अद्भुत (भाग ३ )

Submitted by Mandar Katre on 6 February, 2013 - 12:57

3

थकल्या भागल्या अवस्थेत रोहन संध्याकाळी सहा वाजता पर्वत-शिखरावर असणार्यान त्या मठात पोचला. गावकर्या ला निरोप देवून घरी पाठवलं आणि रोहन मठाच्या प्रवेशद्वारातून आत गेला . आत जाताच एका छोट्या दहा-बारा वर्षाच्या भिकखूने त्याचे स्वागत केले ... आइये रोहन बाबू ,गुरुजी आपकीही राह देख रहे है .रोहन अवाक झाला. आपला उभ्या आयुष्यात या मठाशी कधी संबंध आलेला नाही,आणि याला माझे नावदेखील कसे काय माहीत?आणि मी इथे येणार हे यांना कासेकाय माहीत? ....तुमको मेरा नाम कैसे पता चला ?....... गुरुजी ने बताया बाबूजी.......... आश्चर्यचकित झालेला रोहन त्या छोट्याबरोबर निमूटपणे चालू लागला.

थोडेसे आत गेल्यावर एका हॉलमध्ये अनेक लहानमोठे बौद्ध भिक्षू प्रार्थना करत बसले होते .रोहनने सगळ्यांना वाकून नमस्कार केला. प्रार्थना संपल्यावर मध्यभागी बसलेल्या मुख्य गुरुजींनी त्याला जवळ बोलावले. ..... आओ बेटा रोहन ,मै हू भिक्खू धम्मपाल , हमारे इस छोटेसे आश्रम मे तुम्हारा स्वागत है ,बैठो , थक चुके होगे,मुंबई से यहा का सफर अच्छा हुवा ना?................ नमस्कार , मगर गुरुजी मै समझ नाही पा रहा हू, हमारी कोई पहचान तक नही ,और आप मुझे कैसे जानते है?............ अरे बेटा तुम्हे कल रातका वो सपना याद नही? हमारा भी वायरलेस नेटवर्क है बाबा ...................... हसून गुरुजी म्हणाले . आज रात आराम करो ,हमारे आश्रम का खाना खावो ....हम सब सूर्यास्त के बाद खाना नही खाते. तुम्हारे लिये खाना बचाके रखा है. कल सुबह तुम्हारे सवालोंका जवाब तुम्हे मिल जाएगा बेटा .....

आधीच दिवसभरच्या श्रमाने थकलेला रोहन आश्चर्यमुग्ध होवून अधिक काही न बोलता निमूटपणे छोट्याने दाखवलेल्या खोलीत गेला. सामान ठेवून फ्रेश होवून मग आश्रमातील जेवणाचा आस्वाद घेतला. त्याला जेवताना जाणवले की जेवणाची चव साधीच असली तरी काहीतरी निराळे आहे ,जसे की आपण देवाचा प्रसाद घेत असावा,तसा! जेवण झाल्यावर त्याला लगेच झोप आली. आणि तो निद्राधीन झाला.

रात्री कोणतेही स्वप्न पडले नाही. शांत झोप लागली. अशी झोप गेल्या कित्येक वर्षात त्याला आली नव्हती. त्याला आश्चर्य वाटले की काल आश्रमात प्रवेश केल्यापासून एकदाही सिगरेटची आठवण कशी झाली नाही?दिवसाला दोन-तीन पाकिटे ओढणारा मी असा कसा सिगरेट विसरलो? पण का कोण जाणे,त्याला आत्ताही सिगरेट ओढावीशी वाटली नाही. त्याने भराभर आवरले व आश्रमाच्या मुख्य हॉलमध्ये आला तेव्हा सकाळचे साडेआठ वाजले होते.

गुरुजींनी त्याला जवळ बोलावले तेव्हा रोहन नमस्कार करून गुरुजींच्या आसनाजवळ खाली बसला. गुरुजी म्हणाले... रोहन बेटा ,तू इथे आलास त्याचा उद्देश फार निराळा आहे. सुटलेली नोकरी आणि रुसलेली प्रेयसी हे फक्त तत्कालिक छोटेसे कारण आहे. बालपणी तुझ्या मनाला छळणारा तो पैशाचा विचित्र विचार आठवतोय? त्या विचारात खूप काही दडलेले आहे बेटा. आता एक काम कर. सिगरेट आणि दारूसारख्या व्यसनांचा जो दुष्परिणाम जो तुझ्या शरीर आणि मनावर झालेला आहे, तो प्रथम आपल्याला धुवावा लागेल. त्यासाठी तुला धरमशालेला जायचे आहे. तिथे तू दहा दिवसांचा एक विपश्यना कोर्स कर. आणि मग माझ्याकडे ये. तुला तुझ्या खर्या् जीवन-ध्येयाचा मार्ग त्यानंतर कळेल............................!

यापूर्वीचे भाग -

अद्भुत भाग 1- http://www.maayboli.com/node/40710

अद्भुत भाग 2 - http://www.maayboli.com/node/40830

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users