हुरहूर....

Submitted by बागेश्री on 17 February, 2013 - 11:06

अनिमिष डोळ्यांत, स्वप्नांची गर्दी...
इतकी दाटी की,
'एक स्वप्न' गेलं
घरंगळून...
नकळत पार गालांच्या पलीकडे,
वस्त्रात जिरून..!

त्या थेंबाचा डाग मात्र
राहिला टिकून..
वस्त्र जीर्ण झाले, विरले
डागाचे असणे राखून...!
'त्या' स्वप्नाला शोध शोधले
होते ते सोबतच
हे न उमजून...

आता,
वर्षागणिक तो डाग मुरतोच आहे,
अस्तित्त्व घट्ट करतोच आहे,
तो जातही नाही-
साकारलेल्या स्वप्नाची ती खूणही नाही..

वाटतं मग
ती केवळ हुरहूर होती,
खूप दाटून आलेली,
घरंगळून गेलेली,
क्षणापुरती दिसून
कायमची टिकून राहिलेली....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

'त्या' स्वप्नाला शोध शोधले
होते ते सोबतच
हे न उमजून...
>>> स्वप्न अवती भोवती असतच, फक्त ते ओळखु येत नाही Happy
छान आहे कविता.

अनिमिष डोळ्यांत, स्वप्नांची गर्दी...
इतकी दाटी की,
'एक स्वप्न' गेलं
घरंगळून...
नकळत पार गालांच्या पलीकडे,
वस्त्रात जिरून..! >>> खल्ल्लास ............. सलाम सलाम सलाम...

छान आशय आणि थोडक्यात छान मांडलाय.

खरंच, अनेकांच्या मनात अशी हुरहुर लावणारी स्वप्नं असतात.
आणि मला वाटतं,
ती प्रत्यक्षात येत नाहीत म्हणूनच चिरस्मरणीय असतात.
असो....
मांडणीही छान वाटली.
फक्त दुसर्‍या खंडातील विरले, झाले, असणे, शोधले इ. शब्द
विरलं, झालं, असणं, शोधलं असे असते तर सहज वाटले असते. .....वैम.
दुसरं म्हणजे अवतरण चिन्हांची गरज नव्हती,
चिन्हांशिवायही अर्थ सहज समजू शकेल असे वाटते. .....वैम.

अनिमिष डोळ्यांत, स्वप्नांची गर्दी...
इतकी दाटी की,
'एक स्वप्न' गेलं
घरंगळून...
नकळत पार गालांच्या पलीकडे,
वस्त्रात जिरून..!

>> व्वाह!!

वाटतं मग
ती केवळ हूरहूर होती,
खूप दाटून आलेली,
घरंगळून गेलेली,
क्षणापुरती दिसून
कायमची टिकून राहिलेली....

>>>
फार सुंदर!! एक प्रकारचा सल, हुरहुर (अगदी परफेक्ट शीर्षक) नेमकेपणे पोचते आहे. शेवटच्या निष्कर्षाशी मला सहमत होणं खूप जड जातंय... अगदी 'नक्को वाटतंय' असा निष्कर्ष काढायला... Happy

पुलेशु.
Happy

खास बागेश्री...
ही कविता माझी आहे... किंबहुना वाचणार्‍या प्रत्येकाचीच आहे... ह्यातच सगळं आलं.
जियो, बागेश्री.

कविता म्हणजे काय हे ठणकावून सांगणारी रचना आहे ही. व्यक्त व्हायला काय गद्याचाही आधार घेता आलच असता कि . पण मोजक्या शब्दात मनातली ही अस्वस्थता, हुरहूर मांडण्याची ही कला अतिशय छान साधली आहे. अभिनंदन !
(तुमच्यात विपू वाचण्याची पद्धत नाही का ? Lol )

थँक्स दाद, विस्मया Happy

विस्मया, रिप्लाय करण्यासाठी प्रतिसाद वर क्लिक केले तर 'पान हरवलेलं दिसतंय' असा मेसेज आला, आणि ते राहून गेलं!