"ते" - ६

Submitted by मुरारी on 11 January, 2013 - 22:57

"ते" -१

"ते" -२

"ते" -३

"ते" -४

"ते" -५

एक तरुण जीव घेऊन पळत होता, आणि त्यांच्या मागे एक विचित्रच जनावर सुटलेलं होतं . आम्हो दोघेही पुढे धावत आल्यावर ते थोड बिचकल , अंधारात ते नक्की काय आहे कळत नव्हत , उंच काटकुळ , फूसफुसण्याचा आवाज येत होता , ते पुढे येण्याचा प्रयत्न करत होतं , तो तरुण आमच्या पायाशी येऊन पडलाच , केशव ने मशाल सोबत आणली होती , कदाचित त्यामुळे ते एका सीमेबाहेर येत नव्हते , आम्हीही पुढे गेलो नाही , हळूहळू ते खाली उतरत त्या गढी निघून गेले , गढी कडे पाठ न करताच मीही त्या तरुणाला मागे खेचत आणले ..त्याचे डोके मी मांडीवर घेतले .. वा.. वा ... वाघ असं बडबडत तो पुन्हा बेशुद्ध झाला. मी घाबरून केशव कडे आणि त्या गढी कडे पाहिलं ,
वरच्या मजल्यावरून गुलाबी प्रकाश दिसत होता.. कित्येक वर्षांनंतर.....
**********

