'रसम'म क्रिटिकल कंडिशनम

Submitted by अमेय२८०८०७ on 13 February, 2013 - 13:23

काय पूर्वजन्माचे धागे असतील सांगता येत नाही पण 'रसम' या प्रकारावर जे प्रथमदर्शनी प्रेम बसले ते कायमचे टिकून राहिले आहे. खरेतर ओळख जरा उशीराचीच. कॉलेजात असताना एक हरी नावाचा तमिळ मित्र वर्गात आला. जवळच रहात असल्याने अभ्यासासाठी त्याच्या घरी जाणे येणे सुरू झाले. त्याच्याघरी एका मडके सदृश भांड्यात हा पदार्थ भरून ठेवलेला असे. इतका आवडला की मी त्यांच्या खाण्याच्या वेळापर्यंत मुद्दाम रेंगाळू लागलो. लग्न झाल्यावर आणखी एका दाक्षिणात्य सहकार्‍याकडून मुद्दाम शिकून घेतली. आता आठवड्याभरात एकदातरी रसम खाल्ले नाही तर 'क्रिटिकल कंडिशनम' होण्याची वेळ येते. त्या रसमची ही रेसिपी.

साहित्यः

(अ)

तूरडाळीचे शिजवल्यावरचे पाणी ४ वाट्या
चिंचेचा कोळ २ छोटे चमचे (अति आंबट होणार नाही याची काळजी घ्यावी. माफक चिंचेची चव लागावी)
हिंग, हळद पाव चमचा
कढीलिंब ७-८ पाने (डहाळ्या नव्हे)
कोथिंबीर ५० ग्रॅम बारीक चिरून
३ मोठे टोमॅटो, उकडून, साली काढून, मॅश करून घ्या.
एक मध्यम तिखट हिरवी मिरची
मीठ चवीनुसार

(ब)

दीड चमचा जिरे, ७-८ लसूण पाकळ्या, ५-६ मिरी दाणे, अर्धा ईंच आले यांची बारीक पेस्ट करून घ्या

(क) फोडणीसाठी

एक चमचा उडीद डाळ, २ मेथी दाणे, दोन लाल मिरच्या

कृती:

(अ) व (ब) मधले सर्व पदार्थ एकत्र करा व वीस मिनिटे उकळा. पाहिजे तेवढे आणखी पाणी घाला. पाण्याचा अंदाज महत्त्वाचा नाहीतर अगदीच चव जायची. आणखी एक उकळी आली की बेसिक रसम तयार झाले.

उकळून एकजीव झाल्यावर फोडणीसाहित्य वापरून तेलाची चरचरीत फोडणी करा, वरून रसम मधे घाला.

असे रसम आणखी थोडी कोथिंबीर घालून सजवता येईल. गरम गरम खा शिवाय मुरल्यावर दुसर्‍या दिवशीही छान लागते.

ता.क. या रसममधे बाजारी मसाला घालण्याची आवश्यकता नाही तरीही आवडीसाठी एखादा मोठा चमचा घातल्यास चालेल. माफकच आंबटपणा आणायचा आहे, नाहीतर चव बिघडते. मिरी, मिरच्या यांचा तिखटपणाही अति असू नये यानुसार मात्रा ठरवावी.

हिंग, कढीलिंब फोडणीत घालू नयेत, एरवी फोडणीसाठीच जन्म पावलेले हे जिन्नस रसममध्ये मात्र पाण्यात उकळूनच चांगले लागतात.

दाक्षिणात्य लोक चिंचे ऐवजी लिंबाचा रस, ताक, डाळीच्या ऐवजी नॉन वेज स्टॉक वगैरे विविधता आणतात पण मला वरचाच प्रकार आवडतो

पहिला भात सांबार बरोबर, दुसरा रसमशी आणि मागचा भात रसम + दही /ताक याबरोबर खाण्याची पद्धत आहे.

a2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला रस्सम लय म्हण्जे लैच आवडतं
चेन्नै ला पाहिल्यांदा टेस्ट केलं होतं आणि एकदम आवडलं,
आता करुन बघतो.

