचा निर्णय पूर्णपणे माझा होता." ह्यापलीकडे काहीच नसावे. Happy

TAL मधे असाल तर ९/११ नंतर green card ला पण प्रॉब्लेम येतात का ? तुम्ही विसाबद्दल लिहिलय म्हणून म्हणून विचारतोय. माझे काहि मित्र ९/११ पूर्वी अतीशय sensitive गोष्टींवर काम करत होते पण ते लवकरच citizen झाले होते.

व्हिसा प्रेसेस मागचा मनस्ताप मी अगदीच समजू शकते. भिक नको पण कुत्रं आवर अशी वेळ खरच येते.माझ्या आईबाबांचा व्हिसा दोनदा नाकारला गेला होता पण सगळ्यात जास्त त्रास याचा होतो की कोणतेही कारण दिलं जात नाही.

पण न मिळालेल्या जोडीदारासाठी हातात असलेलं उच्च शिक्षण, नोकरी, प्रवास करायची संधी दवडणंदेखील बरोबर वाटत नाही.>>>ह्याला फारच अनुमोदन. मी तर म्हणते एंजॉय व्हाइल यु कॅन.
प्रत्येक गोष्टीप्रमाणे लग्नाच्या बाबतीत पण फायद्यांबरोबर तोटे पण आहेतच.

आता ते लग्नाची गोष्ट वाचून येते Happy

प्रामाणिक लेख. आवडला.

कुठेही रहा. तिथे राहण्याची (किंवा एखाद्या ठिकाणी) न राहण्याची आपली कारणं आपल्यापुरती योग्यच असतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. Happy

अगदी योग्य केलंस तू सई! हल्ली आणि भारतात संशोधनाच्या खूप संधी उपलब्ध आहेत.

माझा एक शास्त्रज्ञ मित्र भारतात अणू मधील इलेक्ट्रॉनच्या कक्षांचा अभ्यास करतो.. म्हणजे इंग्रजीत अ‍ॅटॉमिक फिजिक्स मधे. त्यालाही अमेरिकेत कॉन्फरन्सला जायला असेच प्रॉब्लेम येतात. त्यात ते मठ्ठ व्हिसा ऑफिसर त्यातला अ‍ॅटॉमिक शब्द ऐकून सैरभैर होतात.. त्यांना ते अ‍ॅटॉमिक बाँबशी संबंधित वाटतं. मग पुढे काय होत असेल त्याची कल्पना तू करू शकतेस. Lol

लेखिका सई केसकर,

आपण अमेरिकेतून 'फॉर गुड' परत का आलात हे जाणून घेण्यात कुणालाही काहीही स्वारस्य असेल असे आपल्याला वाटण्याचे कारण काय हे विचारले तर काय उत्तर आहे आपले?

देश आपला आहे, केव्हाही या! येथे का जाता असेही विचारले जात नाही आणि का आलात हेही!

कळावे

गं स

गं स
हा हा. हो खरंच की! मी असा विचार लेख प्रसिद्ध करायच्या आधी केलाच नव्हता. की ज्यांना यात काही रस नाही तेही येउन इथे हौसेनी अभिप्राय देतील. तुम्हाला माझ्या परत येण्यात रस नसताना देखील मी तुमच्या डोळ्यांना हा लेख वाचायला लावून त्रास दिला त्याबद्दल मनापासून क्षमा मागते.
आपली
सई

नशीबवान आहात असेच म्हणेन,
परदेश देखील बघितलात आणि परत आपल्या देशातही आलात.

@ चिमण
हो! आपण काय करतो हे कुठलेही स्फोटक शब्द न वापरता समजावून सांगणे अवघड. Happy
अवांतर:
इथे मराठीत टाईप करायला प्रॉब्लेम येतोय. सगळ्यांनाच असं होतंय का?

तुम्हाला माझ्या परत येण्यात रस नसताना देखील मी तुमच्या डोळ्यांना हा लेख वाचायला लावून त्रास दिला त्याबद्दल मनापासून क्षमा मागते.

या विनम्रपणाबद्दल कोणताही प्रश्न न विचारता तुम्हाला खरे तर एच वन मिळाला असता. पण चुकीच्या जागी चुकीच्या विविध गुणदर्शनामुळे मराठी माणूस मागे पडतो याचे उत्तम उदाहरण कृतीतून दाखवल्यामुळे तुमचे येथे मी सार्वजनिकरीत्या हार्दिक अभिनंदन करतो.

कळावे

गं स

इथे मराठीत टाईप करायला प्रॉब्लेम येतोय. सगळ्यांनाच असं होतंय का?

नाही. हे फॉर गुड परत आलेल्यांना होते.

