यु मस्ट डाय!

Submitted by _सचिन_ on 12 February, 2013 - 08:30

२२ वर्षाच्या प्रेगी२३००८-० ने शटल वर पाउल ठेवल आणि बहुतेक नजरा त्याच्याकडे वळल्या. काही परत आपल्या कामात मग्न झाल्या तर काही त्याच्यावरच रेंगाळत राहील्या. साडेसहा फुटी, देखण्या प्रेगी ला हे अर्थातच नवीन नव्हत. मंद हसत तो त्याच्या जागेवर स्थानापन्न झाला आणि त्याचा आय-टॉप चालु करुन डेटा न्याहाळु लागला. अर्ध्या तासापुर्वी लंडन मधे पटवलेल्या प्रपोज्ड क्लायन्ट ला द्यायच्या प्रपोझल साठी त्याने त्याचा क्लोन प्रेगी२३००८-१ ला ओनलाइन इन्स्ट्र्कशन देउन टाकल्या आणि खिडकी उघडुन नेहमी प्रमाणे सुर्यास्त बघु लागला. पण आज का कोणासठाउक त्याला सुर्य एकदमच अंधुक दिसत होता.
प्रेगी गेल्या ३४ वर्षांपासुन इन्डो-मार्स डेव्हलपर्स साठी मार्केटींग ऑफीसर म्हणुन काम करत होता. आज त्याला मार्स च्या साउथ विंग डेव्हलपमेंट हेड म्हणुन अपोइंट करण्यात आल होत आणि त्यासाठीच त्याची मार्सवारी चालली होती. शटल सुटण्याची अनाउन्स्मेन्ट झाली आणि नेहमी प्रमाणे प्रेगी थोडा नर्वस झाला. सवयी प्रमाणे त्याने आय्-टॉप वर बॉडी मीटर चालु केले आणि त्याच्या डॅशबॉर्डवर शरीराचा एकेक पार्टचे रीडींग तपासु लागला. ब्लॅडरमीटर नॉर्मल होते म्हणजे आत्ता लगेच खायची, प्यायची गरज लागणार नव्हती, बीपी थोडासा हाय दाखवत होता पण नॉर्मल रेंज मधेच होता. फॅट्स, कॅलरीज, टेम्परेचर सगळच नॉर्मल होत. उजव्या कोपर्यातला आकडा बॉडी एज २२ दाखवत होता.
हलकासा झटका देउन ते शटल ८७ डीग्री च्या कोनातुन मंगळा कडे झेपावल तेव्हा आकाशात सुर्याचा नामोनिशान नव्हता. प्रेगी सारखा एखाद्-दुसरा अपवाद सोडला तर सगळ स्पेस-शटल मायग्रेंट्स नी पुर्ण भरल होत. थोडासा रीलॅक्स झालेल्या प्रेगीने नेहमी प्रमाणे त्याचा बॉडीमीटर मिनिमाइझ करुन अ‍ॅट्रक्टोमीटर चालु केला आणि मीटर वर त्याला लगेच शटल मधलेच ६ स्ट्रॉंग लाइक्स सिग्नल मिळाले. त्यातले ३ फीमेल आयडी दाखवत होता तर २ मेल्स. एकाने त्याची जेंडर आयडेंडीटी डिसक्लोज नव्हती केली. गेल्या काही वर्षांपासुन स्ट्रेट असलेल्या प्रेगीने ३ फीमेल्स सिग्नल वरच कॉन्सन्ट्रेट केल. पहीलीच एज १९ दाखवत होती, प्रेगीने त्याच्या सर्च इंजिन मधे आयडी चेक केला तर तीचे ९ क्लोन्स दिसले आणि तीला ८ वेळा रीजेक्शन मिळाल होत. प्रेगी ने त्याच लक्ष दुसरी कडे वळवल पण तेवढ्यात त्याचा बॉडी मीटर रेड बीप्स द्यायला लागला. डॅशबॉर्ड वर बाकीचे रीडींग्ज नॉर्मल दिसत असले तरी त्याच बॉडी एज अचानक २९ दाखवायला लागल होत.
कुठेतरी नक्कीच काहीतरी गडबड झाली होती. प्रेगीने तात्काळ त्याच्या रेग्युलर डॉक्टर क्री१३०१८-० ला मेसेज पाठवला, दुसर्याच सेकंदला त्याचा आयटॉप शीव्हर झाला
"हाय प्रेगी, धीस इज क्री१३०१८-१ हाउ कॅन आय हेल्प यु"
"मला तात्काळ तुझ्या मास्टर शी बोलायच आहे. प्लीज कनेक्ट टु हिम"
"ही इज बिझि अ‍ॅन्ड विल बी अ‍ॅव्हेलेबल इन ३ मिनिट्स २२ सेकन्ड्स" डॉक्टर क्री च्या क्लोन ने मॅकनिकली उत्तर दिल. "डॅम इट" प्रेगी ने कॉल डिसकनेक्ट करुन डायरेक्ट डॉक्टर क्री ला पेर्सनल हाय अ‍ॅलर्ट मेसेज पाठवला
"यस प्रेगी व्हॉट्स रॉन्ग?" डॉक्टर क्री ८ व्या सेकंदाला कनेक्ट झाले होते
"डॉक बॉडी मीटर माझ एज ३० दाखवतोय, इट्स इन्क्रीजींग अ‍ॅट आल्मोस्ट अ यीअर एवरी मिनिट"
"सो?"
"इट शुड बी २२"
"ओके लेट मी चेक, गिव्ह मी अ‍ॅक्सेस टु युवर बॉडी"
प्रेगी ने आयटॉप वर डॉक्टर क्री ला त्याच्या बॉडीचा फुल अ‍ॅक्सेस ग्रान्ट केला
"नाउ रीलॅक्स, मी तुझी बॉडी रीमोट स्कॅन करतोय, सो डोन्ट मुव्ह"
आठव्या मिनिटाला डॉक्टर क्री परत कनेक्ट झाले
"यस डॉ, काय झाल होत?"
"सॉरी प्रेगी, तुझी केस माझ्या कंट्रोल च्या बाहेर आहे. तुझे सगळे रीपोर्ट नॉर्मल आहेत पण एज वाढतय"
"आता?"
"तुला तुझ्या स्टेम एक्स्पर्ट ला इमीजीएट कॉन्टॅक्ट कराव लागेल. इफ यु आर फाइन आय वील कनेक्ट हिम टु यु. आणि हो तुला तुझ्या बॉडी चे कोअर अ‍ॅक्सेस पण त्यांना द्यावे लागतील"
"म्हणजे?"
"ही विल नीड टु स्कॅन युअर ब्रेन स्टेम सेल्स"