a

आम्ही त्याला उचलून घरी आणला , माझा मुलगा आणि सून तेंव्हा घरी नव्हते , तेंव्हा मधली काही वर्ष सतीश श्रीलंकेत होता . रात्री त्याच्या डोक्यावर घरगुती लेप तयार करून लावला , प्रचंड ताप भरलेला होता , शिवाय अंगावर जखमाही होत्या . ती रात्र तशीच विचित्र गेली . दुसर्यादिवशी खूप उशिराने त्याला जाग आली. मी घरातच होतो , लगेच त्याच्या जवळ आलो , त्याला अजिबात हलता येत नव्हत , एक पाय तर चांगलाच सुजलेला होता. त्याने पडल्या पडल्याच माझे आभार मानले . तापही उतरलेला होता . मग त्याची चौकशी केली , त्याच नाव 'जयदीप' ,मूळ औरंगाबादचा होता, आणि कामाला तो अंतराळ संबंधी कशात तरी काम करतो आणि बंगलोर ला असतो इतके मला समजले. बाकी मग त्याच्याशी गप्पा मारत बसलो , साधारण तिशीचा हसतमुख तरुण होता , त्याची बायको, लहान मुलगा आई बाबा सर्व औरंगाबदेत असायचे. कालचा विषय मी मुद्दामून काढला नाही , त्याला बराच बोलायचं होतं , पण तो हि गप्पच बसला , एक दोन दिवसांनी त्याला हलता फिरता यायला लागलं, घरी पत्र टाकून त्याने खुशाली कळवली .
एका सकाळी तो माझ्यासमोर येऊन बसला , आणि सरळ त्याने त्या रात्रीचा विषय काढला . काका त्या गढीत काय प्रकार चालतात ?तुम्हाला नक्की काहीतरी ठावूक आहे , त्या दिवशी तुम्ही आला नसतात तर माझा जीवही गेला असता. मीही त्याला उलटा प्रश्न केला , माझं हे गाव आहे . मी इथेच असतो , पण तू अचानक काही संबंध नसताना रात्रीचा तिथे काय करत होतास? तुला या गावात ओळखणार कोणी नाही , तुझं काही तसं कोणाकडे काम नाही , अचानक त्या गढीपाशी एकटा काय करत होतास. सुरुवातीला त्याने थातूर मातुर कारण सांगितली, पण तो शेर तर मी सव्वाशेर होतो , मी अजिबात त्याला काहीही सांगत नव्हतो , शेवटी त्याचा नाईलाज झाला , कोणाला काहीही कळू न देण्याचे वचन घेऊन त्याने सांगायला सुरुवात केली , आता मला तो नक्की काय काय म्हणाला ते आठवत नाही , पण ती माहिती एका बैठकीत मात्र त्याने सांगितली नव्हती , अनेक दिवस आम्ही यावर चर्चा करत होतो. असो तेही तुम्हाला मी सांगीनच , सर्व घटना मलाही नीट आठवाव्या लागतील , पण मी जमेल तेवढ्या तपशिलात सांगेन. 'त्यांचा' अंत आता व्हायलाच हवा .. ...
असो उद्या तुम्हाला सकाळी मी ती गढी दाखवेन , दिवसा तिथे तशी काही भीती नसते , हा पण फक्त सूर्यास्तापर्यंतच , एकदा का अंधाराच साम्राज्य तेथे सुरु झालं कि "त्यांना " जाग येते .त्या आधीच तुम्हाला तेथून यावे लागेल. रात्र बरीच झालीये ,आता तुम्ही आराम करा , उद्या सकाळी ७ लाच हजर राहा, पावसाने अंधार लवकर होतो , लवकर कामाला सुरुवात करून, लवकर संपवा. भाऊ आणि गुरव निघून गेले , आणि आम्ही जमिनीला अंग टेकलं. रात्री चक्क शांत झोप लागली.
सकाळी ६ लाच जाग आली. शिर्याला उठवलं ,आत शेगडी होतीच , पाणी तापवून, अंघोळ करून गाडीपाशी गेलो , कॅमेरे, पेपर्स , पेन्स, मेजर टेप्स , लेसर डीस्टन्स कॅलक्युलेटर, त्याचा स्टॅड असं सगळं सामान काढलं, आणि भाऊंना आवाज दिला , सतीश काकांनी आत बोलावलं, चहा पोहे झाले , जपून यायला सांगितलं . तेवढ्यात भाऊ पूजा आटोपून बाहेर आले . निघालो . काल जे ऐकलेलं होतं, शिऱ्या आणि माझी चांगलीच तंतरलेली होती , दिवसाहि तिथे जायला मन कचरत होतं, पण शेवटी नोकरीचा प्रश्न होता, दोन दिवसाआड कामाचे रिपोर्ट पोचवण गरजेच होतंच. सतीश काकांनी जपून राह्यला सांगितलं . सड्यावर आलो , गार वारा होता, पण पाऊस नव्हता. उतारावर गावात माजलेलं होतं, पण त्यापुढे अचानक वेगळीच झाडं खुरटी .. पिवळट माती , दगड . त्यापुढे ती गढी.. जळकी . भाऊ म्हणाले मी थोडावेळ इथे थांबतो .. तुम्ही जाऊन या आता काही भीती नाही , जपून राहा पण . हो म्हणून आमच सामान उचलून आम्ही उतारावरून खाली यायला लागलो . आणि तो बदल जाणवला .. विचित्र वास येत होता. घशात खवखवायला लागलं.. शिऱ्या पण थोडा टेन्स होता. पण मनात माहिती होतं कि जोपर्यंत दिवसाचा उजेड आहे तोपर्यंत आपल्याला भीती नाही . तसेच पुढे आलो . रात्री तुफान पाउस पडल्याने ओल होती , आमचे पाय सारखे चिखलात घसरत होते , कसे बसे खाली आलो . आणि शेवटी त्या गढी समोर आलोच, आता विचित्र वेली भयानक आकारात गढीवर माजलेल्या होत्या , बरासचा दर्शनी भाग जाळून खाक झालेला होता, खिडक्या कधीच तुटून गेलेल्या होत्या , नुसती भगदाड पडलेली होती , आम्ही हळू हळू गढी भोवती फिरायला लागलो , मागची बाजू बर्यापैकी शाबूत होती , प्रचंड अशी ती वास्तू होती , शेकड्याने खोल्या असाव्यात, असा काही पूर्व इतिहास नसता, तर आरेकरांची निवड अतिशय योग्य होती , समुद्राचा एक पट्टा इकडे आत आलेला होता . आत्ता कदाचित ओहोटी असेल , म्हणून लाटा खूप दूरवर दिसत होत्या , तिथपर्यंत फक्त वाळूच वाळू , सुरेखच जागा होती. आम्ही सर्वकडे नजर टाकीत परत समोर आलो , ते दगडी कारंज तिथेच होतं, आणि त्यात वाढलेल्या त्या मुळ्याही.. इतक्या वर्षांनंतरही त्या तशाच होत्या ,

