पुन्हा एकदा...

Submitted by प्रेरीत on 6 February, 2013 - 04:52

पुन्हा एकदा महत्वाचा शोध
जाणीव आणि आत्मा सहज बोध
नेमकं काय कुठे शब्दांत मांडू?
स्वतःला मांडायला कां उगाच भांडू?

नसेल समजायचे त्यांना तर
कशाला त्यांचा विचार आठ प्रहर
त्यांची जाणीव कॉब फूटला अंकूर
माझ्या आत वटवृक्षाचे काहूर.

मागतो आहे केवळ एक पाऊल
जरा पकड हात ही नाही हूल...
आता नाहीत क्षमायाचना
माझं आयुष्यंएक सुरेल रचना...

उदयागणिक हले आत पाळणा
सांग वेद आयुष्यातल्या वळणा
फिक्कटलेल्या काचेला होईल ऊन स्पर्श
तडकल्या ह्रदया होई तेव्हा हर्ष...

परत ते अनामिक अभाष्य
रमल्या पावसाळ्यासारखं दृश्य
कुणाकुणाच्या ओठांवर हसू रेषा
जाऊन जाऊन जाईल ती कुठल्या देशा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users