पारिजात

Submitted by मुग्धमानसी on 11 February, 2013 - 01:21

माझ्या मनात बहर पण सडा तुझ्या दारी,
माझ्या अंगणी सावली पण फुले तुझी सारी!

तुझी ओंजळ सुगंधे तुझी शहारली माती,
मीच झाडाच्या मुळाशी होते पेरलेले मोती!

रोज वेचशील फुले तुझा सजेल देव्हारा,
जरी वाहील पोकळ माझ्या घरातून वारा...

देत राहीन तरीही सर्वस्वाचे दान तुला,
सांग देवाच्या कानात.. नाव माझे... माझ्या फुला..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छोटीशी आणि छान आहे कविता

>>माझ्या अंगणी सावली पण फुले तुझी सारी<<

यातील `पण' चा अर्थ नाही नीटसा समजला

गोड कविता. शेवट आवडला. पण तिसर्‍या कडव्यात यमक जुळत नाहिये ते जरा बघ ना.
"आसवांचा अभिषेक, माझा भिजेल देव्हारा" असे काहीतरी सुचले. आवडले नाही तर संपादन करीन.

धन्यवाद पारिजाता. तिसर्‍या कडव्यात यमक जुळत नाहिये हे खरंय... पण मला जे म्हणायचं होतं ते यमक जुळवून नव्हतं म्हणता येत. आणि यमक जुळवण्याच्या नादात कवितेचा अर्थ बदलत होता. असो...

तु सुचवलेलेही छान आहे. पण मीही बदल केलाय. कसा वाटतो बघ...

मस्त कविता !
राधा आणि रूक्मिणी यांच्यातली एक कथा आठवली या कवितेच्या निमित्ताने .

असो . कविता खूपच आवडली .