शिऱ्या , भाऊंची गोष्ट खोटी आहेस म्हणत होतास ना , निदान तपशील तरी सर्व खरेच आहेत . मी कारंज्याकडे बघत म्हणालो
शिऱ्या काही बोललाच नाही . उगाच इकडे तिकडे फिरत बसला , मग आम्ही एका झाडाखाली थांबलो .. विचित्रच झाड होतं .. लिबलिबीत . एखादी जेली असावी तसं खोडं होतं .. गढूळ रंगाची पान ..तीही लांब लांब . अनेक पांढर्या बारीक फांद्यांनी वर वर जात एक विचित्र आकार घेतलेला होता.ते इथल्या कणाकणात आहेत , हे भाऊंच वाक्य आठवलं आणि अंगावर काटा आला . आजूबाजूला पाहिलं शांतता होती , इथून बाहेरच जगच दिसत नव्हतं, सर्व कडून उंचावटा, सड्यावर आमची कार दिसत होती , एक दोन चुकार पक्षी आकाशात उडत होते , बाकी शुकशुकाट होता, ढग दाटून आलेले होते ,
अजूनपर्यंत तरी पाउस नव्हता. मला एक जाणवलं पावसात, कोकणात , तेही गवतात वेगवेगळे कीटक , किडे ओरडत असतात , वेगवेगळे पक्षी असतात जिवंतपणा असतो . पण इथे कसलाच आवाज नव्हता, जिवंतपणाच एकही लक्षण नव्हत , नुसतीच भयाण शांतता .. जणू काही आपण वेगळ्याच जगात आहोत. मन भरकटल कि भरकटतच जात.
आम्ही कामावर लक्ष केंद्रित केलं . बोर्डावर A3 लावला , पेन्स भर काढली . आणि लेसर मशीन ने डीस्टन्स मोजायला लागलो . टेकडीच्या उताराने आम्ही प्लास्टिक टार्गेट उभी केली , टार्गेट उभी करण्यातच दुपार झाली . आमच्याकडे आधी असलेल्या जागेच्या नकाशाशी आमचा नवा नकाशा पडताळून बघयला लागलो . प्रत्येक वेळी शिऱ्या टार्गेट घेऊन उभा राहायचा , मी लेसर त्याच्यावर हिट केला कि बरोबर अंतर समजायचं, असला खेळ खेळत 3 वाजले , मधेच सतीश काका बघून गेले . आजचं आमचं जेवण म्हणजे बिस्कीट चे पुडे आणि वेफर , सोबतीला थर्मास मधला चहा . आज बर्यापैकी काम झालं. कामाच्या धांदलीत असलो कि मी शिऱ्या अख्या जगाला विसरतो , मग हवं तर अगदी स्मशानात रात्री १२ ला जाऊन सुद्धा आम्ही काम करत बसू . पण जेंव्हा आजचा दिवस संपत आला, तसा तो वास तिखट व्हायला लागला. शिर्याला पण ते जाणवलं , त्याला जेवल्यानंतर सिगरेट ओढायची सवय . त्याने सिगरेट काढून लायटर पेटवला , पण लायटर पेटायच नावच घेत नव्हतं. ऑ ? हि काय भानगड म्हणायची .. गॅस तर होता, वारा नव्हता अजिबात .. शेवटी कंटाळून त्याने तो नाद सोडला ,
पण अचानक म्हणाला , अरे भाऊ आलेले तेंव्हा त्यांच्या पण मशाली विझलेल्या इथे .. मायला इथे आग पेटत नाही काय ? कि पेटू देत नाहीत ... "ते"..
त्याच बोलणं ऐकून मी हि ताठ झालो.. लायटर तुटायची वेळ आली . पण आग काही लागली नाही . तेवढ्यात वरतून भाऊ हातवारे करताना दिसले, आम्ही हि त्यांना येतोय म्हणून खुणेने सांगितले, पटापट समान आवरले आणि निघालो, घड्याळाची वेळ ४ दाखवत होती , डोळे प्रचंड चुरचुरत होते. वर आल्यावर एकदम बर वाटलं. एकदम मोकळ .
पोरांनो उशीर करत जाऊ नका , मला सारखं वर येणं झेपत नाही , तुमची काळजी वाटली म्हणून कसाबसा आलो इथे , साडेपाच सहानंतर पूर्ण अंधार पडतो हल्ली, बघा पाउस पण सुरु झाला. चला खाली चला.आम्ही खाली आलो , आमच्या नवीन घरात जाऊन फ्रेश झालो, प्रचंड भूक लागलेली होती , कधी एकदा जेवतोय अस झालेलं , भाऊंच्या घरातून फोन करून वाय झेड ला रिपोर्ट दिला , तो म्हणाला उद्या जेवढ काम झालं असेल तेवढ स्कॅन करून पाठवा , आता त्यासाठी तालुक्याला जाव लागणार . आउटर टेरेन आम्ही मोजलेल होतं, उद्या सकाळपर्यंत पुढील भागाचा प्लान आमचा तयार झाला असता. चला पहिला दिवस तरी धड गेला , काही न होता. पण उत्सुकता अजून ताणली गेलेली होती. जयदीप बद्दलची माहिती , भाऊ आज सांगणार होते. रात्री आरती आटपून भाऊ वर आले , तेंव्हा साधारण ९ वाजलेले होते, गुरव आजोबा पण आले , आज सतीश काका सोबत होते .
भाउंनी सुरुवात केली , माझ्या आणि त्याच्यात अगदी वडील मुलासारखं नातं तयार झालं , ह्या सतीश ने कधी त्याला पहिलाच नाही , कारण आमचा जेमतेम सताठ महिन्यांचा सहवास, पत्रातून माझी खुशाली सतीशला कळवायचो. त्यालाही मला सोबत आहे हे पाहून आनंद व्हायचा .तो येथे येईपर्यंत बिचारा जयदीप कायमचा निघून गेलेला होता. भाऊंनी मधेच डोळे टिपले .
