Submitted by UlhasBhide on 14 February, 2013 - 06:00
http://www.maayboli.com/node/21656?page=12#comment-2566955 इथल्या चित्रांनुसार
तस्वीर तरही
जीर्ण वृक्षाच्या तळी मी या किनारी बैसता
स्तब्धता साधून गेली एकट्यांची एकता
शुष्कतेने ग्रासलेला आड एकाकी तरी
पोहर्याची साथ त्याला देतसे स्नेहार्द्रता
खिन्नतेने पाहतो मी आज या शाळांकडे
मंदिरे की कारखाने ही मनी संदिग्धता
एकटा मी, एकटी तू, एकटया रस्त्यामधे…………..
आजही त्या आठवांनी का ढळे एकाग्रता
लक्ष डोळे तारकांचे अंबराने रोखले
कृष्ण्कृत्यांना तमाच्या ये न त्याला रोखता
.... उल्हास भिडे (१४-२-२०१३)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जीर्ण वृक्षाच्या तळी मी या
जीर्ण वृक्षाच्या तळी मी या किनारी बैसता
स्तब्धता साधून गेली एकट्यांची एकता
लक्ष डोळे तारकांचे अंबराने रोखले
कृष्ण्कृत्यांना तमाच्या ये न त्याला रोखता<<<
चांगले व कल्पक शेर आहेत.
तस्वीर तरहीतील सहभागासाठी धन्यवाद व अभिनंदन उल्हासराव
मस्त गझल बेफिजी
मस्त गझल बेफिजी +१
आणि
<<<एकटा मी, एकटी तू, एकटया रस्त्यामधे…………..
आजही त्या आठवांनी का ढळे एकाग्रता>>> हा शेर खास आवडला
क्य बात है!!!! मस्त खयाल.
क्य बात है!!!! मस्त खयाल.
सुंदर ... खयाल आवडले.. गझलही.
सुंदर ... खयाल आवडले.. गझलही.
सुरेख.
सुरेख.
सर्व अप्रतिम , १,३,५
सर्व अप्रतिम , १,३,५
जीर्ण वृक्षाच्या तळी मी या
जीर्ण वृक्षाच्या तळी मी या किनारी बैसता
स्तब्धता साधून गेली एकट्यांची एकता >>>>>>>>>
वा! अनिल यांची आठवण झाली!
वा उकाका आवडली तरही मतला
वा उकाका
आवडली तरही
मतला सर्वाधिक आवडला
खिन्नतेने पाहतो मी आज या
खिन्नतेने पाहतो मी आज या शाळांकडे
मंदिरे की कारखाने ही मनी संदिग्धता
मस्त..
सुंदर
सुंदर
खिन्नतेने पाहतो मी आज या
खिन्नतेने पाहतो मी आज या शाळांकडे
मंदिरे की कारखाने ही मनी संदिग्धता
अगदी सहज आणि आजची स्थिति वर्णनारा शेर..!
आवडली गझल.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
छान
छान
काका, स्नेहार्द्रतेसारखा अवघड
काका, स्नेहार्द्रतेसारखा अवघड शब्द छानच गोवलात शेरात...
मस्त गज़ल
>>स्तब्धता साधून गेली
>>स्तब्धता साधून गेली एकट्यांची एकता
nice concept!
जीर्ण वृक्षाच्या तळी मी या
जीर्ण वृक्षाच्या तळी मी या किनारी बैसता
स्तब्धता साधून गेली एकट्यांची एकता
सुंदर !
लक्ष डोळे तारकांचे अंबराने
लक्ष डोळे तारकांचे अंबराने रोखले
कृष्ण्कृत्यांना तमाच्या ये न त्याला रोखता >>>>>>>>>
सुंदर गज़ल !