कळावे

गं स

सई प्रामाणिक लिहिलयसं.
<<<रविवारी फुले मंडईत जाणे, हक्काची बेकारी उपभोगणे, रिक्षातून फिरणे, रोज सकाळी अंजीर खाता येणे, माझ्या भाचरांचे लाड करता येणे.>>> ह्या व अशा कित्येक गोष्टींची सर परदेशात येत नाही.
आणि चिमण म्हणतो तसा भारतात तर प्रचंड संधी आहेत आणि कुशल लोकांची पण गरज आहेच.

@ गं स

हा हा. असे अभिप्राय बघून हुरूप येतो. याचसाठी असे लेख लिहावेत. माझ्या लेखातल्या नक्की कुठल्या मुद्द्यामुळे तुमच्या शेपटीवर पाय दिला गेलाय? आणि तुम्ही अमेरिकेत आहात का? मग सकाळी सकाळी माबोवर टाइम पास करून स्वत:चा H १ असा का सार्थकी लावताय? Happy

@श्री
धन्यवाद!

माझ्या लेखातल्या नक्की कुठल्या मुद्द्यामुळे तुमच्या शेपटीवर पाय दिला गेलाय?

तुमचा अख्खा लेख हीच 'अमेरिकेतून परत का आले' या स्वयंघोषित मुद्यांची शेपटी आहे. खरे कारण सांगितले असतेत तर आम्ही प्रतिसाददाते झालोच नसतो.

आम्हाला शेपटी नाही. त्यामुळे तुम्ही पाय दिलात तर तो नुसताच आपटेल आणि अमेरिकेतून परत यावे लागल्यामुळे पाय आपटतायत अशी एक प्रतिमा निर्माण होईल.

कळावे

गं स

लेख आवडला. मृ म्हणाली तशी प्रत्येकाची कारणं वेगळी आणि त्या व्यक्तीला पटण्यासारखीच असतात.
>>
इथे मराठीत टाईप करायला प्रॉब्लेम येतोय. सगळ्यांनाच असं होतंय का?>> अमेरिकेतून भारतात गेलेल्यांना मराठीचा थोडा प्रॉब्लेम होतोच. ह्याबद्दल 'झक्की' तुम्हांला जास्त चांगलं मार्गदर्शन करु शकतील Wink

छान लिहिलय. आवडलं. Happy

मृ +१!

खरय, विजा वगैरेच सोपस्कार करुन कंटाळा आला. फार वैताग येतो भारतवारी मध्ये विजा स्टँम्पिंग हा प्रकार असला की.

पण न मिळालेल्या जोडीदारासाठी हातात असलेलं उच्च शिक्षण, नोकरी, प्रवास करायची संधी दवडणंदेखील बरोबर वाटत नाही. आणि ही भीती फक्त भारतीय मुलींची नाही हे ही लक्षात आलं.>>>>>> बरोब्बर!

आपण अमेरिकेतून 'फॉर गुड' परत का आलात हे जाणून घेण्यात कुणालाही काहीही स्वारस्य असेल असे आपल्याला वाटण्याचे कारण काय हे विचारले तर काय उत्तर आहे आपले?>>>>>> अर्र्र्त्तिच्यामारी! इकडे तिकडे घातलेल्या, आमचे पेशवे म्हणतात तशा शेणखताच्या रतिबाला गिर्हाईक आहेत तर अशा लेखांना सुद्धा थोडंफार गिर्हाईक असणारच की? नाही पटला लेख एकवेळ ते ठीक आहे पण उगाच बिन्डोक विधानं करुन काय सिद्ध करायचय?
तिकडे तुमचे रतिबबंधू पाहिल्या धारेचा रतिब घालतायत, तिकडे त्याचे ३६ कलमी इन्स्पेक्षन करा की त्यापेक्षा.

@ गं स
हा हा!
पुन्हा एकदा टाळ्या !! फारच भारी अभिप्राय देता हो तुम्ही!
पण तुम्ही कुठे बसून हे असे एकापेक्षा एक अभिप्राय देताय ते नाही सांगितलंत! Happy

सई, सर्वप्रथम निर्णयाबद्दल अभिनंदन आणि व्हिसा प्रक्रियेचे फटके आमच्या काही मित्रमैत्रिणींना असेच बसले आहेत. अर्थात प्रत्येक केस वेगळी आणि प्रत्येकाची त्याबरोबर डील करण्याची मानसिकता पण वेगळी. माझ्या साबासाबुंचा व्हिजीटर व्हिसा पण २ दा नाकारला गेला होता पण तिसर्‍यांदा १० वर्षांचा मिळाला. तेव्हा आम्हीदेखील मंद अमेरिकी अधिकारी, काय माठ गाडग्यांना आणून बसवतात इ. इ. बोललो. पण कधी कुणी त्या ऑफीसर च्या बाजूने डोकावून पाहिले आहे का?
रोज नव्याने येणारी टेक्नॉलॉजी आणि वेगवेगळ्या शास्त्रशाखांचा अभ्यास प्रत्येक अधिकारी करू शकत नाही. त्यासाठी काही संदर्भ, काही शाखा "सेन्सिटिव्ह" म्हणून घोषित केलेल्या असतात. कोणत्याही देशात प्रवेश करण्याचे काही नियम असतात आणि मग त्यानुसार ते अधिकारी निर्णय घेतात. त्यांच्या माथीदेखील अवैध प्रवेश होणार्‍या कॅनडा-मेक्सिको सीमेचा ताप आहेच.
अमेरिका/भारत वाद सुरू नाही करायचा पण हीच उलट स्थिती असती - या व्हिडिओमधला अधिकारी विसाचा शिक्का द्यायला बसला असेल तर काय होईल. Happy
http://www.youtube.com/watch?v=ApQlMm39xr0