मला अजिबात्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त आवडत नाही रस्सम
केरळला खाल्लेलं Sad
आजारी पडलेले ते खाऊन मी चक्क Sad

मस्त! मला आवडतं रस्सम.
कढीलिंब ७-८ पाने (डहाळ्या नव्हे) >> Lol
कोथिंबीर ५० ग्रॅम बारीक चिरून >> हे पण भारी आहे Happy

गेल्या आठवडाभर चेन्नईमधे होतो, पहिले पाच दिवस कॅन्टीनमधे दुपारचे जेवण रस्समवर भागवले, पण सहाव्या दिवशी एका कर्मचाय्राने मला सांबार आणि रस्सम मधे कन्फ्युज केले आणि तो दिवस रस्स्म साठी चुकला. Happy

रस्सम मी एकदाच खाल्लेलं. जाम सर्दी झालेली, हापिसातल्या मैत्रिणीने चॅलेंज दिलं की रस्सम प्यायल्यावर सर्दी कमी होईल. आणि खरंच झाली. Happy

मस्त रेसिपी. मलाही रसम खुप आवडते. पण रसमशी ओळख खुप उशीरा झाली. एकदा एका तमिळ मैत्रिणीला घरी जेवायला बोलावले होते. ती काय प्रकारचे पदार्थ खाईल याची मला सुतराम कल्पना नव्हती, तिला विचारुन घ्यावे हेही सुचले नव्हते. तिने थोडा डाळभात खाल्यानंतर 'आता रसम-भात दे' म्हणुन फर्माईश केली. मी 'रसम म्हणजे काय' ह्या प्रश्नात आणि ती 'हिला साधे रसमही माहित नाही' ह्या प्रश्नात.. Happy

आमच्याकडे सेल्व्हीकृपेने आठवड्यातून तीनदा रस्सम असतंच. Happy मला ते भातासोबत खाण्याऐवजी नुस्तं प्यायला जास्त आवडतं. वरच्या कृतीमधे सेल्व्हीची व्हेरीएशन- ती आलं-लसूण अजिबात घालत नाही. जिरेमिर्‍याची भरड पूड करून घालते. लाल तिखट रंग येण्याइतपत पण खरा चटका असतो तो मिरीचा. टोमॅटो उकडून घालण्याऐवजी रस्सममधेच मोठे तुकडे करून घालते, नंतर ते शिजले की बाहेर काढून एकदा मिक्सीमधे फिरवून घेते आणि मग ती प्युरी रस्सममधे घालते.

चिंचेऐवजी लिंबाचा रस घालायचा असेल तर रस्सम चांगलं उकळून घेऊन मग लिंबाचा रस घालायचा. आणी घातल्यावर मग उकळायचं नाही. मंगलोरला असताना आमच्या शेजारच्या आंटी चिंच न घालता कोकमं घालायच्या, ते रस्सम अफाट लागायचं.

मी MTR चा रस्सम मसाला आणला आहे. अजुन मुहुर्त लागला नाही. पण समजा या पध्दतीने केले तर मसाला कधी आणी किती घालायचा ?

छान लेख.
मी पण तामिळ मैत्रिणीच्या घरीच पहिल्यांदा चाखले. मग माझ्यासाठी अननस, त्यांचे एक वेगळे संत्रे वगैरे घालून वेगवेगळे प्रकार पण तिने केले. ( पण मला भातावर नाही आवडत.)
सध्या काही हॉटेलमधे रसम-वडा हा चवदार प्रकार पण मिळायला लागला आहे.

वर्षा_म :

तशी रसम मसाला घालण्याची जरूरी नाही पण घालायचा असेल तर एक उकळी आल्यावर घालावा.

सर्वाना धन्यवाद, सुरेख प्रतिसादाबद्दल!

मे काल बनवल सुद्धा......कलच सांगणार होते पण रस्सम खाण्यात इतकि रमून गेले......आहा काय चव होति....
खरच खुप खुप धन्यवाद...फोटो शेर करत आहे Happy
IMG_20130213_174858.jpgIMG_20130213_174924.jpg

ही सुद्धा रेसिपी मस्त .. Happy

गोपिका, तुम्ही तुमच्या रस्सम मध्ये वांगं सदृश काही घातलं आहे का?

सशल - ते वांगं नहिए...फोडणितलि लाल मिरचि आहे :).....बाकि आलं लसुण पेस्ट न करता नुसते वाटुन घातले, पेस्ट करणं मि शक्यतो टाळतेच Happy

Pages