Submitted by गुंजारव on 3 February, 2013 - 13:46
मायबोलीवरील सर्व मराठी रसिकांना सादर प्रणाम!
गुंजारव स्टुडियोमद्ध्ये अम्ही दर महिन्याला एक नवीन गाणं तयार करतो..
हा आमचा उपक्रम आपल्याला नक्की आवडेल अशी आमची आशा आहे.
https://soundcloud.com/gunjaravstudio
औदुंबर
ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेउन ;
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन.
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे ;
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे ;
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर ;
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर.
- बालकवी
(त्र्यंबक बापूजी ठोंबरे, १८९०-१९१८)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
याहून गुंजारवचे टायटल साँग
याहून गुंजारवचे टायटल साँग अतीशय सुंदर झाले आहे. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !!
आवडले ! खुप सार्या शुभेच्छा
आवडले ! खुप सार्या शुभेच्छा !
धन्यवाद पियु परीआणि
धन्यवाद पियु परीआणि श्री!!
आमचं पुढचं गाणं २१ तारखेला प्रकाशित होइल..कवी माधव ज्यूलियन यांचं "आमुचे घर छान!"..
आणि मागच्या वर्षी केलेल्या १० इंग्रजी गाण्यांच्या संग्रहाचं ( "I think of you") ऑनलाईन प्रकाशनही लवकरच करत आहोत.
आमचं facebook page जरूर लाईक करा!
https://www.facebook.com/#!/gunjaravstudio.music
चांगला उपक्रम. ऐकली. छान
चांगला उपक्रम.
ऐकली. छान चाल लावली. आवडली.
यावरून माझी "हताश औदुंबर" कविता आठवली.
http://www.baliraja.com/node/136
"पैल तीरावर पत्र घरावर,
"पैल तीरावर पत्र घरावर, तुळशीचे ठेवून
बेत शिजविला,देह निजविला, काळघुटी घेऊन"
दाहक पण सुंदर!
मागच्या वर्षी केलेली
मागच्या वर्षी केलेली ग्रेसांची "ऊर्मिला" ही कविता...
http://www.youtube.com/watch?v=iT35CUNRhVc
या महिन्याचं गाणं... माधव
या महिन्याचं गाणं...
माधव ज्यूलियन यांचं "आमुचे घर छान!"
ऐका आणि प्रतिसाद कळवा..
http://gunjaravstudio.com/
औदुंबर, एक सुंदर कविता. चाल
औदुंबर, एक सुंदर कविता.
चाल आवडली.
चांगला उपक्रम.
अतिशय सु,न्दर
अतिशय सु,न्दर
सुंदर
सुंदर
आवडली.. खुप छान..
आवडली.. खुप छान..
धन्यवाद समीर, रेव्यु,
धन्यवाद समीर, रेव्यु, अश्विनी, नीत्सुश! आमचं फेसबुक वरचं पान नक्की लाईक करा..
www.facebook.com/gunjaravstudio.music
जाहिरात ही एक कला आहे
जाहिरात ही एक कला आहे म्हणे
तुम्हाला ती छान जमलीये
विशेषतः इथे मायबोली ह्या संकेतस्थळाची निवड केलीत यातच सर्वकाही आले
खूप खूप शुभेच्छा
~वैवकु
इथे उद्देश "जहिरात" करण्याचा
इथे उद्देश "जहिरात" करण्याचा नाही
मराठी गाण्यांसाठी श्रोते शोधण्याचा आहे.