अहो गं स., लेखाच्या दुसर्‍याच वाक्यात लिहिलय ना की असा प्रश्न हमखास विचारला जातो म्हणून.

नेहमीप्रमाणेच अतिशय छान लेख! "आपण तिथे उगाच गेलो असं वाटत नाही आणि उगाच परत आलो असंही वाटत नाही. " ही भावना कुठल्याही बाबतीत समाधानकारक असते.

अर्र्र्त्तिच्यामारी! इकडे तिकडे घातलेल्या, आमचे पेशवे म्हणतात तशा शेणखताच्या रतिबाला गिर्हाईक आहेत तर अशा लेखांना सुद्धा थोडंफार गिर्हाईक असणारच की?

तुमच्या पेशव्यांना शेणाच्या रतिबात एवढे स्वारस्य कशामुळे असते काही माहीत नाही. पेशवे कुठे, शेण कुठे आणि बाजारबुणगे कुठे! पण बादरायण संबंध म्हणतात ते हेच. बाकी हा लेख फुकटात वाचायला मिळाला. आम्ही काही गिर्‍हाईक नव्हेत या लेखाचे. पैश्ये खर्च करून वाचावे असे अद्याप आम्हास काही सापडले नोहे.

कळावे

गं स

@ धनश्री
मान्य आहे अगदीच. पण याचबरोबर कित्येक युरोपियन देशांच्या नागरिकांना विना व्हिसा ३ महिन्यापर्यंत अमेरिकेत राहता येते. यात असे बरेच देश आहेत जिथे त्याच देशातील नागरिकांनी आतंकवादी हल्ले केलेले आहेत (उदा. ब्रिटन, फ्रांस). मग अशा देशांतील लोक कधीही विमानात बसून कुठल्याही तपासणीशिवाय अमेरिकेत दाखल होऊ शकतात. मध्यंतरी अशा एका ब्रिटीश नागरिकाच्या बुटात स्फोटक पदार्थ सापडले होते. फ्रांस मध्ये जो हल्ला झाला तो फ्रेंच नागरिकानी केला होता. ब्रिटन मधले बरेच हल्ले ब्रिटीश नागरिकांनीच केलेत. पण या सर्व शाखांमध्ये काम करणा-या युरोपियन लोकांना विना तपासणी अमेरिकेत येत येते.

Rofl तो व्हिडीओ पाहुन जाम फुटलो .
ओ गं.स. कशाला उगाच इथे फाटे फोडत बसताय. तिकडे जाऊन गझलेवर फोडा की काय फोडायचे ते.
पण या सर्व शाखांमध्ये काम करणा-या युरोपियन लोकांना विना तपासणी अमेरिकेत येत येते. >>> सई हे नक्की कुठे होतयं , इथे होण तर अजिबातच शक्य नाही.

अतिशय मार्मिक , प्रांजळ लिखाण व सादरीकरण. प्रॅक्टिकल विचारसरणी बरओबरच घालमेल व्यक्त झाली आहे. यात उगीचच चि़खल काही जण का उडवताहेत हे कळत नाही.
प्रत्येक लिखाणावर असे ताशेरे यायलाच हवेत का?

बरोबर आहे. आम्हाला रतिब फुकट मिळाला तरी आम्हाला वाचायची इच्छा नाही होत. वर्गणी काढून अ‍ॅडमीनांना हे पैसे घ्या पण ह्या दोन नॉन स्टॉप श्यानमेकिंग गझबैलांना इथून हुस्कवा असंही म्हणता येत नाही. असो.
तुमच्या लेखावर माझ्या अवांतर प्रतिसादांबद्दल सॉरी सई. हे मा शे पो. Happy

सई मस्त आणि प्रामाणिक लिहिलंयस... Happy

आम्ही दोघं परत आलो तेव्हाही "वाटलं नव्हतं परत याल..." असं खूप लोकांनी सांगितलं आम्हाला...असो!

ह्म्म्म हुशार असल्याचा तोटा की सगळे विचारतात 'परत का आलात?'
मी परत आले तेव्हा काही जमले नाही म्हणूनच परत आली असणार असं गृहित धरून कोणी विचारायच्या भानगडीत पडले नाही Wink

Pages