तस्वीर तरही

Submitted by UlhasBhide on 14 February, 2013 - 06:00

http://www.maayboli.com/node/21656?page=12#comment-2566955 इथल्या चित्रांनुसार
तस्वीर तरही

जीर्ण वृक्षाच्या तळी मी या किनारी बैसता
स्तब्धता साधून गेली एकट्यांची एकता

शुष्कतेने ग्रासलेला आड एकाकी तरी
पोहर्‍याची साथ त्याला देतसे स्नेहार्द्रता

खिन्नतेने पाहतो मी आज या शाळांकडे
मंदिरे की कारखाने ही मनी संदिग्धता

एकटा मी, एकटी तू, एकटया रस्त्यामधे…………..
आजही त्या आठवांनी का ढळे एकाग्रता

लक्ष डोळे तारकांचे अंबराने रोखले
कृष्ण्कृत्यांना तमाच्या ये न त्याला रोखता

.... उल्हास भिडे (१४-२-२०१३)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीर्ण वृक्षाच्या तळी मी या किनारी बैसता
स्तब्धता साधून गेली एकट्यांची एकता

लक्ष डोळे तारकांचे अंबराने रोखले
कृष्ण्कृत्यांना तमाच्या ये न त्याला रोखता<<<

चांगले व कल्पक शेर आहेत.

तस्वीर तरहीतील सहभागासाठी धन्यवाद व अभिनंदन उल्हासराव Happy

मस्त गझल Happy बेफिजी +१
आणि
<<<एकटा मी, एकटी तू, एकटया रस्त्यामधे…………..
आजही त्या आठवांनी का ढळे एकाग्रता>>> हा शेर खास आवडला Happy

जीर्ण वृक्षाच्या तळी मी या किनारी बैसता
स्तब्धता साधून गेली एकट्यांची एकता >>>>>>>>>
वा! अनिल यांची आठवण झाली!

खिन्नतेने पाहतो मी आज या शाळांकडे
मंदिरे की कारखाने ही मनी संदिग्धता
अगदी सहज आणि आजची स्थिति वर्णनारा शेर..!

आवडली गझल.

छान Happy

लक्ष डोळे तारकांचे अंबराने रोखले
कृष्ण्कृत्यांना तमाच्या ये न त्याला रोखता >>>>>>>>>

सुंदर गज़ल !