Submitted by प्राजु on 16 February, 2013 - 05:16
उभी निष्पर्ण झाल्यागत पुन्हा मी या नदी काठी
किती वेळा इथे येऊ, तुला विसरावयासाठी?
कधीचा गाळ आडाच्या नशीबी साचला आहे
उडी घेईल का तो पोहरा उपसावयासाठी?
सुटूदे हात हातातून पण तू जाण रे सखया
असे संपेल ना नाते, अशा सुटणार ना गाठी
कुठे गेली जुनी शाळा, फ़ळा काळा नि बाई त्या?
मला काळा तिथे ने ना धपाटा खावया पाठी
अता कंटाळले तारे नभाला आणि रात्रीला
म्हणे दिवसाच उगवावे रवीच्या दर्शनासाठी
विचारांची गुरेही स्वैर धावू लागली आता
जरा हाकावया त्यांना मनाची पाहिजे लाठी
-प्राजु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला काळा तिथे ने ना धपाटा
मला काळा तिथे ने ना धपाटा खावया पाठी
उडी घेईल का तो पोहरा उपसावयासाठी?
हे मिसरे छानच. आणि यांच्यातले खयालही वेगळे वाटले..
उभी निष्पर्ण झाडागत पुन्हा मी
उभी निष्पर्ण झाडागत पुन्हा मी या नदी काठी
किती वेळा इथे येऊ, तुला विसरावयासाठी?<<<
मी या मतल्याच्या प्रेमात पडलेलो आहे. लिटरली.
गझल छानच! विचारांची गुरे हा कल्पक खयाल व चित्रबाह्य असूनही वेगळ्या कवाफींमध्ये निभावला गेलेला!
अभिनंदन!
किती वेळ इथे येऊ तुला विसरावयासाठी - माझ्यासाठी अमर ओळ
पहिला आणि शेवटचा शेर
पहिला आणि शेवटचा शेर आवडले.
उभी निष्पर्ण झाडागत पुन्हा मी या नदी काठी
किती वेळा इथे येऊ, तुला विसरावयासाठी?
मतला खूप छान आहे. मतला जितका
मतला खूप छान आहे. मतला जितका सुरेख बरोब्बर त्याउलट दुसरा शेर अत्यंत तकलादू झालाय.
बाकीचे शेर ठीकठाक
( गेले काही दिवस पाहतोय, गझलेसाठी मोठे वृत्त अथवा एखादे अवघड वृत्त हाताळले तर ती गझल जास्त सुंदर असे काहीसे समिकरण गझलकारांच्या डोक्यात शिरलेले दिसते आहे. एकंदरीतच वियद्गंगाला सध्या चांगले दिवस आलेले दिसतात.... असो)
मतला मात्र वादातीत सुंदर
मतला मात्र वादातीत सुंदर जमलाय
उभी निष्पर्ण झाडागत पुन्हा मी
उभी निष्पर्ण झाडागत पुन्हा मी या नदी काठी
किती वेळा इथे येऊ, तुला विसरावयासाठी?
जियो!!!
जमलिय गझल.
मनापासून आभार मंडळी. बेफीजी..
मनापासून आभार मंडळी.
बेफीजी.. कौतुकासाठी खूप खूप आभार.
वा आवडली
वा आवडली
"सुटूदे हात हातातून पण तू जाण
"सुटूदे हात हातातून पण तू जाण रे सखया
असे संपेल ना नाते, अशा सुटणार ना गाठी" >>> हा सर्वाधिक आवडला.
"कुठे गेली जुनी शाळा, फ़ळा काळा नि बाई त्या?
मला काळा तिथे ने ना धपाटा खावया पाठी" >>> यातील 'काळा' शब्द दोन अर्थाने वापरणे मस्त वाटले.
छान.
छान.
उभी निष्पर्ण झाडागत पुन्हा मी
उभी निष्पर्ण झाडागत पुन्हा मी या नदी काठी
किती वेळा इथे येऊ, तुला विसरावयासाठी?
>>>>>
खल्लास!
सुंदर गझल !
सुंदर गझल !
उभी निष्पर्ण झाल्यागत पुन्हा
उभी निष्पर्ण झाल्यागत पुन्हा मी या नदी काठी
किती वेळा इथे येऊ, तुला विसरावयासाठी?
अप्रतिम.
सुटूदे हात हातातून पण तू जाण रे सखया
असे संपेल ना नाते, अशा सुटणार ना गाठी
आवडला.
उभी निष्पर्ण झाल्यागत>>>>>>
उभी निष्पर्ण झाल्यागत>>>>>> मी असे लिहिले होते ते आठवले ...जिणे निष्पर्ण झाडागत
बाकी मुद्दे वर आलेच आहेत
गझल आवडलीच
उकाकाना आवडलेलेच शेर मलाही सर्वाधिक आवडले
मतलाही छानय
अता कंटाळले तारे नभाला आणि
अता कंटाळले तारे नभाला आणि रात्रीला
म्हणे दिवसाच उगवावे रवीच्या दर्शनासाठी
किती छान कल्पक खयाल.
मतलाही सुंदर.
कवी प्राजू,
तुमच्या अलीकडच्या गझला म्हणजे अल्लडतेचे काठ असलेल्या गांभीर्याने भरलेल्या विहिरीसारख्या होत आहेत.
कळावे
गं स
पुन्हा एकदा मनापासून आभार
पुन्हा एकदा मनापासून आभार मंडळी.
कवी प्राजू,>>????
कवी प्राजू,>>???? ...........ओ गं.स. 'लेडीजलोक्स्'ना ....'कवियत्री' म्हणतात !!!
तुमच्या अलीकडच्या गझला म्हणजे अल्लडतेचे काठ असलेल्या गांभीर्याने भरलेल्या विहिरीसारख्या होत आहेत. >>>>
काय गझलियत आहे या वाक्यात
क्या बात क्या बात वाहवा ...क्याबात !!
कवी वैवकु, जिथे उंदीर तेथे
कवी वैवकु,
जिथे उंदीर तेथे मांजर या न्यायाने प्रत्येक प्रतिसादावर मृत्यूचे थैमान घालू नका. लोकांना बोलू द्यात.
कळावे
गं स
तुम्ही खरेतर गम्मतशीर समीक्षक
तुम्ही खरेतर गम्मतशीर समीक्षक असा आय्डी घ्यायला हवा होता
काठांसोबत अख्खी विहीरदेखील
काठांसोबत अख्खी विहीरदेखील अजूनही अल्लडच आहे.
काठांसोबत अख्खी विहीरदेखील
काठांसोबत अख्खी विहीरदेखील अजूनही अल्लडच आहे.
कवी उमेश,
यांस आपला अनुभव, अंदाज, 'कोल्ह्यासद्राक्षेपणा' की अपरिपक्वता म्हाणावे?
कळावे
गं स
गंभीर समीक्षक, काही गोष्टी
गंभीर समीक्षक, काही गोष्टी गंभीर न होता व समीक्षा न करता ख-या आयडीच्या दृष्टीतून निर्मळ मनाने पाहिल्या तर 'अल्लडपणाचा' अर्थ कळेल असे वाटते.
तुमच्या अलीकडच्या गझला म्हणजे
तुमच्या अलीकडच्या गझला म्हणजे अल्लडतेचे काठ असलेल्या गांभीर्याने भरलेल्या विहिरीसारख्या होत आहेत.>>>
थोडसं स्पष्ट करून सांगाल का?
अत्यंत सुंदर गझल ! अभिनंदन !!
अत्यंत सुंदर गझल ! अभिनंदन !!