तर त्याने मला हळू हळू त्याला त्या गढी म्हणजे त्या जागेबद्दल असलेली माहिती सांगायला सुरुवात केली . भारत सरकारच्या अंतराळ विषयीच्या इस्त्रो का कुठल्या मोठ्या कंपनीत तो बंगळुरात कामाला होता. तेंव्हा मला तो सांगायचा चंद्रावर माणसे पाठवायची चढाओढ त्यावेळी विलायतेत लागलेली होती , रशिया आणि आपली कंपनी पण एकत्र येऊन संशोधन करतेय अस म्हणायचा. एकदा त्यांच्या उपकरणांवर विचित्र संदेश यायला लागले. पण ते नक्की कशाबद्दल आहेत ते समजत नव्हत , एक आठवडा ते संदेश सतत येत होते , आणि अचानक ते येणे बंद झाले. यानंतर तेंव्हा उपग्रह नव्यानेच अवकाशात सोडले गेले होते , त्यांनी देशातल्या विविध भागांची काही छायाचित्र पाठवली.. तेथून ती फ्रिक्वन्सी मध्ये मध्ये परावर्तीत व्हायची . मग अशा जागी त्यांच्या कंपनीने लोक पाठवले , आणि इतक्यात काही बदल जाणवला का विचारले.
आश्चर्य म्हणजे ज्या ज्या जागांवरून ती माहिती मिळालेली होती, त्या जागा खूप आधीपासून अनैसर्गिक हालचालींसाठी प्रसिद्ध होत्या , आणि बहुतेक सर्व समुद्रालगत होत्या. त्यातलीच हि देखील एक जागा होती . सर्व जागांमध्ये साध्यर्म होते, सर्व जागा ओसाड होत्या , मानवी वस्ती तिथे नव्हती , तिथली खनिज संपत्ती , झाडं सर्वच कधीही न पाहिलेले . जगात इतरही ठिकाणी अशा काही जागा आढळून आल्या . अतिशय गुप्त पातळीवर हि माहिती जमवणे सुरु होते , कुठल्याही परिस्थितीत सामान्य जनतेला या गोष्टींबद्दल माहिती आत्ताच देणे उचित नव्हते, कारण आधीच बर्याच अंध:श्रद्धा, दंतकथा प्रचलित होत्या, त्यात अजून भर पडली असती. शिवाय नक्की हे कुठून आलेत त्यांचा हेतू काय , त्यांची शक्ती किती , कशाचीच माहिती नव्हती , साधे दृष्टीसही पडलेले नव्हते कोणाच्या अजूनपर्यंत. बर्याच ठिकाणी दंतकथांमध्ये जागांचा उल्लेख हजार वर्षांपूर्वीचाही मिळाला, आणि त्या सर्वच कथा अगदीच रंजक नव्हत्या , कारण आफ्रिकेतील काही जुनाट गुहांमध्ये समुद्रालगत काही आकाशातून पडतंय , विचित्र झाड , काळे आकार , वेगवेगळे दगड गोटे अशी निरनिराळी भित्तीचित्र सापडली. म्हणजे त्यांचा उगम हा थेट आदिम काळात जात होता, फक्त आत्ता त्याचा नव्याने शोध लागलेला होता. अनेक शास्त्रज्ञ काळजीत पडले.
कारण हा सरळ सरळ पृथ्वीवर पर ग्रहावरील शक्तीचा हल्लाच होता. यावर प्रचंड अभ्यास व्हायला लागला. अनेक सिद्धांत मांडले गेले. ह्याचाच एक भाग म्हणून जयदीप येथे आलेला होता. तो आधीही गुपचूप येऊन गेलेला होता , पण त्याला विशेष काही जाणवले नव्हते, नेमका त्या दिवशी त्याला त्या गढीत उशीर झाला , आणि सूर्यास्त होऊन गेला , तुला सांगितलं आहेच एकदा सूर्य डोळ्याआड गेला , त्यांच्या भागातल शेवटच सूर्यकिरण समुद्रात परतल कि ते जागे होतात . आणि हा त्यांच्या तावडीत सापडला ,ते जनावर जे आम्हाला दिसलं , तो कित्येक वर्षांपूर्वी मी उल्लेख केलेला वाघ होता. बिचारा काळाच्या ओघात तो मरण पावलेला असेल , पण त्याच्या कलेवराला ते अजूनही आपल्या सत्तेने नाचवत होते, त्याच्याशी अभद्र खेळ खेळत होते. जयदीप ने बरीच माहिती जमवलेली होती , माझ्याकडे ते जुने कागद असतील , त्याच्या नोंदी, आमची संभाषण, बरंच काही काही , आम्हाला आलेला अनुभव ऐकून तर त्याला बरीच नवीन माहिती मिळाली.ती सर्व नोंद आहेच. तूर्तास आज एवढे पुरे! उशीर झालेला आहे. झोपा आता , एवढे बोलून, भाऊ , सतीश काका, आणि गुरव यांनी आमचा निरोप घेतला . बाप्परे... ऐकाव ते नवल या तत्वावर सध्या दिवस जात होते. पण आता या सगळ्यात एक थरार वाटत होता.
जाग आली तीच पावसाने .. आज तर काहीच दिसत नव्हत. मुसळधार पाउस बरसत होता. आम्ही उगाच पडून राहिलो . शिऱ्या घोरत पडलेला होता. चायला या गाढवाच्या जागी आज तनया हवी होती , इथे आल्यानंतर पहिल्यांदाच तिची आठवण आली. मी उठून आवरलं. आज ९ ला गढीपाशी पोचलो. बरच निसरड होत , जपून काम सुरु होतं , पाउस मेहेरबान होता , कामाच्या वेळी शहाण्या मुलासारखा गप बाजूला बसून असायचा. आज वाय्झेड ला रिपोर्टिंग करायचंच होतं. २ ला आम्ही वर आलो. काकूंकडे जेवलो. जेवल्यानंतर तालुक्याला जायचं होतं, पण दोघांनी जायची गरज नव्हती. मी शिरीष ला म्हणालो , तू जा काम उरकून ये, एखाद सायबर नक्की मिळेल, नाहीच मिळाल तर सरळ क्यामेराने प्लान चे फोटो काढ आणि दे पाठवून. मी थोडस काम आहे ते खाली उरकतो आणि समान घेऊन वर येतो .