"फाइन डॉक"
प्रेगीने आवश्यक त्या सुचना आयटॉप ला दील्या.
दुसर्याच मीनीटाला त्याच्या स्कीन वर तीशीतले डॉ. गोडबोले अ‍ॅपीअर झाले
"हाय प्रज्वल, काय झाल?" प्रेगीने त्याच ओरीजनल नाव ऐकुन जमाना झाला होता
"हाय डॉक, लॉन्ग टाइम"
"यस व्हेरी लॉन्ग टाइम" डॉ. गोडबोले मिस्कील पणे हसले. "मला तुझे रीपोर्र्ट क्री ने दीले आहेत. लेट मी स्टार्ट विथ माय एक्झाम्स. मी तुझे स्टेम सेल्स आणि ब्रेन रीमोट स्कॅन करेल, सो यु विल बी अन्कॉन्शस फोर अ व्हाइल"
"शुअर डॉक" प्रेगीने त्याच्या कपाळावर "नो डीस्टर्ब" चा मेसेज डिस्प्ले केला आणि शांत झोपुन राहीला.
दहा मिनीटाने प्रेगी त्याच्या आयटॉप च्या शीव्हर मुळे जागा झाला. समोर स्क्रीन वर डॉ. गोडबोले होतेच.
ह्या वेळेस मात्र ते एकदमच गंभीर दिसत होते. "यस डॉक?" प्रेगी एकदम आतुर झाला होता
"सॉरी प्रज्वल, मी तुला नाही वाचवु शकत"
"म्हणजे?"
"यु हॅव्ह ओन्ली २४ मिनिट्स लेफ्ट"
"व्हॉट यु मीन बाय २४ मिनिट्स? आपल २०० वर्षांच पॅकेज होत. प्लीज, मला क्लीअरली सांगा" प्रेगी किंचाळळाच.
"सांगतो सांगतो. १४२ वर्शांपुर्वी म्हणजे तुझ ज्यावेळेस ओरीजिनल वय २२ होत त्यावेळेस मी तुझ्या बॉडीत स्टेम सेल्स प्लांट केले होते. त्यावेळेस एकेक सेकन्दाचा विचार करुन हे स्टेम्स प्लान्ट केले होते"
"म्हणजे?"
"म्हणजे ह्या २०० वर्षाचा काळ, ह्या २०० वर्षातल्या प्रत्येक सेकन्दाला होणार वातावरणातले बदल, त्याचा तुझ्या शरीरावर होणारा परीणाम ह्याचा विचार केला गेला होता. त्यामुळेच आपल्याला २०० वर्ष तुला २२ वर्षाच्या बॉडी प्रमाणे सस्टेन करण शक्य होणार होत."
"हे तुम्ही मला त्यावेळेसच सांगीतल होत"
"हो. आणि हे पण तुला आठवत असेल की हे सेल्स सुपर कॉम्पुटर द्वारे प्रोग्राम केलेले आहेत"
"हो पण आत्ता मधेच काय बिघडल?"
"एक्लिप्स. ग्रहण"
"म्हणजे?"
"म्हणजे आज खन्ड्ग्रास ग्रहण आहे, आणि सुपरकॉम्पुटर तेथेच चुकला."
"सुपरकॉम्पुटर चुकला?"
"अ‍ॅक्चुली तस पण म्हणता नाही येणार. १४२ वर्शांपुर्वी जेव्हा आपण हे स्टेम्स तुझ्या बॉडी मधे प्लान्ट केले तेव्हा भविष्यातील ग्रहणाचा कालावधी आणि त्याचा वातावरणावर होणारा परीणाम ह्यासाठी VSOP87/ELP2000-82 हे एफमेरीडिक्स वापरले होते"
"बर मग?"
"हे एफमेरीडिक्स जवळ्जवळ २५० वर्षांपुर्वी म्हणजे १९८८ ला डेव्हलप केले होते. त्यानुसार आजच ग्रहण ५:१४:२७ ला संपणार होत. पण मधल्या काळात झालेल्या वातावरणीय बदला मुळे ते थोड्यावेळा पुर्वी म्हणजे ५:१४:३५ ला संपल"
"म्हणजे फक्त ८ सेकंदाचा फरक?"
"हो पण हाच ८ सेकंदाचा फरक आपल्याला घातक झाला. ह्या ८ सेकंदामुळे वातावरणातले आणि तुझ्या बॉडीवर होणारे बदल तुझे प्रोग्राम्ड स्टेम्स अ‍ॅन्टीसीपेट नाही करु शकले आणि त्यामुळे त्यांचा बॅलन्स लूज झाला. नाउ दे आर डेटोरींयेरेटींग अ‍ॅट व्हेरी फास्ट रेट अ‍ॅन्ड यु विल सुन टच युअर ओरीजीनल एज. अर्थातच ह्या एज ला यु कांट सस्टेन"
डॉ. गोडबोल्यांनी एका दमातच सत्य परीस्थीती समोर ठेवली.
"डॉक एनी एनी वे आउट?" पार कोलमडलेल्या प्रेगी ने विचारल. त्याला आता त्याच्याच आवाजातला कंप जाणवत होता. गालावरच्या आणि हातावर पडलेल्या सूरकुत्या परीस्थीतीची जाणीव करुन देत होत्या
"नो माय सन. सॅडली नो वे लेफ्ट"
"पण डॉक मला अस स्पेस मधे नाही मरायच. माझा एन्ड अ‍ॅट्लीस्ट पृथ्वी वर व्हायला हवा"
"फाइन, मी तुझ्या साठी स्पेस स्टेशन वरुन सप्लीमेंट शटल पाठवायची व्यवस्था करतो. बट यु नीड टु डु लास्ट फोर्मलीटीज"
"आय विल ट्रान्स्फर युर फीज डॉक"
"नाही मी ते नाही सांगत. यु विल हॅव टु डीस्ट्रोय युर ऑल क्लोन्स. यु नो आता ऑर्फन क्लोन्स च्या त्रासामुळे सिस्टीम इज व्हेरी स्टीक्ट अबाउट इट"
"ह्म्म्म" प्रेगी ला आता बोलायलापण त्रास होत होता
त्याने कसातरी आयटॉप परत अ‍ॅक्टीव्ह केला, आणि आवश्यक त्या सुचना पास केल्या
बॉडी मीटर त्याच एज आता ११७ दाखवत होत आणि अ‍ॅट्रेक्टोमीटर शुन्य लाइक्स दाखवत होता
त्या रात्री बहुतेक न्युज एजन्सीजवर "८ वर्षानंतर पृथ्वीवर एक मृत्यू" ही ब्रेकींग लाइन झळकत होती

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८ वर्षानंतर पृथ्वीवर एक मृत्यू" ही ब्रेकींग लाइन झळकत होती<< बाप रे. आत्ताच किती लोकसंख्या आहे.. कुणी मेलंच नाहीतर मंगळ काय पार प्लूटोपर्यंत चाळी बांधाव्या लागतील मनुष्याला.

कथा आवडली.

नंदिनी, शांग, उदय धन्यवाद.
उदय, थोडासा बदल केलाय, पण कथेतील बर्याचशा गोष्टी मुद्दाम वाचकांच्या इमॅजीनेशन साठी सोडल्या आहेत

कथा मस्तच आहे.

एक अज्ञानी प्रश्न -
<<<पण मधल्या काळात झालेल्या वातावरणीय बदला मुळे ते थोड्यावेळा पुर्वी म्हणजे ५:१४:३५ ला संपल" "म्हणजे फक्त ८ सेकंदाचा फरक?" >>>> वातावरणीय बदला मुळे झालेला हा ८ सेकंदाचा फरक - हे वैज्ञानिक सत्य आहे का तुमची कल्पनाशक्ती ?

प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद Happy

उदय, अजुन कीती गेले ते बघायला मला टाइम मशीन चालु करुन परत तिकडे जावे लागेल Wink

शशांक, VSOP87/ELP2000-82 ची theory (http://eclipse.gsfc.nasa.gov/SEpath/ve82-predictions.html) आणि त्यांनी प्रेडीक्ट केलेली वेळ ५:१४:२७ हे खरे असली तरी त्यातला फरक ही निव्वळ कल्पना आहे

Pages