'पशा एकट्याने जाशील ना .. *ड फाटणार नाय ना , बघ हा .. फाटली तर मी नाय शिवून देणार.. ह्या ह्या ..शिरीष्पंत नॉर्मल मूड ला आले
घाबरू नकोस.. नाही फाटली तरी मी काम एकट्याने करणार नाहीये , आपलं बराच समान खाली आहे ते घेऊन वर येऊन मस्त झोप काढेन ..
हा हा . बघू बघू .. म्हणत शिरीष गाडीत बसला , काका काकूंना तालुक्याला काम होत म्हणून ते सोबत आणि भाऊंना सुद्धा पोष्टाच काहीतरी काम होतं, त्यामुळे तेही असे सर्व गाडीतून निघाले, मी एकटा त्यामुळे मला दहादा बजावून गेले.
शिरीष म्हणाला पण येऊ का समान आणायला .. पण म्हटलं नको.. मी आणेन ते ( चायला एवढाही फट्टू नाहीये मी )
ते निघून गेल्यावर , मी परत उतरायला लागलो, काम करण शक्यच नव्हतं, चायला एकट्याने कोण मरणार या भयाण जागेत, एकदाच समान घ्यायचं नि कलटी मारायची. मी त्या झाडापाशी आलो , सर्व समान गोळा केलं , पिशवीत भरलं. घड्याळात पाहिलं ४ वाजत आलेले होते , चला निघूया आता , लेसर मशीन उचलल आणि चालायला लागलो , मध्ये मध्ये आजूबाजूला नजर होतीच , एकट्याला आता चांगलीच भीती वाटत होती , चांगलंच अंधारल होतं. अचानक आभाळात वीज कडाडली ,आणि मी जास्तच घाबरलो .जवळपास पळायलाच लागलो. आता हे कारंज दिसतंय ते ओलांडल कि जमीन , ती ओलांडली कि चढ, आणि आपण सुरक्षित , असाच विचार करून पळत होतो , तेवढ्यात फरशीवरच्या शेवाळावरून पाय घसरला , आणि मी सणसणीत आपटलो ,
डोक कारंज्याच्या कठड्यावर आपटलं.. क्षणात रक्ताची चिळकांडी उडाली ..तोंडात कडूशार चव पसरली , मी सावरायचा प्रयत्न करत होतो ,
पण .. पण हळूहळू समोरचा देखावा अस्पष्ट व्हायला लागला

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अलभ्य लाभ

५ व्या भागाची प्रतिक्रिया लिहायला आत शीरलो तर ६ वा भाग दिसला

आता एकदम प्रतिक्रिया देईन

आता मला तो नक्की काय काय म्हणेल ते आठवत नाही>>> २ र्‍या पॅरा मधली सातवी ओळ..इथे तो नक्की काय काय म्हणाला ते आठवत नाही" असं हवं ना?

बाकी मस्तंच झालाय भाग! सूपर्ब स्पीड घेतेय कथा..आता नका थांबू!

@भानूप्रिया : हो टायपो झालाय.. धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल
सुधारणा केलेली आहे Happy

छान लिहिताय पण आता जरा लांबण लागते आहे असं वाटलं.

गढीतल्या वातावरणाचं वर्णन परत परत होतयं आणि जयदीपची कथा पुढे सरकतच नाहिये. तुमचं कथानक छान आहे पण अजून थोडे खुलासे केले नाहित तर कथेतली उत्सुकता कमी होत जाईल.
(हे माझं वैयक्तिक मत. टिका करायचा उद्देश नाही)

पु.ले.शु.

चौकट राजा.

यार खूप उशीर लावतोस तू पुढचा भाग टाकायला ........वाट बघायला कंटाळा येतो भाऊ.

कथा जर सुचत नसेल तर ल्याहला घ्यायचीच कशाला?

यार खूप उशीर लावतोस तू पुढचा भाग टाकायला ........वाट बघायला कंटाळा येतो भाऊ.

कथा जर सुचत नसेल तर ल्याहला घ्यायचीच कशाला?